Dictionaries | References श शहाण्याचें तीन ठिकाणीं ! शहाण्याचा गू तीन ठिकाणीं Script: Devanagari Meaning Related Words शहाण्याचें तीन ठिकाणीं ! शहाण्याचा गू तीन ठिकाणीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्वतःला शहाणा समजणारा एक मनुष्य काळोखांतून जात असतां त्याचा पाय विष्टेवर पडला. कोठें तरी उजेडाच्या ठिकाणीं जाऊन आपला पाय कशानें भरला आहे हें पाहावयाचें सोडून त्या शहाण्यानें आपल्या पायाला काय लागलें याची तेथल्या तेथेंच शहानिशा करण्याचें ठरविलें. त्यानें पायाला लागलेली विष्टा थोडी होतांत घेऊन बोटांनीं चाचपून वगैरे पाहिली. तथापि तेवढ्यावरुन तें काय आहे याचा त्याला निर्णय करतां येईना. तेव्हां वासावरुन परीक्षा करावी असें त्यानें योजिलें व विष्टेनें भरलेली बोटें नाकाजवळ नेलीं. वासावरुन त्याला पाय कशानें भरला याचा निर्णय करतां आलापण बोटें नाकाला लागून नाकालाहि विष्टा लागली ! अशा रीतीनें पाय, हात व नाक अशा तीन ठिकाणीं त्या शहाण्याला विष्टेचा प्रसाद मिळाला. म्हणून ‘ शहाण्याचें तीन ठिकाणीं ! ( गो.) शाण्याक तींकडेन, पिशाक एकेकडेन. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP