मानसगीत सरोवर - सुदिन उगवला ॥ गुरुराज भे...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


दत्ताचे गाणे

सुदिन उगवला ॥ गुरुराज भेटला ॥ अजि सु० ॥

हरपले काम क्रोध ॥ गेले सर्व विषय विरोध ॥

नच उरला द्वैत भेद ॥ तारिले मला ॥गुरु०॥१॥

पातलिसे शांति क्षमा ॥ आलि भाव भक्ति अम्हा ॥

दत्तनामि बहु प्रेमा ॥ वाढु लागला ॥गुरु०॥२॥

वाटे ब्रह्म आले हाता ॥ चुकलि जननमरणव्यथा म्हणे ॥

कृष्णा गुरुनाथा ॥ देह वाहिला ॥गुरु०॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-29T21:28:51.0870000