मानसगीत सरोवर - कलियुगात मुख्य देव दत्त र...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


दत्ताचे गाणे

कलियुगात मुख्य देव दत्त राहिला ॥

भस्मभुषित सकलतनू योगि पाहिला ॥

तनु योगि पाहिला ॥धृ०॥

वाडिक्षेत्र पुण्यवान धन्य ही क्षिती ॥

अवधूत दिगंबरा भक्त गर्जती ॥

तीन त्रिकाळींहि पुजा घेतसे यती ॥

प्रदक्षिणा धूप दीप कर्पुरारती ॥चाल॥

करी दया, अनूसुयानंदना मला ॥ प्रभो नंदना मला ॥कलि०॥१॥

घालुनि आसन औदुंबरी स्वारि बैसली ॥

पुढे कृष्णाबाइ झूळझूळ चालली ॥

तेहतीस कोटि सुरवर मंडळी ॥

पहावयासि उत्सुकले मूर्ति सावळी ॥चाल॥

प्रभो, नमो, दयानिधे वारि भवजला ॥ अता०॥कलि०॥२॥

नित्य फेरि करित हरी स्नान काशिसी ॥

करवीर क्षेत्रि मागे भिक्षा तापसी ॥

माहुरपुरी निद्रा करी दत्त रजनिसी ॥

कोटिचंद्रतेज उणे वाटते मशी ॥चाल॥

दिगंबरा, यतीवरा, प्रेमे गाइला ॥गुरू प्रेमे० ॥कलि० ॥३॥

शंख चक्र पद्म दंड हाति ते घेती ॥

थोर थोर साधुसंत दत्ता वंदती ॥

पंचविषय षड्रिपु हे झोंबती अती ॥

नमि कृष्णाबाई गुरू देई सूमती ॥चाल॥

अत्रिसुता, किति आता अंत पाहिला ॥गुरु, दाविपद मला ॥ कलि०॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-29T21:26:12.8500000