मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
रामनाम भजन करी सतत मानवा ...

मानसगीत सरोवर - रामनाम भजन करी सतत मानवा ...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


रामनाम भजन करी सतत मानवा ॥स०क०॥धृ०॥

एकबाणि तो प्रभू, एकवचनि तो ॥

एकपत्‍नि राघवेश स्मर त्यजी भवा ॥भजन०॥१॥

तारिली शिळा, करी पुनित शबरिला ॥

मारुनिया ताटिकेस अभय दे जिवा ॥ भजन०॥२॥

दासमारुती प्रभु वालि मर्दिती ॥

किष्किंधे स्थापितसे शीघ्र सुग्रिवा ॥भजन०॥३॥

दशमुखासही प्रभु मारि अहि-महि ॥

बिभिषणास लंकापुरि स्थापि तेधवा ॥भजन०॥४॥

रूप साजिरे प्रभु ध्यान गोजिरे ॥

हे रामा कृष्णातरि बैस येधवा ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 30, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP