Dictionaries | References

मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें खाऊं नयेत

   
Script: Devanagari
See also:  मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें तोडूं नयेत , मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें फोडूं नयेत

मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें खाऊं नयेत     

लहानपणा पत्करुन सुस्थितींत असणें बरें म्हणजें मोठेपणाच्या हालांत पडावयास नको. ‘ मुंगी होऊनि साखर खावी। निज वस्तूची भेटी घ्यावी॥ ’ -तुकाराम. तु ० -लहानपन देगा देवा। मुंगी साखरेचा रवा॥
॥ ऐरावती रत्न थोर। त्यासी अंकुशाचा मार॥
॥ ज्याचे अंगीं मोठेपण। तया यातना कठीण॥
॥ तुका म्हणे बरवें जाण। व्हावें लहानाहुनि लहान॥
॥ -तुगा ११९१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP