Dictionaries | References

ललकारणी

   
Script: Devanagari
See also:  ललकार

ललकारणी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   bawling after; hallooing. 2 calling out; crying aloud; telling or singing with a raised voice.

ललकारणी

  पु. स्त्री .
   पुकारणे ; हांक मारणे ; ( विशेषतः ) दरबारांत राजाचे आगमन सूचित करण्यासाठी भाट , चोपदार जी आरोळी देतात ती . आदब , इ०
   ओरडणे ; मोठ्या आवाजांत सांगणे .
   उच्च स्वरांत गाणे . हा गातो तेच तो गातो परंतु त्याची कांही ललकारणी निराळी आहे . [ ललकारणे ] ललकारणे - अक्रि .
   मोठ्याने पुकारणे ; हांक मारणे .
   मोठ्याने आरडणे ; म्हणणे ( दवंडी पिटतांना , गातांना इ० ).
   ( चालण्याची गर्दी करण्यासाठी ) सांगणे ; ओरडणे ( जनावराला हाकतांना ).
   ओरडणे ; गर्जना करणे ( दरडावतांना , खडसांवताना ). - सक्रि .
   ओरडून हांक मारणे .
   गायन करणे ; गाणे . फंदी अनंत कटिबंध छंद ललकारी । - ऐपो २५३ . [ ध्व . हिं . ललकारना ] ललकारी - स्त्री . आरोळी ; ओरड ; पुकारा ; गर्जना ; मोठयाने हाका मारणे ; ललकारणी पहा . ( क्रि० करणे ; मारणे ). [ ध्व . सं . लल + कृ ; प्रा . लल्लक ; हिं . ललकारी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP