जयाजीराव शिंदे व तुकोजीराव होळकर
केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.
श्लोक
ज्यांनीं बाहुबलें रणांत सगळे जिंकूनियां हो अरी
कीर्तीचे ध्वज आपुले उभविले या आर्यभूमीवरी,
त्यांचे पुत्र आम्हांस आज सहसा सोडूनियां चालतां
खेदानें न रडे खरा कवण तो सांगा मराठा अतां ? ॥१॥
राणोजी - परिसूनि नांवच अहो ज्याचें मराठा स्फुरे,
मल्हारी - परिसूनि नांवच अहो ज्याचें मराठा स्फुरे,
हा ! हा ! तत्कुलदीप हे विझुनियां गेले भले आज ना !
हा ! हा ! तत्कुलवृक्षगुच्छ बरवे कोमेजले आज ना ! ॥२॥
जुलै, १८८६.
N/A
References : N/A
Last Updated : March 15, 2017
TOP