मानसगीत सरोवर - वक्रतुंड एकदंत श्रीगजानना...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


गणपतीचे गाणे

वक्रतुंड एकदंत श्रीगजानना ॥

लंबोदर गौरिकुमर चुकवि यातना ॥धृ०॥

चिंताग्नी चित्ति सदा झोंबतो अती ॥

काम-क्रोध षड्रिपु हे व्यर्थ गांजिती ॥

मायेने वेष्टियले तोडि शिघ्र ती ॥चाल॥

भ्याले, धाले, आले, शरण तुला,

देइ मला, सन्मतिला शेषभूषणा ॥वक्र० ॥१॥

त्रिभुवनात थोर तूचि अससि एकटा ॥

विषम काळ धाडि दुरीसमय ओखटा ॥

वारि मोहपाश करी मार्ग चोखटा ॥चाल॥

येई, नेई, पायी, शिवसूता अंत अता बघसि वृथा कसुनिया दिना ॥व०॥२॥

सौख्य आस धरुनि पुढे शरिर कष्टले ॥

गृह-सुत-धन-संग्रहार्थ आयुष्य नष्टले ॥

परमार्थ-स्वार्थ दो मार्गि भ्रष्टले ॥चाल॥

हारी, वारी, तारी, दिनबंधो, गुणसिंधो, नच बाधो, दुष्ट वासना ॥०॥३॥

रत्‍नखचित किरिट मस्तकी विराजतो ॥

शुंडाही शोभिवंत सिंधुरार्चितो ॥

मुक्ताफळहार कंठि बहु झळाळतो ॥चाल॥

धावे, पावे, यावे, पितवसना, हरि तृष्णा, नमि कृष्णा, ऐक प्रार्थना ॥व०४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-29T21:10:43.3330000