मानसगीत सरोवर - उठि उठि बा विनायका ॥ सि...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


भूपाळी

उठि उठि बा विनायका ॥ सिद्धिबुद्धीच्या नायका ॥

माता आपुली जगदंबिका ॥ तात त्रिभुवनगोसावी ॥धृ०॥

रत्‍नखचित सिंहासनी ॥ येउनि बैसे चिंतमणी ॥

करी चामरे घेउनी । अष्टांगना ढाळिती ॥१॥

चौदा विद्यांच्या आगरा ॥ मायबाप मोरेश्वरा ॥

चौदा रत्‍नांच्या सागरा ॥ खजिनदारा चौदांचा ॥२॥

स्नानसंध्या सारुनि आले ॥ द्वारी भक्त बहु तिष्ठले ॥

ताटे भरुनि आणिले ॥ मोदक लाडू तुजलागी ॥३॥

होइ जागृत चिंतामणी ॥ चुकवी कृष्णेची काचणी ॥

पुरे प्रपंच जाचणी ॥ धावे झणी वरदात्या ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-29T21:06:31.5500000