मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
ऋतुस्नान मंदिरात एकटी असे...

मानसगीत सरोवर - ऋतुस्नान मंदिरात एकटी असे...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


ऋतुस्नान मंदिरात एकटी असे ॥

धरुनि मूद वेणि मला ओढितो कसे ॥

नाहि सुचत काय करू लागले पिसे ॥

अंधपुत्र म्हणतो मला मांडिवरि बसे ॥चाल॥

कसे करू, कुणा स्मरू, समइ यादवा ॥अशा सम०॥

राखि लाज बंधुराज धाव माधवा ॥

दुःशासन दुष्टमती ओढि पल्लवा ॥धृ०॥१॥

भीष्म द्रोण विदुर मौन धरुनि बैसले ॥

पंडुपुत्र पंच व्याघ्र स्तब्ध राहिले ॥

नष्ट कर्ण शब्दबाण ह्रदयि लागले ॥

समय असा, जाणुनिया, तुजसि वाहिले ॥चाल॥

करि त्वरा यदुवरा, धाव बांधवा, त्वरे धाव०॥राखि०॥२॥

ऐकुनिया दीन शब्द पळतसे हरी ॥

नाभि नाभि द्रुपदसुते स्थीरता धरी ॥

नेसविता पीतवसन लाजले अरी ॥

ध्याउनि कृष्ण कृष्णि सदा प्रार्थना करि ॥

विभो नमो, प्रभो नमो, वारि या भवा ॥अता वा०॥राखि०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 30, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP