मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
रुचते का तीर्थयात्रा या स...

मानसगीत सरोवर - रुचते का तीर्थयात्रा या स...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


रुचते का तीर्थयात्रा या समयी अर्जुना ॥धृ०॥

हलधर हा बंधु माझा अंधसुता देतसे ॥

ऐकुनिया मात ऐसी दुःख जिवा होतसे ॥

बाळपणी वचन माते दिधले त्वा तरि कसे ॥चाल॥

ते आता, होतसे वृथा, कुंतिच्या सुता, सत्य करिताना ॥या०॥१॥

मजवरती प्रेम भारी जरि हरिचे वाटले ॥

परि बंधूपाशि त्याचे तिळभरही ना चले ॥

ये हंसा शीघ्र आता कागाकरी सापडे ॥चाल॥

नरवरा, येउनी त्वरा, हरण मज करा, यत्न करि नाना ॥या०॥२॥

ऐकुनिया शौर्य कीर्ती माळ तुला घालिते ॥

तुज वरिल पंडुपुत्रा हरिभगिनी विनविते ॥

न होई प्राप्ति तूझी त्यागिन मी प्राण ते ॥चाल॥

या क्षणी द्रुपदनंदिनी येई त्यागुनी, नेइ मज झणी, फसवि दादांना ॥या०॥३॥

हरिभगिनी भीति कागे आलो मी संकटी ॥

मी दंडवेषधारी अर्जुन हा तव तटी ॥

आलिंगी प्रेमभावे चुंबुनिया गोरटी ॥चाल॥

त्या स्थळी, वीर मंडळी, होति बहु बळी, लागता कळी, जिंकिले त्यांना ॥या०॥४॥

सुभद्रा नेलि पार्थै हे कळता हलधरा ॥

घेउनिया मुसळ हाती फिरवी तो गरगरा ॥

हरि बोले योग्य नाही शांतीते झणि वरा ॥चाल॥

प्राणि तो उपजण्या अधी, लिहितसे विधी, टळेना कधी, सत्य म्हणे कृष्णा ॥या०॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 30, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP