|
स्त्री. १ आरोळी ; नांवाचा मोठयाने उच्चार ; बोलावणें . ( क्रि० मारणे ). २ मोठयानें ओरडणें ; बोंब , आरडा करणें . सभेमाजि रायापुढे हाक गेली । - राक १ . ४ . ३ दुलौकिक ; सार्वजनिक चर्चा ; हाकाटी . ४ आरोळी ऐकूं जाईल इतके अंतर . वाटेवर हाक हाकेवर चौक्या होत्या . ५ विकणारानें आपल्या मालाची पुकारलेली किंमत . ( यावरून ) त्यानें जबर किंमत मागणें . पेठेत तांदळाची हाक दाह रुपये फरा असी आहे . ६ ( ल . ) उपदेश बा ! हाणिली सुरभिला जेवि तुज्या तेवि लात हांकेला । - मोशल्य १ . १० . ७ बडबड ; ओरडाओरड . तुमच्या होणार काय हाकानी । - मोउद्योग ८ . ७९ . [ हिं . प्रा . हक्का ] ०देणें १ हाक मारणें . २ ओ देणे , बोलावल्याबरोबर येतो म्हणून धांवून येणें . ३ उपयोगी पडावयास किंवा गरज भागविण्यास तयार होणें . ०फोडणें मोठयानें दुःखोद्गार काढणें ; मोठयानें हांक मारणें ; टाहो फोडणें . - मोआदि २ . ०मारणें १ बोलावणें , हाका मारणें . २ कार्य करणें , पाड लावणें . मद्गति हे अन्याचें येथें मारील काय हाक बळ । - मोवन ६ . ३ . हाका मारणें - १ ओरड करीत बसणें ; चरफडत राहणें , केलेल्या चुकीबद्दल दुःख भोगीत बसणें , दुसर्याचें नांवाचा बभ्रा करणें , मोठयाने तक्रारी करीत सुटणें . कां न तुम्हाहि परिसा मारित आलों अशाचि हाका मी । - मोउद्योग ११ . ५१ . २ काम अपुरे पडून राहणें ; प्रगति खुंटणें , बेत , कार्य इ० फिसकटणें . हाक ना बोंब - १ बिनबोभाट ; तक्रार , नाखुषी इ० न दर्शविणें २ केलेली ओरड तक्रार एखाद्याचे कानी जावयाची मुष्कील , अशक्यता . हांक बोंब - म - स्त्री . आरडाओरड ; हाकाटी ; गलबला . हाकटणें - उक्रि . १ मोठयानें बोलावणें , एकानें किंवा अनेकांनी एकास किंवा अनेकांस , जोरजोरानें हांक मारणें . - वामनराधा ५३ . २ डांगोरा पिटणें ; बोभाटा करणें . हाकणें - उक्रि . १ पशूनां लवकर जाणे इ० करितां शब्द , काठी इ० नी नेटानें चालविणें ; त्यांना काढून लावणें , पिटाळणें , पुढे ढकलणें . २ संसारादि खटले कसेहि करून चालविले , रेटणें . ३ अतिशयोक्ति दिसायाजोगी किंमत , बातमी , गप्प सांगणे , झोकणें . हाकलणें - सक्रि . हाकणें पहा . हकारणी , हाकारणी - स्त्री . ( जहाज इ० ) चालू करण्याची क्रिया . हाकरणें , हाकारणें - क्रि . गलबत , नाव इ० चालू करणें , त्यांस गति देणें . २ गलबत चालू करण्याकरितां त्यांचें शीड वार्यावर पसरणें . ३ बैलाचा तांडा , प्रवासी यांना प्रवास करण्यास सांगणें . ४ एखाद्या कामगिरीवर जासूद , नोकर पिटाळणें , दवडणें . ५ घोडा इ० कांस जलद चालण्याबद्दल इशारा देणें , दौड करावयास लावणें . हाकविणें - उक्रि . ( प्रा . ) हाकणें १ अर्थ पहा . हाकहूल - स्त्री . आरडाओरड ; हांकाटी ; दंगा . [ हिं . ] हाका - पु . ( बडोदें ) शिकारीचे जनावर दडलेल्या ठिकाणाहून हुसकविण्यासाठी केलेली ओरड ; हाकारा . ( क्रि० करणें ). हाका सुरू जाहला वाघ निघून गेला । - गापो २३ . हाका करणार्यास हांक्या किंवा हांकेवाला म्हणतात . - गापो २३ . हाकाक , हाकाहाक - स्त्री . १ हाकहूल पहा . २ तक्रार ; ओरड . कोणा ग्रंथकाराची लेखणी भाषेच्या कोतेपणामुळे थांबली अशी हाकाक अजून कोणाच्या कानी नाहीं . - नि २०१ . हाकाटा , हाकाटी - पुस्त्री . १ अनेक हाकांचा ; आरोळ्यांचा आवाज ; गलबला ; गोंधळ . २ एखाद्याचे विरुद्ध ओरड ; बोभाटा ; तक्रार . ३ हवी असलेल्या वस्तूसाठी जोराची मागणी . ४ ओरड ; दंगा ; गोंधळ ; कल्ला . ५ कुप्रसिद्धि ; डोंगारा . हाकटयाचा - वि . विद्वता , धन इ० असण्याबद्दल प्रसिद्ध ; नांव , कीर्ति झालेला ; अस्कर्याचा . हाकारणी , हाकारणें - हकारणी - णें पहा . हाकारणें - सक्रि . १ ओरडून हांक मारणें ; बोलावणें . २ शीड उभारून गलबत चालू करणें ; शीड उभारणें ; हकारणें . ३ चालू करणें ; गती देणें . म्ह० आषाढी आणि सण हाकारी . हाकारा - पु . १ हाकाटा पहा . बोला आणि सण हाकारी हाकरा - पु . १ हाकाटा पहा . बोलावणें . नवखंडीचिया राया हाकारा केला । - संतराजीरूख १३ . ५ . २ दवंडी . ३ दरारा . ४ ( नगरी ) बोभाट . हाकालणें - उक्रि . हकालणें पहा . हाकाहाक , हाकाहाकी - स्त्री . १ अनेक हाकांचा मिळून झालेला आवाज , यानें त्याला , त्यानें याला याप्रमाणें हांक मारणें ; यामुळे झालेला गोंधळ . २ सर्वसामान्यसर्वत्र ओरड ; हाकाटी ; उदा० पावसाची - पिकाची - पाण्याची - हांकाटी , ३ बाजारांतील जिन्नसांची चढीची किंमत इ० किंवा जिन्नस संपल्यानें होणारी हांका मारण्याची अवस्था ; दुर्भिक्ष .
|