॥ श्रीगणेशाय नमः ॥
वैशंपायनासि राव पुसे ॥ कीं इतुकेदिवस वांचले कैसे ॥ मग वैशंपायन उल्हासे ॥ बोलता जाहला ॥१॥
कीं जे केदारापलीकडे जाती ॥ त्यांची आयुष्यें वाढती ॥ तिथे भुमिकेची फल श्रुती ॥ ऐसी असे ॥२॥
आतां असो हें ऐकें भारता ॥ राज्य देवोनि सुरथसुता ॥ वस्त्रालंकारीं समस्तां ॥ पूजिलें नळरायें ॥३॥
अजमढि विनवी हरिहरा ॥ तुह्मी चलाजी आमुचे नगरा ॥ येरु आनंदें ह्मणे कुमरा ॥ भाग्य माझें ॥४॥
मग निशाणा घाव देवोनी ॥ निघाले चातुरंगेंसी तत्क्षणी ॥ देव विचारितीं गगनीं ॥ कीं सोमवंशीय नृप धन्य ॥५॥
आतां हे हस्तनापुरा जाती ॥ रामासि संग्रामा उठती ॥ परि तो वैकुंठनाथ श्रीपती ॥ जिंकील यांसी ॥६॥
यानंतरें भारत बोले ॥ मुने येक मज आठवलें ॥ तरी हींव पळोनियां गेलें ॥ सामर्थें कवणें ॥७॥
मुनि ह्मणे गा विद्या सकळा ॥ विधिनें दिधल्या सोमभूपाळा ॥ त्या परंपरा सोमकुळा ॥ आल्या चालत ॥८॥
वंशीं विद्या स्थापिलिया ॥ त्या वेदमंत्रीं अनुष्ठिलिया ॥ प्रसंगीं कर्यार्थ उच्चारिलिया ॥ पळे हिमभार ॥९॥
असो चालिला समभारें ॥ लंघोनियां गिरिकंदारें ॥ वनोपवनें पठ्ठणें पुरें ॥ देशनगरीं असंख्य ॥१०॥
पातले भागीरथीतील ॥ तंव देखिलें हस्तनापुर ॥ मग उतरले चौफेर ॥ सकळ भार रायांचे ॥११॥
पूर्वीं लंका घेतली रघुनाथें ॥ मग केलें अश्वमेघातें ॥ तेव्हां हस्तनापुर नगरातें ॥ घेतलें देखा ॥१२॥
तेथें सोमवंशीचि जे होते ॥ परि बंदीं घातलें तयांते ॥ नगरीं वानरेंसीं सुषेणातें ॥ स्थापिलें देखा ॥१३॥
सुषेण राहिला सपरिवारीं ॥ राम गेला अयोध्यापुरीं ॥ ऐसीं बळकाविली नगरी ॥ राज्य करी सुखानें ॥१४॥
पुढें दिवस बहुत कमले ॥ तंव हे सोमवंशी मुरडले ॥ ते दळभरेंसीं उतरले ॥ ननरबाह्यप्रदेशी ॥१५॥
असो हे तिये अवसरीं ॥ घाडी पडली हस्तनापुरीं ॥ काळवेळे नरां नारी ॥ सांभाळवती ना ॥१६॥
येका हाका बोंबा देती ॥ येक हायहाय करिती ॥ ह्मणती घाडी आली अवचितीं ॥ गती कैसी करावी ॥१७॥
मग द्ळभारेंसीं सुषेण ॥ पाहे बाहेर येवोन ॥ तंव नगराभोंवती वेढोन ॥ उतरले सोमवंशी ॥१८॥
ह्मणोनि हेर पाठविले आयोध्यासी ॥ श्रुत करावया रामासी ॥ कीं राजे येवोनि सोमवंशी ॥ त्यांहीं नगरा वेढिलें ॥१९॥
असो बाहेरि दळ आलें ॥ तें पारकीयीं देखिलें ॥ तंव आढाऊ उठावले ॥ अबुंदें तीनी ॥२०॥
शर सुटले असंख्यात ॥ वानर उठिले अपरिमित ॥ चालिले गुंडेवरी झोडित ॥ परवीरांसी ॥२१॥
सुषेण चालिला आयणी ॥ पारके लोळविले धरणीं ॥ तिकडून असिवारीं खोंचणी ॥ केली अद्भुत ॥२२॥
वानर बहुत मारिले ॥ झोडोनि दुर्गाआंत घातले ॥ ऐसें युद्ध थोर जाहलें ॥ भयें पळाला सुषेण ॥२३॥
हा संग्राम सकळ सांगतां ॥ तेणें विस्तर जाईल कथा ॥ असो दूत भेटोनि रघुनाथा ॥ व्यवस्था सांगितली ॥२४॥
मग रामचंद्रें तत्क्षणी ॥ समस्त राजे बोलाउनी ॥ देशोदेशींचे मुकुटमणी ॥ आणिले देखा ॥२५॥
सभा केली घनदाट ॥ विचार मांडिला बळकट ॥ तंव जोडोनि करसंपुट । पुसिलें जन्मेजयें ॥२६॥
ह्मणे हो नळानघुका सवें ॥ भूपाळ गेले आधवें ॥ तरी कोठोनियां राघवें ॥ बोलाविले आणिक ॥२७॥
मग वैशंपाय न बोलिले ॥ पूर्वी सोमें राजे मेळविले ॥ तयांचे वंशज हे आले ॥ दळभारेंसी ॥२८॥
त्यांसी हनुमंतें मेळिकार ॥ दीधला अयोध्यें चौफेर ॥ आणि बोलाविले वसिष्ठादि मुनिवर ॥ रामचंद्रें ॥२९॥
तयांसि पुसे कर जोडोनी ॥ कीं कैसें आतां कीजे मुनी ॥ ते ह्मणती गा चापपाणी ॥ हें पुसावें वाल्मिका ॥३०॥
मग लक्ष्मण पाठविला ॥ तेणें वाल्मिक बोलाविला ॥ रामें नमस्कार करुनि वहिला ॥ बैसविला आसनीं ॥३१॥
तैं वसिष्ठ वाल्मिकासि ह्मणे ॥ कीं उरलें रामायण सांगणें ॥ हस्तनापुरीं आलें धांवणें ॥ सोमवंशींयाचें ॥३२॥
मग तें अग्ररमायण ॥ वाल्मिकें कथिलें असे जाण ॥ ते कथा ऐकें सावधान ॥ जन्मेजया गा ॥३३॥
वाल्मीक ह्मणे रघुनाथा ॥ सैन्येंसि जावोनि सर्वथा ॥ सोमवंशियां समस्तां ॥ जिंकावें समरीं ॥३४॥
राम उठिला भद्रीहुनी ॥ घावो दीधला निशाणीं ॥ दळ चालिलें पालाणोनी ॥ सामुग्रीसहित ॥३५॥
राम रथीं आरुढला ॥ दळभाररहित चालिला ॥ भुपाळसमुह चालिला ॥ असंख्यात ॥३६॥
ऋषीश्वर आणि वानर ॥ नरकुंजर असिवार ॥ लक्ष्मण भरतादि बंधु समग्र ॥ चालिले देखा ॥३७॥
सीता बैसवोनि सुखासनीं ॥ सवें सखिया सांगातिणी ॥ ऐसा निघाला कार्मुकपाणी ॥ शीघ्रवेगें ॥३८॥
तो पावला हस्तनापुर ॥ टाकोलें भागीरथीचें तीर ॥ तेथें मिळाले वानर ॥ द्दीपोद्दोपींचे ॥३९॥
तयांचा चरणरजधुरोळा ॥ तेणें लोप जाहला दिनकरा ॥ अजमीढा पुसे नृपवरां ॥ कीं हा धुरोला कायसा ॥४०॥
तंव वाद्यगजर आयकिला ॥ ह्मणती हा रामचंद्र आला ॥ ऐकोनियां दचक पडिला ॥ ह्मणती रहावें सावध ॥४१॥
असो पूर्वभागीं भागीरथी तीरीं ॥ रामेम मेळिकार केला परिवारीं ॥ तंव सुषेण येवोनि नरवानरीं ॥ लागल रामचरणीं ॥४२॥
रामें आश्वासोनि उठविला ॥ मग समस्तांसी भेटला ॥ सर्व वृत्तांत मनीं आणिला ॥ अजमीढाचा ॥४३॥
असो ऋषी ह्मणती रघुपती प्रती ॥ तुझेनि पूर्वजांची ख्याती ॥ महापवित्र हे भागीरथी ॥ आली मृत्युलोकीं ॥४४॥
आतां येथें स्नानं करावें ॥ मग तें मानिलें राघवें ॥ तें सपरिवारें आघवें ॥ केलें स्नान ॥४५॥
महादानादि धर्म करोनी ॥ समस्त बैसले आरोगणीं ॥ सकर्पूर विडे देउनी ॥ क्रमिली निशी ॥४६॥
इकडे अजमीढें अवधारा ॥ विचार केला सहनृपवरां ॥ कीं उदयीक संग्रामीं दळभारा ॥ सन्नद्ध कीजे ॥४७॥
असो उदेलिया दिनमणी ॥ वाद्यें लागलीं साठक्षोणी ॥ दोनी दळें संसारोनी ॥ चालिलीं युद्धा ॥४८॥
तये वाद्यगजरें ब्रह्मांड ॥ अवघें गर्जिन्नलें उदंड ॥ भय प्रवर्तलें प्रचंड ॥ सुरवरांसी ॥४९॥
ह्मणोनि ब्रह्मा रुद्र सुरवर ॥ पुसती विष्णुसि विचार ॥ कीं आंदोललें चराचर ॥ कैसा कीजे प्रयत्न ॥५०॥
तंव बोलिले नारायणें ॥ ययांचा संग्राम पाहणें ॥ मग आपणां लागेल जाणें ॥ सकळिकांसी ॥५१॥
मग ते विमानी बैसले ॥ अंतरीं देव पाहों ठेले ॥ तंव दोनी भार उठावले ॥ भागीरथीतीरीं ॥५२॥
वानर चालिले आयणी ॥ ते धनर्धरीं विंधिले बाणीं ॥ तेथ जाहली झोटधरणी ॥ उभयदळं ॥५३॥
शस्त्रशैलांचा कडकडाट ॥ पाषाणांचा सणसणाट ॥ थोर जाहला धडधडाट ॥ भडभडाट जंत्रांचा ॥५४॥
बाणांचा सुटला कडकडाट ॥ माजी पवनाचा झडझडाट ॥ पताकांचा फडफडाट ॥ हडहडाट अश्वांचा ॥५५॥
कुंजरांचा कडकडाट ॥ रथांचा होय घडघडाट ॥ अग्निबाणांचा तडतडाट ॥ थोर आट प्रर्वतला ॥५६॥
अशुद्ध पूर लोटला ॥ हांकाबोंबीं ॥ भुगोल गाजला ॥ मेदमांसाचा डोंगर जाहला ॥ भागीरथीतीरीं ॥५७॥
असो वर्णितां संग्राम ॥ विस्तारेल ग्रंथोत्तम ॥ आणि होतील थोर श्रम ॥ वाचकांसी ॥५८॥
तेव्हां सोमवंशींच्या नृपवरीं ॥ वानर मारिले कोटिवरी ॥ ओसर घेतला रामवीरीं ॥ चरण पुढें नघालवे ॥५९॥
ह्मणोनि नळ नीळ जांबुवंत ॥ अंगद सुषेण हनुमंत ॥ गवय गंधमादन अद्भत ॥ धाविन्नले सक्रोधें ॥६०॥
त्यांचा उठावा देखोनि थोर ॥ चालिले सप्तद्दीपीचे नृपवर ॥ आणिकही भूपाळ समग्र ॥ देशोदेशींचे ॥६१॥
सुबाहो त्रिमल्ल परमहंस ॥ म्लेच्छपीरु पेगांबरदास ॥ कल्याण तपोधन बीभत्स ॥ गांधोरादी ॥६२॥
कल्परुद्र जालंधर ॥ डांबिक कलंकिया कलिंद्र ॥ काळवीणा लोहदंतवीर ॥ बळिभद्र चीनेश्वर ॥६३॥
हिमध्वज नीलकंठ श्रवण ॥ मकरध्वज चांगदेव दारूण ॥ माल्यधर हर्षण नीलवर्ण ॥ नागार्जुन गुर्जरेश्वर ॥६४॥
लक्ष्मीराज सोमनाथ ॥ संकर्षण विप्रवंश अद्भुत ॥ ऐसे चालिले सैन्यासहित ॥ वनारांवरी ॥६५॥
वानरीं वृक्षेंवरीं झोडिले ॥ गिरिकपाटीं कुदिले ॥ पाषाणघाई लोळविला धरणीवरी ॥६६॥
भूपाळ घेतले जीवें ॥ सैन्य आटिलें आघवें ॥ तंव चालिले उठावें ॥ द्सरें राजे ॥६७॥
एकाक्षनंदन गदाधर ॥ महालिंग कपिलाक्षवीर ॥ घनगर्जन श्वानमुख थोर ॥ सुकरमुख हयमुखादी ॥६८॥
त्यांहीं वानर शरसंधानीं ॥ असंख्यात लोळविले धरणीं ॥ तंव हनुमंता मुख्य करोनी ॥ धाविन्नले जुप्तती ॥६९॥
राजांसि बाहुबळें कवळिती ॥ लाता चडकणा मारिती ॥ दांती नखीं विदारिती ॥ झोडोनि पुच्छीं ॥७०॥
ते अवघीचि गा धरिले ॥ नेऊनि रामसि भेटविले ॥ सैन्य असंख्यात पाडिलें ॥ भूपाळांचें ॥७१॥
रामदळींचे वानर ॥ सातक्षोणी बुडाले वीर ॥ युद्ध होवोनि घोरांदर ॥ भागीरथी माजी ॥७२॥
हें भविष्योत्तरींचें मत ॥ परि नारदपुराणीं प्रणित ॥ कीं युद्धजाहलें अपरिमित ॥ येणें विचारें ॥७३॥
मग अजमीढ कोपला ॥ नळनघुकां पाचारा दिला ॥ तयासवें विचार मांडिला ॥ ह्मणे हा जाहला अनर्थ ॥७४॥
आतां आपुलेनि दळभारें ॥ उठावा करुं येकसरें ॥ मारोनि गोलांगुळवानरें ॥ धरुं रामचंद्रा ॥७५॥
तें समस्तासि मानवलें ॥ मग निशाणीं धाव दीधलें ॥ सैन्यपरिवारें चालिले ॥ थोर अयणी ॥७६॥
तंव ते भागीरथीचे तीरीं ॥ भार देखिले वानरवीरीं ॥ हाहाःकार जाहला भारी ॥ खळबळाट प्रवर्तला ॥७७॥
तेव्हां लहुकुश रथावरी ॥ आरुढोनियां झडकरी ॥ चालिले सिंहनादगजरीं ॥ संग्रामार्थ ॥७८॥
तिकडोनि विजय उठावला ॥ बाणीं लहुकुशीम विधिता जाहला ॥ तो शरसंघ निवारिला ॥ रामात्मजीं ॥७९॥
आणिक शिरजाळीं वर्षले ॥ अवघें आकाश व्यापिलें ॥ दळ संपूर्ण भेदिलें ॥ लोळविलें धरणीं ॥८०॥
बाण नसांवरत सोडिला ॥ तेणें षट्पर्वतेश्वर पाडिला ॥ तें देखोनियां धाविन्नला ॥ नृसिंहरावो ॥८१॥
तंव तोही कुशाच्या बाणीं ॥ नृसिंह पडिला मेदिनीं ॥ मग आला धांवोनी ॥ एकाक्षरावो ॥८२॥
तो लहुवें नेहटीं विंधिला ॥ एकक्ष रणीं पाडिला ॥ ह्मणोनि चंद्रमौळीं उठावला ॥ तोही पाडिला रामत्मजीं ॥८३॥
तीनखर्वें रहवंर ॥ छपन्नकोटी असिव्नार ॥ तीसकोटी कुंजर ॥ पायदळ पद्मयेक ॥८४॥
इतुकेन द्ळभारें ॥ चौघे पडिले वसुधर ॥ येर सैन्य मोडलें सारें ॥ तें देखिलें अजमीढें ॥८५॥
बाप बापरे उठाउठा ॥ ह्मणोनि हाकारिलें सुभटां ॥ मग ते उठावतां मोठा ॥ प्रवर्तला संग्राम ॥८६॥
तेव्हां सहस्त्रकोटी पक्षी ॥ उठावले असती आवेशीं ॥ त्याहीं झडपिलें कासाविशी ॥ राजकुमरां ॥८७॥
ऐसें देखतां रामचंद्र ॥ ऋषीश्वरांसि पुसे विचार ॥ तंव वाल्मीक ह्मणे वेगवत्तर ॥ कीं चिंतीं गरुडासी ॥८८॥
रामें स्मारिला वैनंत ॥ तंव तो पातला असे त्वरित ॥ नखीं पाखीं झडपित ॥ केला घात पक्ष्यांत ॥८९॥
त वेळीं शतघुबडेश्वर ॥ वेगें चालिला गरुडासमोर ॥ उभयां संग्राम जाहला थोर ॥ मेरुमंदर आंदोळले ॥९०॥
ते दोघे झुंजती निकरीं ॥ कुमरीं रथ वेढिलें चारी ॥ भेदिले अपरिमित शरीं ॥ रामात्मजीं ॥९१॥
कितीयेक पक्षी पडिले ॥ कितीयेक गगनीं उडाले ॥ घुबडे गरुडातें झडपिलें ॥ थोर केलें कासाविशी ॥९२॥
मग रामस्मरणे शक्ती ॥ दुणावलीसें गुरुदाप्रती ॥ तेणें झडपोनि निर्घातीं ॥ पाडिला घुबडेश्वर ॥९३॥
अकरासहस्त्र पक्षि पडले ॥ देखोनि राक्षस उठावले ॥ ते गरुडें चरणीं झडपिले ॥ घातले समुद्राजीवनीं ॥९४॥
तंव पुष्करद्दीपींचा रावो ॥ वेसरनामें महाबाहो ॥ तो धांवला कवण घावो ॥ साहे तयाचा ॥९५॥
जेणें देव साठविले नासापुटीं ॥ देखोनि रामसैन्य दृष्टी ॥ सकळीं भय उपजलें पोटीं राहिले रामामागें ॥९६॥
तंव तो वेधा घालित पातला ॥ देखोनि लहुकुशीं उठाला केला ॥ बाणीं अपरिमितीं विंधिला ॥ आणि आकळिला हनुमंतें ॥९७॥
येरें फुत्कारा ओढिलें ॥ तिघे नासापुटीं सामविले ॥ तैं भरतशत्रुघ्न धांविन्नले ॥ सोडवणेसी ॥९८॥
त्यांहीं विंधिला शरसुटीं ॥ येरें श्वास ओढिला ॥ रथीं आरुढोनि धांवले ॥ गजबजिले सुरवर ॥१००॥
त्रिदेव ह्मणती आकाशीं ॥ आपण भाक दीधली सोमवंशीसी ॥ तरी जाणें साह्यर्थासी ॥ ह्मणोनि चालिले सवेग ॥१॥
नारद बद्रिकाश्रमीं पाठविला ॥ तो ऋषीश्वरां घेवोनि आला ॥ हरिहर ब्रह्मयां निघावा जाला ॥ सोमबुघेंसीं ॥२॥
पाताळाहोनि पन्नग आले ॥ रामें भार येतां देखिले ॥ मग वसिष्ठ गुरुसि पुसिलें ॥ कीं हे मीनले कवणकार्या ॥३॥
वसिष्ठा ह्मणे गा रघुनाथा ॥ हे देव सुरवर ऋषी समस्ता ॥ आले सोमवंशी साह्यर्थ ॥ विचार आतां ॥ परियेसीं ॥४॥
तुवां रथाखालीं उतरावें ॥ तिहीं देवांसि भेटावे ॥ तें मानोनियां राघवे ॥ चालिला चरणचालीं ॥५॥
मग राम हरिहरब्रह्मादिकां ॥ भेटला ऋषिपन्नगां सकळिकां ॥ देवसभा तेथेंचि देखा ॥ जाहली थोर ॥६॥
देवऋषि ह्मणती रघुपतीप्रती ॥ आतां तुवां धरावीम शांती ॥ सन्मानें भेटोयेतो भूपती ॥ अजमीढ पैं ॥७॥
येरीकडे सोमबुध आले ॥ ते नळनघुकांसी भेटले ॥ ह्मणती वॄथा अनुचित केलें ॥ चला भेटों रामासी ॥८॥
ते नळनघुक जातीकर ॥ अनुसयो लघुभृत्य वीर ॥ सुरथ अजमीढ नृपवर ॥ पूर्वजांसमवेत ॥९॥
परि परस्परें ह्मणती ॥ कैसें भेटावें रघुपतीप्रती ॥ वेसरें नाकीं घातले असती ॥ पांचहीजण ॥११०॥
ह्मणोनि वेसरे बोलविलें । तेणें पाचही काढोनि दिले ॥ रामनुज आत्मज पुढें केले ॥ हनुमंतासहित ॥११॥
येवोनि रामचंद्रजवळी ॥ अवघे लागले चरणकमळीं ॥ राम भेटला तिये वेळीं ॥ प्रेमकल्लोळीं समस्तां ॥१२॥
लहु कुशवीर आणि भरत ॥ शत्रुघ्न तैसाचि हनुमंत ॥ तयां आलिंगी रघुनाथ ॥ बैसले सभे माजी ॥१३॥
युद्धसंग्राम निवारला ॥ समस्तां हरिख जाहला ॥ महोत्साहो प्रवर्तला ॥ करिती सुखगोष्टी ॥१४॥
तंव त्रेतायुग जाहलें पूर्ण ॥ ऋषि ह्मणती रामालागुन ॥ तुमचे पुरलें गा अवसान ॥ आयुष्याचें ॥१५॥
अकरासहस्त्र वरुषें भरलीं ॥ अकरावर्षें आगळीं जाहलीं ॥ पुढें द्दपरप्रवृत्ती मांडली ॥ तरी जावें निजधामा ॥१६॥
ऐकोनि राम ह्मणे तथास्तु ॥ तुमचा बोल करणें सत्यु ॥ मग देवासहित रघुनाथु ॥ स्नान करी भागीरथीयें ॥१७॥
ब्रह्मा ह्मणे जी रघुवीरा ॥ करीं स्वर्णपुतळ्या सोळासहस्त्रा ॥ त्या समर्पितां द्दिजवरां ॥ पुढें बरवें होइल ॥१८॥
येरें सोळसहस्त्र कामिनी ॥ सुवर्णाचिया घडवोनी ॥ त्या ब्राह्मणांसि तत्क्षणी ॥ दीधल्या दान ॥१९॥
ब्राह्मण आशीर्वाद वदती ॥ कीं पावसे सोळासहस्त्र युवती ॥ अष्टभोगीं पूर्णस्थिती ॥ होईल तुज द्दापारीं ॥२०॥
मग हनुमंत पाठवोनी ॥ सीता आणिली मेळिकाराहुनी ॥ रामसीता शेषशयनीं ॥ बैसलीं राजलीले ॥२१॥
वानरजुप्तती सहित ॥ चराणासि लागले समस्त ॥ जयजयकारें स्तवित ॥ हनुमंतादी ॥२२॥
राम ह्मणे हनुमंतासी ॥ तुज मी द्दापारीं भेटेन निश्चयेंसीं ॥ अर्जुनें करितां सेतुबंधासी ॥ तियेसमयीं ॥२३॥
जाबुवंता ह्मणे ॥ चापपाणी ॥ तवकन्या पणींन भेटीं देवोनी ॥ वानरां ह्मणे गोपाळ होवोनी ॥ तुह्मी गोकुळीं अवतरावें ॥२४॥
भरतशत्रुघ्न बोलाविले । लहुकुशांतें ह्मणितलें ॥ तुह्मी राज्य करा आपुलें ॥ जारे वहिले अयोध्यें ॥२५॥
कुशांतें राज्य देउनी ॥ लक्ष्मणा ह्मणे कार्मुकपाणी ॥ आतां ज्येष्ठपण तुजलागोनी ॥ द्दापारी सत्य होइल ॥२६॥
ऐसी निवडी करोनि व्यवस्था ॥ नेत्रें खुणाविली सीता ॥ मग लक्ष्मणा भेटोनि तत्वता ॥ धरिलें मौन रावलें ॥२७॥
