श्री सिद्धेश्वर महाराज
दत्त संप्रदायातील सत्पुरूष
बिदर जिल्ह्यातील बिदर गावापासून सुमारे आठ मैलांवर साधोघाट हे कर्नाटकातील प्रतिपंढरपूर म्हणून क्षेत्र आहे. येथे आजही निबिड अरण्य असून सुमारे तीनशे वर्षापूर्वी एका गरीब कुटुंबात शंकराच्या कृपाप्रसादाने एक बालक जन्मास आले. या बालकाने वयाच्या आठव्या वर्षापासून तपश्चर्येस आरंभ केला. त्याने विठ्ठलाचा साक्षात्कार झाल्यानंतर विठ्ठलाच्या मृण्मयी मूर्तीची उपासना चालू केली. येथे विठ्ठलाच्या गर्भगृहाच्या मागे एक विहीर असून तेथे दत्तात्रेयांचा गुप्त वास आहे. असे सांगतात की, या स्थानातील केरकचरा पहाटे तीन ते पाचच्या वेळात आपोआप गोळा होतो. पांडुरंगाच्या नजीक असलेल्या दत्तप्रभावामुळे चमत्कार होत असल्याच्या हकीकतीही मिळतात.
॥दरिद्रें बहु कष्टला विप्र त्यासी ॥||क्षणें द्रव्य देऊनि संतोषवीसी ॥॥दिला पुत्र वंध्या असुनी वृद्ध नारी ॥॥तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ||६॥
N/A
References : N/A
Last Updated : June 29, 2024
TOP