मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
श्री दत्तराज भक्तकाज करित...

मानसगीत सरोवर - श्री दत्तराज भक्तकाज करित...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


श्री दत्तराज भक्तकाज करित राहिला ॥

औदुंबरतरुतळवटि अजि मि पाहिला ॥श्रीदत्त०॥धृ०॥

करि दंड कमंडलु अंगि भस्म चर्चितो ॥

जटि वाहे झूळझुळ गंगा भाळि चंद्र तो ॥

कटि कौपिनादि व्याघ्रांबर पांघरीत तो ॥

स्थिर कृष्णाबाइचा तो वेग चालिला ॥श्रीदत्त०॥१॥

शमि तुळसि बेल सुमन तया कोणि वाहती ॥

कुणि धूप दीप नैवेय प्रेमे अर्पिती ॥

कुणि नमन करुनि प्रदक्षिणा शीघ्र घालिती ॥

लोटांगण घालुनिया कोणि गाइला ॥श्री दत्त०॥२॥

दत्तध्यान बघुनि चंद्र-सुर्यतेज आटले ॥

जणु कामधेनु कल्पवृक्ष मजसि भेटले ॥

मन दुःख हरुनि समुळ पंचप्राण दाटले ॥

मायापुर षट्‌विकार वेग साहिला ॥श्री दत्त०॥३॥

कलियुगात जननितात हाचि भासतो ॥

जे शरण तया जनन मरण चुकवि खास तो ॥

त्रैमूर्ति करी मम ह्रदयी सतत वास तो ॥

म्हणे कृष्णा दत्तपदी देह वाहिला ॥श्रीदत्त०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 29, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP