|
वि. ३ संख्या . [ सं . त्रि ; प्रा . तिण्ण ; फ्रें . जि . त्रीन ] ( वाप्र . ) ०अडकून - ( कर . ) एक वाक्प्रचार . घोटाळ्यांत पाडणे . त्या गृहस्थाने तीन अडकून सीताराम केल्यामुळे आम्हाला कोठे जाता येईना . सीताराम - ( कर . ) एक वाक्प्रचार . घोटाळ्यांत पाडणे . त्या गृहस्थाने तीन अडकून सीताराम केल्यामुळे आम्हाला कोठे जाता येईना . ०ताड - तीन ताळ उडणे पहा . उडणे - तीन ताळ उडणे पहा . ०तेरा बारा - पोकळ , गैरलागू भलभलत्या सबबी सांगणे . ( क्रि० लावणे ; मांडणे ; सांगणे ; बोलणे ) नव बारा - पोकळ , गैरलागू भलभलत्या सबबी सांगणे . ( क्रि० लावणे ; मांडणे ; सांगणे ; बोलणे ) ०तेरा तेरा , आठ अठरा वि . पांगापांग ; दाणादाण ; उध्वस्त ; फांकलेले ; पांगलेले . ०तेरा - स्त्रीअव . १ अरेरावीचे , दांडगाईचे भाषण . २ असंबद्ध , विसंगत भाषण . ३ व्यर्थ बहाणे ; केवळ सबबी ( क्रि० सांगणे ). गोष्टी - स्त्रीअव . १ अरेरावीचे , दांडगाईचे भाषण . २ असंबद्ध , विसंगत भाषण . ३ व्यर्थ बहाणे ; केवळ सबबी ( क्रि० सांगणे ). ०फातार - ( गो . ) स्वतंत्र संसार घेऊन बसणे ; तीन धोंडे मांडणे ; निराळी चूल करणे . [ फातार = फत्तर ] सामाशब्द - मांडप - ( गो . ) स्वतंत्र संसार घेऊन बसणे ; तीन धोंडे मांडणे ; निराळी चूल करणे . [ फातार = फत्तर ] सामाशब्द - ०अग्नी पुअव . त्रेताग्नि ; दक्षिणाग्नि , गार्हपत्य व आवहनीय हे तीन अग्नी . तेथ अग्नी तीन मूर्तिमंत । - एभा २४ . २२२ . ०अवस्था स्त्रीअव . बाल्य , तारुण्य वार्धक्य . ०आधार स्त्रीअव . ( धर्माचे ) श्रृति , स्मृति , पुराणे इ० आधार . ०ऋणे नअव . देव , ऋषी व पितर यांची ऋणे . ही मनुष्याने यज्ञ , स्वाध्याय व पुत्रप्राप्ति इ० नी फेडावयाची असतात . ०कर्मे नअव . दान , अध्ययन व यजन इ० ब्राह्मणांची कर्मे . ०काणे ने न्हे पुअव . ( तीन ठिपके . ) फाशांतील प्रत्येक फाशावर एक एक असे तीन संख्येचे दान . ०काळ पुअव . १ ( व्या . ) भूतकाळ , वर्तमानकाळ व भविष्यकाळ २ उन्हाळा , पावसाळा व हिंवाळा . ३ सकाळ , दुपार व संध्याकाळ . ०कोनी - स्त्री . तीन कोन असलेली टोपी . टोपी - स्त्री . तीन कोन असलेली टोपी . ०ग्राम पुअव . ग्रामत्रय पहा . ०ठिकाणी - वि . १ मान , कंबर , आणि पाय या ठिकाणी वांकडेपणा असणारा . २ ( ल . ) अतिशय कुरुप ; कुबडा . ३ ( ल . ) चिडखोर ; तिरसिंगराव ; तक्रारी ; माणुसघाण्या . वांकडा - वि . १ मान , कंबर , आणि पाय या ठिकाणी वांकडेपणा असणारा . २ ( ल . ) अतिशय कुरुप ; कुबडा . ३ ( ल . ) चिडखोर ; तिरसिंगराव ; तक्रारी ; माणुसघाण्या . ०ताळ - गोष्टी सांगणे - उडवाउडवी करुन बोलणे ; गप्पा मारणे . मगरुरपणाने अथवा उद्धटपणाने बोलणे ; गर्व वाहणे ; फुशारक्या मारणे . उडणे - गोष्टी सांगणे - उडवाउडवी करुन बोलणे ; गप्पा मारणे . मगरुरपणाने अथवा उद्धटपणाने बोलणे ; गर्व वाहणे ; फुशारक्या मारणे . ०तुकडी वि. ( को . ) ( एकदम तीन तुकडे पडणारी ) अतिशय बारीक व कमजोर ( दोरी , नाडी , फीत ). ०तुकड्यांची - स्त्री . दोन्ही हाताकरता दोन तुकडे व ( मधल्या ) सर्व अंगाचा एक तुकडा याप्रमाणे केलेली चोळी ; अखंड चोळी . चोळी - स्त्री . दोन्ही हाताकरता दोन तुकडे व ( मधल्या ) सर्व अंगाचा एक तुकडा याप्रमाणे केलेली चोळी ; अखंड चोळी . ०दाणे पुअव . तीन काने पहा . ०दिवसाचा - पु . ( ज्याचे फक्त तीन दिवसच सुतक धरावे लागते असा ) लांबचा भाऊबंद , नातेवाईक . भाऊ - पु . ( ज्याचे फक्त तीन दिवसच सुतक धरावे लागते असा ) लांबचा भाऊबंद , नातेवाईक . ०नाड्या स्त्रीअव . ( हटयोग ) इडा , पिंगला व सुषुम्ना . ०माही वि. तिमाही ; तैमासिक . ०योग पुअव . भक्ति , कर्म व ज्ञान हे योग . ०लिंगे नअव . ( व्या . ) पुल्लिंग , स्त्रीलिंग व नपुसकलिंग . ०वार पुअव . तीन आठवडे . ०स्थिती स्त्रीअव . ( पदार्थांच्या ) घन , द्रव व वायुरुप तीन अवस्था . ०हिस्से पुअव . ( चारांपैकी ) तीन भाग . ह्यावरुन आधिक्य किंवा अधिकभाग .
|