सकळ दाटली करुणारसीं ॥ कोणी न बोले कवणासी ॥ तटस्थपणें रामासी अवलोकिताती ॥२८॥
मग षटचक्रातें भेदोनी ॥ ब्रह्मांडांते अतिक्रमोनी ॥ ब्रह्मरंघ्रातें भेदोनी ॥ निघाली आत्मज्योती ॥२९॥
तियें शरीर जाळिलें दीप्ती ॥ प्रकाश न माय गगनपंथीं ॥ ऐसा निजस्थानीं रघुपती ॥ गेला स्वदेहेंसीं ॥३०॥
तंव त्या आधींच लक्ष्मण जानकीं ॥ देह त्यजियेले गुणलक्षीं ॥ सामावलीं आदिपुरुषीं ॥ एकतत्वें पैं ॥३१॥
ऐसा मावळला रामचंद्र ॥ सूर्यवंश प्रकाशदिनकर ॥ पडला त्रैलोकीं अंधकार ॥ सोज्ज्वळ वैकुंठ जाहलें ॥३२॥
तंव भारत ह्मणे मुनीश्वरासी ॥ सन्यासी ह्मणती रामचंद्रासी ॥ तरी कवणिये गतीसीं ॥ घडल संन्यास रामचंद्रा ॥३३॥
वैशंपायन ह्मणे भारत ॥ मुख्य संन्यास तो रघुनाथा ॥ जो बीजरुपें दैवतां ॥ तारक राम ॥३४॥
तयासि दंड काष्ठ नसतां ॥ परि तो मान्य गा समस्तां ॥ तारक सकळां जीवजातां ॥ उक्त नारदपुराणीं ॥३५॥
असो रामलक्ष्माण आणि सीता ॥ सामावलीं युगपूर्णतां ॥ अंधकार पडला सर्वथा ॥ ऋषिसुरवरी ॥३६॥
तैं कुशलहु आणि भरत ॥ शत्रुघ्नादि परिवार समस्त ॥ पामकिले सन्मानें उचित ॥ ते चालिले अयोध्येसी ॥३७॥
हनुमंत पामाकिला लंकेसी ॥ वानर गेले स्वस्थानासी ॥ समस्तभूपाळ स्वस्वदेशीं ॥ हरिहरादि पामकिले ॥३८॥
रामें बंदिशाळे होते घातले ॥ ते अवघे पूर्वज सोडविले ॥ मग ते शीघ्र येवोनि भेटले ॥ सोमबुधादिकां ॥३९॥
महोत्साहें हस्तनापुरी ॥ श्रुंगारिली गुढीयामखरीं ॥ तेव्हां सोम विनंती करी । देवांसि देखा ॥१४०॥
आतां अजमीढासि राज्य देणें ॥ आमुचा वंश स्वर्गीं नेणें ॥ तिही देवीं दीधलें तत्क्षणें ॥ राज्य अजमीढासी ॥४१॥
ऋषी आशिर्वाद देउनी ॥ निघोनि गेले बद्धिकावनीं ॥ ब्रह्मादिकही स्वस्थानी ॥ गेले मग ॥४२॥
तैसेचि सोमबुधांसहित ॥ चालिले सोमवंशी समस्त ॥ सुरवर विमानाश्रित ॥ गेले स्वर्गलोकीं ॥४३॥
पुरुरवा गव्यअल्य वीर ॥ नळ नघुअक जातीकर ॥ अनुसयो लघुभुत्य सुरथ शीघ्र ॥ गेले सकुटुंबे ॥४४॥
तो अनमीढ हस्तनापुरीं ॥ स्थापिला सोमवंशींचा क्षेत्री ॥ आतां कथा वर्तली पुढारी ॥ ते सांगेल मधुकरकवी ॥४५॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ अष्टमस्तबक मनोहरू ॥ रामसोमवंशयुद्धप्रकारू ॥ त्रयोदशाध्यायीं कथियेला ॥१४६॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