मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशवसुत|
जास्वंदीचीं फुलें, आणि पारिजाताचीं फुलें

जास्वंदीचीं फुलें, आणि पारिजाताचीं फुलें

केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.


श्लोक
पहिलीं :-
“ मातींत खालीं पडणें तुम्हांला
कैसें रुचे, हें न कळे अम्हांला.
हा रक्तिमा स्वीय अम्ही पहा रे,
शाखाम्वरी नाचवितों अहा रे ! ” ॥१॥
दुसरीं :-
“ तो रक्तिमा घेउनियां खुशाल
शाखांवरी सन्तत का रहाल ?
मरून माततिंचि या पडाल,
अज्ञात ऐशा थडग्यांत जाल ! ” ॥२॥
“ भाळीं न तें यो अमुच्या म्हणुन
तो डौल शाखांवरला गणून -
खोटा, लिहाया थडग्यावरी तें
स्वनाम गन्धें झटतेंचि येथें ! ” ॥३॥
६ ऑगस्ट, १८८८.

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP