मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशवसुत|
आम्ही कोण ?

आम्ही कोण ?

केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.


( शार्दूलविक्रीडित )

आम्ही कोण म्हणुनि काय पुससी ?--- आम्ही असूं लाडके ---

देवाचे, दिधलें असे जग तयें आम्हांस खेळावया;
विश्वीं या प्रतिभाबलें विचरतों चोहींकडे लीलया

दिक्कालांतुनि आरपार अमुची दृष्टी पहाया शके !
सारेही बडिवार येथिल पहा ! आम्हांपुढें ते फिके;

पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूप्रती द्यावया ---
सौन्दर्यातिशया, अशी वसतसे जादू करांमाजि या;

फोलें पाखडितां तुम्ही निवडितों तें सत्त्व आम्ही निकें !
शून्यामाजि वसाहती बसविल्या कोणीं सुरांच्या बरें ?

पृथ्वीला सुरलोकसाम्य झटती आणावया कोण ते ?
ते आम्हीच सुधा कृतींमधुनिया ज्यांच्या सदा पाझरे ?

ते आम्हीच शरण्य मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभतें !
आम्हांला वगळा---गतप्रभ झणीं होतील तारांगणें;

आम्हांला वगळा---विकेल कवडीमोलापरी हें जिणें !

फैजपूर २९ नोव्हेंबर १९०१

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP