Dictionaries | References

तांदुळ

   
Script: Devanagari
See also:  तांदूळ

तांदुळ     

पुअव . १ एक धान्यविशेष ; भात कांडून , साफ करुन काढलेले दाणे . २ हरीक , राळा , वरी , बरटी , सावा , कांग इ० काचे भाताच्या तांदुळाप्रमाणेच तूस काढून साफ केलेले दाणे . ३ उपासाच्या दिवशी फराळाकरिता , ( साळीचे ) तांदूळ तुपावर भाजून नंतर शिजवून करतात तो भात ; सोजी , धान्यफराळ . ४ तांदुळाच्या आकाराचे सोन्याचे मणी . हे ओंवून तांदळीपोत करतात . तांदळीपोत पहा . ( तांदूळ शब्दाचा एकवचनी उपयोग केल्यास एक दाणा असा अर्थ होतो . ) [ सं . तंडुल . ] उकडे , उपजे तांदूळ - पु . ( हेट . ) भात प्रथम उकडून नंतर तयार केलेले तांदूळ . सुरय तांदूळ - पु . ( हेट . ) भात न उकडता कुटून तयार केलेले तांदूळ .
०गोटा  पु. १ ( व्यापक . ) तांदूळ आणि इतर सर्वसामन्य धान्ये . २ तांदुळाचा दाणा . [ तांदूळ + गोटा = दाणा ]
०धुणी   रोवळी - स्त्री . तांदूळ धुण्यासाठी केलेली बांबूची , पितळेची टोपली .
०मांडा  पु. ( बे . ) तांदुळाचे पीठ , दूध व साखर यांची तयार केलेली आंबोळी . तांदुळी हलवा पु . खांडव्याच्या वड्याप्रमाणे पक्वान्न ; तांदुळापासून केलेले एक खाद्य ; तांदूळ भिजत ठेवून चुरुन ते मऊसे शिजल्यावर त्यांत नारळाचे दूध , दालचिनी , खिसमिस घालून ढवळतात व त्याला तुपाचा हात देतात . हे मिश्रण घाटून बरेच जाड झाल्यावर तुपाचा हात लावलेल्या ताटासारख्या पसरट भांड्यांत ते ओततात व थापून त्याचे सुरीने तुकडे करतात . ( असे खाद्य ). - गृशि १ . ४१८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP