मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|दत्त संप्रदायातील सत्पुरूष| श्री हरिभाऊ निठुरकर महाराज दत्त संप्रदायातील सत्पुरूष अद्वितीयानंद सरस्वती महाराज सतगुरु श्री आगाशे काका श्री आनंदभारती स्वामी महाराज श्री आनंदनाथ महाराज अनिरुद्ध जोशी (अनिरुद्ध बापू) ब्रम्हर्षी आत्माराम शास्त्री जेरें श्री नारायणदास श्रीपादश्रीवल्लभ पिठले महाराज श्री बाळकृष्ण महाराज (सुरतकर) श्री बालमुकुंद अथवा बालावधूत (बालाजी अनंत कुलकर्णी) श्री बालमुकुंद बालावधुत दत्त महाराज (करवीर) श्री बाळानंद स्वामी महाराज श्री बाळाप्पा महाराज (श्री स्वामी समर्थ ब्राम्हनंद स्वामी महाराज) श्री भैरवअवधूत ज्ञानसागर (ज्ञानसागरे स्वामी) श्रीमद् ब्रह्मानंद स्वामी महाराज श्री चिदंबर दिक्षीत महास्वामी ओम चिले दत्त स्वामीभक्त श्री चोळप्पा परमपूज्य स्वामी सेवक श्री दादा महाराज जोशी महीपती संत दासगणु महाराज श्री दासोपंत महासाधू श्री दत्त दिगंबर अण्णाबुवा महाराज श्री दत्तगिरी महाराज श्री दत्तमहाराज अष्टेकर ब्रम्हर्षी दत्तमहाराज कवीश्वर श्री दत्तावतार दत्तस्वामी श्री दत्तनाथ उज्जयिनीकर श्री देवमामालेदार तथा श्री यशवंतराव महाराज सद्गुरू देवेंद्रनाथ महाराज दत्तावतरी धूनी वाले दादाजी श्री दिगंबरबाबा वहाळकर श्री दिगंबरदास महाराज (श्री विठ्ठल गणेश जोशी) दिंडोरीचे खंडेराव आप्पाजी उर्फ मोरेदादा श्री दीक्षित स्वामी श्रीसंत एकनाथ महाराज श्री गगनगिरी महाराज परम् सदगुरू श्री गजानन महाराज, अक्कलकोट संत गजानन महाराज शेगावीचा योगीराणा श्रीगंगाधर तीर्थ स्वामी महाराज श्रीश्री गणेश महाराज श्री गोपाळबुवा केळकर श्री गोपालदास महंत महाराज श्रीमद् गोपाळ स्वामी महाराज श्री गोरक्षनाथजी श्री. गोविंद महाराज उपळेकर श्रीमद् गोविंद स्वामी महाराज श्री परमपूज्य गुरुनाथ महाराज दंडवते महाराज गुरु ताई सुगंधेश्वर श्री सदगुरू हरिबाबा महाराज श्री हरिभाऊ निठुरकर महाराज श्रीहरिनाथ महाराज मुखेड प. पू. सद्गुरु डॉ. हरिश्चंद्र जोशी श्री जनार्दनस्वामी सद्गुरू श्रीजंगलीमहाराज श्री जयकृष्ण जनार्दन बुवा तथा मधू बुआ श्री मधुसूदन विष्णू कान्हेरे गुरुजी श्री अनंतसुत कावडीबोवा श्री केशवानंद सरस्वती स्वामी महाराज श्री किनाराम अघोरी प. प. कृष्णानंद सरस्वती श्री कृष्णनाथ महाराज श्री कृष्णेन्द्रगुरु श्री गुरुकृष्णसरस्वती (कुंभार स्वामी) श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज सद्गुरू मछिंद्रनाथ महाराज श्री महिपतिदास योगी श्री सद्गुरू मामा देशपांडे श्री दत्तावतारी माणिकप्रभु श्रीमद् मौनी स्वामी महाराज श्री मोतीबाबा जामदार (महिबाबा योगी जामदार) श्री मुक्तेश्वर, श्री संत एकनाथांचे नातु श्री नानामहाराज तराणेकर श्री नारायण गुरुदत्त महाराज (कृष्ण आप्पा) नारायणकाका ढेकणे महाराज श्री नारायण महाराज जालवणकर (त्रिविक्रमाचार्य) सद्गुरु नारायण महाराज केडगावकर श्री नारायणस्वामी श्री नारायणतीर्थ देव स्वामी महाराज औदुंबरचे श्री नारायणानंद स्वामी आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज श्री निपटनिरंजन श्री निरंजन रघुनाथ श्री नृसिंह सरस्वती यांचे अंतरंग शिष्य- गुरुचरित्रातील सिद्ध श्री नरसिंहसरस्वती स्वामी आळंदी श्री नृसिंह सरस्वती पाचलेगावकर महाराज (श्री संचारेश्वर) श्री पद्मनाभाचार्य स्वामी महाराज पंडित काका धनागरे महाराज श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर परमात्मराज महाराज श्रीपादश्रीवल्लभ पिठले महाराज श्री रघुनाथभटजी नाशिककर श्री रामानंद बिडकर महाराज श्रीमद् रामचंद्र योगी श्री रामकृष्ण क्षीरसागर परमपूज्य श्री रंग अवधूत स्वामी महाराज श्री सच्चिदानंद विद्याशंकर भारती श्री साधु महाराज कंधारकर श्री संत साईबाबा श्रीसमर्थ साटम महाराज श्री सायंदेव सद्गुरु शंकर महाराज दगडे श्री शंकर महाराज प. प. श्रीशंकर पुरूषोत्तमतीर्थ स्वामी महाराज श्रीमद् शंकर स्वामी श्री शांतानंद स्वामी महाराज शरद भाऊ जोशी महाराज श्री बाबामहाराज सहस्त्रबुद्धे सद्गुरू श्री शिवाजी महाराज, विडनी श्री श्रीधरस्वामी महाराज श्रीपाद श्रीवल्लभ श्री सिद्धेश्वर महाराज प. पू. ब्रह्मयोगी सीताराम महाराज श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट श्री स्वामीसुत महाराज श्री जयकृष्ण जनार्दन बुवा तथा मधू बुआ प. पू. सौ. ताईमहाराज चाटुपळे ॐ श्रीदत्त ठाकूर महाराज श्री उपासनी बाबा साकोरी श्री वासुदेव बळवंत फडके प. पू. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती श्री विद्यानंद बेलापूरकर श्री विरुपाक्षबुवा नागनाथ स्वामी महाराज श्री विष्णुबुवा ब्रह्मचारी प. पु. श्री सद्गुरू विष्णुदास महाराज श्री विष्णुदास महाराज कोल्हापूरच्या विठामाई श्री वामनराव वैद्य वामोरीकर श्री यती महाराज श्री योगानंद सरस्वती श्री हरिभाऊ निठुरकर महाराज दत्त संप्रदायातील सत्पुरूष Tags : dattadattatreyaguruगुरूदत्तदत्तात्रेय श्री हरिभाऊ निठुरकर महाराज Translation - भाषांतर जन्म: १५जून १९५४ निठुर येथे लातूर जिल्हा, महाराष्ट्र आई/वडील: अवंतिकाबाई/विनायक देव गुरु: गुंडा नारायण महाराज/दत्त महाराज कविश्वरकार्यकाळ: १९५४- आजपर्यंतविशेष: श्रीपाद श्रीवल्लभ चारितामृत भाषांतरहरिभाऊ निठूरकर श्री हरिभाऊ निठुरकर महाराजश्री भाऊ महाराजांचा जन्म एक अत्यंत संस्कारक्षम वैदिक कुटुंबात निठूर या गावी १५, जून १९५४ ला झाला. भाऊ महाराज लहानपणापासून अत्यंत बुद्धिमान होते.त्यांची बुद्धिमत्ता अतिशय तल्लख असल्याने शिकवलेले ताबडतोब ग्रहण करीत व आत्मसात हि करीत. या तल्लख बुद्धीमतेचे फलस्वरूपच त्यांनी अत्यंत लहान वयातच संस्कृत शिक्षणास प्रारंभ केला व ती देववाणी आत्मसात केली. त्यांनी अनेक हिंदू प्राचीन ग्रंथ वाचले व अभ्यासले. याच वयात त्यांनी वेदविद्याही शिकण्यास प्रारंभ केला. वेद ऋचांच्यामध्ये त्यांची गती अत्यंत लक्षणीय होती. कारण एकाच त्यांची विलक्षण चाणाक्ष बुद्धिमत्ता! म्हणून अगदी लहान वयातच त्यांनी काही अभ्यासक्रम पूर्ण केला. जे शिक्षण मौन्जी बंधानानंतर सुरु करायचे ते त्यांनी आधीच सुरु केले. वयाच्या ८ व्या वर्षी त्यांची मुंज झाली. या मौजींबंधन प्रसंगी या असामान्य बालकाला आशीर्वाद देण्यासाठी प्रत्यक्ष श्री पांडुरंग उपस्थित होते असे सांगितले जाते. इ. स. १९८४ मध्ये त्यांना दीक्षा गुरु गुंडा नारायण महाराज यांचे कडून मिळाली. तर सिद्धमहायोगाची दीक्षा त्यांना प. प. दत्तमहाराज कविश्वर यांचे सिद्धहस्ते मिळाली. दत्तमहाराजांनी त्यांना श्रीमद भागवत सांगण्यास सांगितले. या ग्रंथराजा द्वारे समाज प्रबोधन व समाजाची जडण घडण बदलून समाज विकासाचे कार्य त्यांनी समर्थपणे पेलले. भगवान गोपाळकृष्णाचा वाङग्मयिन मूर्ती द्वारे व भगवंताच्या आयुष्यातील प्रसंगद्वारे समाजास अध्यात्मिक मार्गदर्शन केले, समाज प्रबोधन केले. त्यांनी ८० पेक्षा अधिक भागवत सप्ताह केले. भारत भ्रमण केले. अनेक तिर्थ यात्रा केल्या आपल्या भक्तांना आपल्या बरोबर नेऊन त्यानाही शास्त्रोक्त तीर्थयात्रा घडविल्या. त्यांनी अनेक ठिकाणी प्रवचने केली. त्यांच्या प्रवचनातून अनेक भक्तांना मानसिक समाधान मिळाले व त्यांच्या मनातील अध्यात्मिक शंकांचे परिमार्जन झाले व त्यायोगे त्यांचे जीवन अधिक समृद्ध झाले. त्यांच्या भक्तांचे जीवन अधिक आनंदी व संकटमुक्त झाले असा त्यांच्या भक्तांचा दृढ विश्वास आहे. याच कारणाने महाराष्ट्र, कर्नाटक आंध्रप्रदेश या राज्यात त्यांचे भक्तगण मोठया प्रमाणात विखुरलेले आहेत. अनेक भक्त परदेशातूनही त्यांचे मार्गदर्शन घेऊन समाधानी आहेत. ते अत्यंत सकारात्मक विचारांचे धार्मिक परंतु तितकेच साध्या वागणुकीने भक्तगणात आदराचे स्थान निर्माण करून आहेत. त्यांनी शंकर भट्ट यांनी लिहिलेले श्रीपादश्रीवल्लभ चारितामृत हा तेलगू ग्रंथ श्रीपादांचे आज्ञेने घेतला अभ्यासला व त्याच भाषेत प्रथम त्याचे शुद्धीकरण केले. सदर ग्रंथ श्रीक्षेत्र पिठापूर येथे श्रीचरणी अर्पण केला. तेव्हा श्रीपादश्रीवल्लभांचे आज्ञेनेच त्या प्रासादिक ग्रंथाचे मराठीत भाषांतर आरंभिले व ते पूर्णही केले. हा श्रीपादांचा चरित्र ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. दत्तभक्तांसाठी हे महान कार्य त्यांनी केले. यासाठी प्रत्येक दत्तभक्त आयुष्यभर ऋ णी राहतील. हा ग्रंथ मार्गदीप म्हणून अनेक दत्तभक्तांचे आयुष्य उजळून टाकीत आहे. हे महान कार्य केवळ श्रीपादांची प्रेरणा, आशीर्वाद व गुरुकृपेनेच शक्य झाल्याचे ते आवर्जून सांगतात. दत्तसंप्रदयाचा वेदस्वरूप ग्रंथ श्री गुरुचरित्र या ग्रंथातअध्याय ५-१० पर्यंत श्री नृसिंहसरस्वतीचे पुर्वावतार श्रीपादश्रीवल्लभांचे संक्षिप्त चरित्र आलेले आहे. पण या श्रीपाद श्रीवल्लभ चारितामृत ग्रंथात हे चरित्र खूप विस्ताराने आलेले आहे. या चारित्रग्रंथात श्रींचे बाललीला अत्यंत बारकाईने वर्णन केलेल्या आहेत. त्यावरून त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, विचार, त्याकाळातील सामाजिक परिस्थिती आध्यत्मिक वातावरण यावर प्रकाश पडतो. याच ग्रंथात पुढील काळात घडणाऱ्या घटनांबाबत अचूक भविष्यवाणी केलेली आढळते. आजही हे चारितामृत अनेक भक्तगणांना मार्गदर्शक ठरत आहे. भाऊ महाराजांचे जीवन म्हणजे एक आदर्श जीवनपाठ आहे. अत्यंत साधी राहणी, प्रखर बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व, उत्तम मांडणी, सखोल अध्यात्मिक ज्ञान, भक्तांसाठी आत्मीयता यामुळे ते गुरुपदी पोहोचले आहेत. वैयक्तिक जीवनात डी. आर. डी. ओ. सारख्या केंद्र सरकारचे महत्वाचे खात्यात एक सक्षम अधिकारी म्हणून ते प्रसिद्धी पावलेले आहेत. तरीपण ते अत्यंत सामान्य माणसांप्रमाणेच वागतात. त्याची साधी राहणी, अवघड अध्यात्मिक विषय समजून सांगण्याची हातोटी, अध्यात्मिक ज्ञान वत्याद्वारे भक्तांना त्यांच्या वयक्तिक व आध्यात्मिक मार्गदर्शन यामुळे भक्त वर्गात आदराचे स्थान निर्माण करू शकलेले आहेत. त्यांच्या वैदिक ज्ञानासाठी भारताचे राष्ट्रपती श्री शंकर दयाळ शर्मा यांचे हस्ते त्यांना दोनदा गौरावांवीत करण्यात आलेले आहे. तसेच करवीर पीठ शंकराचार्य व कांचीकामकोटी पीठ शंकराचार्य यांच्याकडूनही त्यांचा यथोचित गौरव करण्यात आलेला आहे. गेली ५-१० वर्षे पासून भक्त गणांसमवेत त्यांनी अनेकांना यात्रेत नेले आहे. तेथेत्यांनी तिर्थ क्षेत्राची माहिती, महत्व व पावित्र्य वर्णिलेले आहे. त्यांनी त्यांचे शिष्यबरोबर कर्दळी वन यात्राही केलेली आहे. ते एक उच्यकोटीचे साधक, एक समर्पित दिक्षाधिकारी आहेत. त्यांनी या भारत वर्षांत अनेक प्रांतात प्रवचन मालिका, भागवत सप्ताह व धार्मिक क्षेत्री अनेक अध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करून सफल केलेले आहेत. त्यांचेकडे उच्य नीच भाव नाही जाती पातींची बंधने नाहींत केवळ निखळ अध्यात्म व समर्पित साधना. त्यांचे मार्गदर्शनाने अनेकांची जीवने उजळून निघाली आहेत. धान्य ते सद्गुरू व धन्य ते भक्त! अशा या महान पुण्यत्म्याचे चरणी आदरपूर्वक प्रणिपात. ॥ सुनीटा असती पोटऱ्या गुल्फ जानू ॥ ॥ कटिं मौंज कौपीन ते काय वानूं ॥ ॥ गळां माळिका ब्रह्मसूत्रासि धारी ॥ ॥ तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥३॥ ॥ श्री दत्तस्तुती ॥ N/A References : N/A Last Updated : June 17, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP