मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
आरति अश्वत्था दयाळा वारी ...

मानसगीत सरोवर - आरति अश्वत्था दयाळा वारी ...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


आरति अश्वत्था दयाळा वारी भवव्यथा ॥धृ०॥

तूची ब्रह्मा तूची विष्णु तू गिरिजामाता ॥

म्हणुनि उजळिते पुजा करूनी आरति मी आता ॥दयाळा०॥१॥

मत्तनु जाणे वृक्षि श्रेष्ठ हा रे भगिनीकांता ॥

दशमाध्यायी श्रीभगवंते रणि कथिले पार्था ॥द०॥२॥

शुक बक मैना कोकिळ याते तू आश्रयदाता ॥

मधुर स्वराने गायन करिती नाठवे मनि चिंता ॥द०॥३॥

फिरति भोवती झिजविति पाया हरिसी तत्चिंता ॥

कोणा कन्या कोणा पुत्रा देशि कुणा वनिता ॥द०॥४॥

सत्कीर्तीते ऐकुनि आले पाळि बृदा आता ॥

संकट काली दुजा न वाली नमि कृष्णा ताता ॥द०॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 31, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP