मानसगीत सरोवर - दत्तराज पाहे , संस्थानि क...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


दत्ताचे गाणे

दत्तराज पाहे, संस्थानि कुरुंदवाड भूपतिच्या ॥

गुरु हा राहे राहे ॥दत्त०॥धृ०॥

झग झग झग झग भगवी छाटी ॥

बघ बघ बघ बघ कटि लंगोटी ॥

भक्त जनाची निशिदिनि दाटी ॥

हो ती आहे आहे ॥दत्त०॥१॥

सर्वांगासी भस्म चर्चिले ॥

औदुंबर तरुतळवटि बसले ॥

जटामुगुटि शशिबिंबा धरिले ॥

गंगा वाहे वाहे ॥दत्त०॥२॥

कंथा झोळी त्रिशूल डमरू ॥

पायि पादुका जात श्रीगुरू ॥

भिक्षामीषे जगदोद्धारू ॥

करितो आहे आहे ॥दत्त० ॥३॥

ब्रह्मचारि हा त्रिभुवनि विचरे ॥

योगिजनाची शोधि मंदिरे ॥

काल रात्रि मी ध्यान गोजिरे ॥

स्वप्नी पाहे पाहे ॥ दत्त० ॥४॥

गाउ तरी मी कैसे तुजला ॥

ऐकुन प्रेमे यतिवर वदला ॥

प्रथम वास म्या कुरणी केला ॥

ऐसे गावे गावे ॥दत्त०॥५॥

जनन मरण मम हरण कराया ॥

भवसागर हा झणि उतराया ॥

चरणि ठाव दे मज गुरुराया ॥

कृष्णा वाहे वाहे ॥दत्त०॥६॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-29T21:35:07.8970000