|
न. १ षडरसांतील मधुर रस . २ ( व . खा . ) मीठ . वरण अलोणी झालें गोडाशिवाय बरें लागत नाहीं . [ तुल० सं . मिष्ट - मीठ ] ३ ( वैद्यक ) पथ्याला अनुसरून मधुर किंवा साखरेनें युक्त असा पदर्थ त्या औषधास गोड वर्ज्य . - पु . ( गो . कों . ) गुळ . - वि . १ मधुर ( आंबट , तिखट , खारट नव्हे असें ); स्वादिष्ट . २ सुवासिक . ३ मंजुळ ; सुंदर ; साजिरे . ४ मृदु . ५ सौम्य . ६ सुखकारक ; संतोषदायक . मनास गोड वाटत नाहीं . ७ नीटनेटकें ; नियमित ; योग्य ; चांगले ; शुध्द ( भ्रष्ट नसलेलें ). जसें :- गोड - प्रयोग - उदाहरण - वाक्य - कवन इ० ८ ( तंजा . ) चांगलें ; सुरस , चवदार . चटणी गोड आहे . ९ औरस ( लग्नाच्या स्त्रीची ) संतति ; हिच्या उलट कडू ( दासीपुत्र - कन्या ). १० शुभदायक ; मंगलकारक . सत्वाचा गोड जाहला अंत । - विक ८ . [ सं . गुड ; प्रा . गोडु ; फ्रें . पो . जि . - गुडलो , गोळास ] ( वाप्र . ) करून घेणें - कसेंहि असलें तरी गोडीनें , चांगल्या हेतूनें स्वीकारणें ; मान देणें ; अव्हेर न करणें . गोड गुळचट - अतिशय गोड . दिल्हें घेतलें गोड - मिळून मिसळून वागणें चांगलें . पु. ( काशी ) तंगडी ; पाय . [ प्रा . दे . हिं . ] ०वणें गोडावणें - सक्रि . १ गोड करणें ; होणें , खारट , आंबट नाहीसें करणें ( जमीन , पाणी , फळें इ० ) २ मिठ्ठी बसणें ( गोड पदार्थ खाल्ल्यानें जिभेस ). ३ ( काव्य ) गोडी लागणें ; लुब्ध होणें ; लालचावणें . भक्तीचिया सुखां गोडावली । ४ पाड लागणें ; पिकणें ( फळ ). म्ह० १ गोड करून खावें मऊ करून निजावें = अडचणींतहि सोय करून घ्यावी . २ गेले नाहीं तंववर जड , खाल्लें नाहीं तंववर गोड = माहीत नसलेलें सर्वच चांगलें असतें . सामाशब्द - ०उंडी स्त्री. एक झाड . ०करांदा पु. खाण्याला गोड लागणारा करांदा ; करांदा पहा . ०गळा पु. १ ( संगीत ) गाण्याला मधुर आवाज . २ मधुर गायन , गाणें . घांस - पु . १ जेवणाच्या शेवटीं खाण्यासाठीं ठेवलेला आवडत्या पदार्थाचा घांस . २ सुग्रास ; मिष्ट भोजन . त्याचे एथें गोड घांस मिळतो , तो टाकून तुमचेकडे कशाला येऊं ? ३ अप्रिय , दु : खद गोष्टीचा शेवट गोड करणारा मुद्दा , प्रकार . ०घाशा खाऊ - वि . १ सदां गोड खाण्यास पाहिजे असा ; गोड गोड खाण्याची आवड असलेला . २ चोखंदळ ; मिजाजी . ०जेवण तोंड - न . वधूपक्षानें वरपक्षास अथवा वरपक्षानें वधूपक्षास दिलेली मेजवानी . २ मृत माणसाचें सुतक धरणार्या नातेवाइकांस आणि इष्टमित्रांस , सुतकाच्या १४ व्या दिवशीं ( सुतक फिटल्यावर ) मुख्य सुतक धरणार्यानें दिलेलें ( विशेषत : गुळाच्या पक्वान्नांचें ) जेवण . ३ पक्वान्नाचें जेवण . गोड जेवण केलें तर पाण्याचा शोष लागणारच . ०दोडकी स्त्री. ( भाजी ) घोसाळी ; घोषक यांची एक जात हिचीं फुलें पांढरीं असतात . ०धड न. नेहमींच्या पेक्षां थोडेसें गोडाचें