मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
हिमनगजामातनंदना ॥ सत्वर ...

मानसगीत सरोवर - हिमनगजामातनंदना ॥ सत्वर ...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


हिमनगजामातनंदना ॥ सत्वर उठा गजानना ॥

उदय झाला विधिजारमणा ॥ भानुबिंब प्रकाशले ॥धृ०॥

मूषक तिष्ठलासे द्वारी ॥ शिष्यमेळा हाका मारी ॥

अध्ययनाची वेळ झाली ॥ शिकवा चौदा चौसष्टी ॥१॥

पिवळा पीतांबर साजिरा ॥ विशाळ भाळ स्थूलोदरा ॥

मुकुट मस्तकी शिरपेचतुरा ॥ झळकति कर्णी कुंडले ॥२॥

पाशांकुश घेउनी करी ॥ मोदकावर प्रीती बरी ॥

विलसे विधिजा मांडीवरी ॥ स्कंधी तिच्या वामभुजा ॥३॥

अंगी शेंदुर चर्चिला ॥ चंदन उटी गणपतिला ॥

खाद्य नैवेद्य आणिला ॥ दूधसाखर केशरी ॥४॥

पूजापात्र घेउन हाती ॥ शमी दुर्वांकुर शोभती ॥

पंचामृत आणि आरती ॥ घेउन तिष्ठति दास तुझे ॥५॥

होई जागृत मोरेश्वरा ॥ उठी पार्वतिकुमरा ॥

बुडे कृष्णा भवसागरा ॥ पलै तिरा नेई त्वरे ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 29, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP