|
पु. नृप ; राजा . व्यास योगियांचा राव । - मुआदि ३९ . ८७ . नावांपुढील सन्मानाची एक पदवी . जसेः - बळवंतराव , माधवराव . क्वचित नुसता राव शब्दहि येतो . काय राव सांगावे , तुम्ही काल नव्हतां . मोठी मौज झाली . एक मराठा जात व तिच्यापैकी एक व्यक्ति . मराठा पहा . समशेर बहादर ; तिस्मारखां . दक्षिण हिंदुस्थानांत देशस्थ ब्राह्मण , मराठे , जैन आणि शेंबेगार राव ही पदवी लागतात . गोणी विणकरांची पेरिके नांवांची जातहि कधी कधी राव पदवी लावते . पेशवाईत विशिष्ट शौर्य गाजविल्याबद्दल एखाद्या व्यक्तीस दिली जाणारी पदवी . [ सं . राज , राय ] म्ह० राव करीत नाही ते गांव करितो . ( वाप्र . ) राव खाली आले - एखादा मोठा मनुष्य घोड्यावरुन , मोठ्या पदावरुन खाली आला असतां त्यास उद्देशून निघणारा उद्गार . राव घोड्याखाली आले - राव मेले . रावचा रंक होणे - मोठ्या , श्रीमान मनुष्यास दारिद्र्य , गरिबी येणे . सामाशब्द - रावकी - स्त्री . रावाची स्थिति , गुण ; रावपणा . याला हणमंतराव म्हणून सारे हांक मारितात , याला रावकी कोणी दिली ? रावजी - पु . पुरुषास लावावयाचा बहु मानाचा शब्द . [ राव ] रावरंक - पु . राजा व रंक ; श्रीमंत व भिकारी . साधूला रवरंक सारखे . रावो - पु . राजा . देशाधिपतीस दंडिता रावो । - दा . ३ . ८ . ९ . श्रेष्ठ मनुष्य . तो चतुरांचा रावो । - रास २ . ४७८ .
|