चांगलें जेवण ; पक्वान्न ; मिष्टान्न . उद्यांसण आहे , तर कांहीं तरी गोडधड करा . ०निंब पु. ( व . ) कढीनिंब . ०बोल्या वि. मृदु , सौम्य भाषण करणारा ; तोंडचा गोड ; दुसर्याला आवडेल असेंच बोलणारा . म्ह० गोड बोल्या साल सोल्या = बोलणारा मिठ्ठा परंतु मानकाप्या . गोडरें - वि . गोड ; गोडवें . बायकां गोडरें प्रिय अन्न । - गीता २ . १७५ . गोड लापशी - स्त्री . दुधांतील लापशी ( ताकांतील नव्हे ). ०वणी स्त्री. गोडें पाणी . हिंग पडतांचि रांजणीं । गोडवणी होय हिंगवणी । - भारा बाल १० . ३६ . ०वा गोडा - वि . १ सापेक्षतेनें गोड ; विद्यमान पदार्थात - गोष्टींत अधिक , विशेष गोड . २ ( ल . ) कोरा ; असडा ; अपेट ; अस्पष्ट ; कोंवळा इ० . ३ ताजें ( पाणी , खारट नव्हे असें ); क्षारयुक्त नसणारें ; मधुर . ४ बिनकांटेरी ; किडयांना प्रिय ( झाड , वनस्पती ). ५ मऊ ; नरम ( लांकडाचा नारावांचून बाहेरचा भाग ). ६ बिन खारवट ; क्षार , लोणा नसणारी ( जमीन ). ७ गोडें ( तीळ , कारळे याचें तेल याच्या उलट उंडी , करंज यांचे कडवें तेल ). ८ सात्त्विक ; सुस्वभावी ; सौम्य ( माणूस ). ९ जितें ; जीवंत ( मांस - मुरदाड , मृत नव्हे असे ). १० सौम्य ( खाजर्या , उष्ण , तिखट , नव्हत अशा सुरण इ० भाज्या ). ११ मादक नसणारी ( हरीक , खडसांबळी इ० वनस्पतींतील प्रकार ). १२ निर्विष ( साप ). १३ कोमल ; नाजुक ; रोगाला बळी पडणारे ( शरीर , अवयव ), १४ नदींतील , गोडया पाण्यांतील ( मासा ). १५ खारवणातील नसलेलें ; गोडया जमीनींत तयार केलेलें ( गोडें भात ). १६ जिव्हाळयाचें ; नाजूक ; मर्माचें ( अंग , गोडे अंग - जांघ , यस्ती , अंड इ० ). १७ खारट नसलेला ( मराठा माणूस ), ( कडव्याच्या उलट . गोडवा - पु . स्तुति ; प्रशंसा . गोडवा गाणें गोडवे गाणें गोडवा सांगणें गोडवे सांगणें - १ दुसर्याच्यासाठीं आपण केलेल्या चांगल्या कृत्यांचा पाढा वाचणें ; ( उपकृत कृतघ्न झाला असतां विशेषत : ) दुसर्यावर केलेले उपकार किंवा अनुग्रह यांचा उपन्यास करणे ; आपलें एखाद्यावर प्रेम असून तो तें विसरला असतां त्याच्यसंबंधानें आपल्या मुखांतून निघणारे उद्गार . जिष्णु म्हणे त्वद्रचितें मज मिळतिल हे न गोडवे दास्यें । - मोआदि ३६ . ७४ . २ एकाद्याच्या कृत्यांची स्तुति करणें ; प्रशंसा करणें ; नांवाजणें . गोडवे गाणें ( सांगणें नव्हे ) - ( औप . ) कुरकूर करणें ; निंदा करणें . गोडवी गोडी - स्त्री . भूक व तोंडास रुचि असल्यानें जेवण्यासंबंधींची इच्छा ; रुचि ; याच्या उलट वीट ; कंटाळा ; तिरस्कार ; गोडशें - न . ( गो . ) मिठाई . गोडसर गोडसरसा - वि . थोडेसें गोड ; मधुर . जे आंगेंचि पदार्थ गोडसे । - ज्ञा १७ . १२६ . ०सांदणें सांधणें - न . दुधांत , गर्यांच्या रसांत तयार केलेलें ( ताकांतील नव्हे ) सांदणें . गोडासाण - स्त्री . ( गो . ) गोडी .
|