मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|कथाकल्पतरू|स्तबक ८|
स्तबक ८ - अध्याय १

कथाकल्पतरू - स्तबक ८ - अध्याय १

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ ओंनमः परमात्मने पुराणपुरुषोत्तमाय ॥

जयजयाजी परात्परा ॥ शक्तिमता चक्रधरा ॥ सच्चिदानंदा ॥ सर्वेश्वरा ॥ कैवल्यस्वरूप ॥१॥

जय अनादिसिद्धा अनंता ॥ गुणधर्मा अलंकृता ॥ अजरामरा अव्यक्ता ॥ निरावयवा तुं ॥२॥

जय निराधारा निराकारा ॥ शुद्धबुद्धा सर्वाधारा ॥ नित्यमुक्ता कृपाकरा ॥ सर्वातीता ॥३॥

जयजय भक्ताताराणा ॥ स्वरुपानंदाकारणा ॥ व्यक्तिमत्ता जीवोद्दरणा ॥ सृष्टिकरका ॥४॥

जयजय चतुर्युगावतारा ॥ चतुःपदार्थविस्तारा ॥ ब्रह्मविद्यासागरा ॥ प्रकाशका तुं ॥५॥

अनंतभेदा अनंतलीला ॥ मूळाकारणा अनंतकळा ॥ ज्ञानप्रबोधा गोपाळा ॥ वरदायका ॥६॥

जयजय हो मंगळमूर्तीं जय अनपेक्षादिवृत्ती ॥ परममार्ग परमगती ॥ शरण तुज मी ॥७॥

तुझी करावया स्तुती ॥ पवाडू नाहीं वेदांप्रती ॥ लक्षा न येसी मूळप्रकृती ॥ चकित परावाचा ॥८॥

तेथें ब्रह्मादिकां देवां ॥ आणि अज्ञमूढ जीवां ॥ जडप्रपंची आह्मां सर्वा ॥ केवीं स्तव्य होसी ॥९॥

परि मूळीं जीवोद्धरणार्थ ॥ तुवां रचिलें सृष्टितें ॥ मग धरिलें अवतारातें ॥ प्रति युगी ॥१०॥

देवोनि जीवांसि सन्निधान ॥ उपदेशिलें परम ज्ञान ॥ भक्तिवैराग्य साधन ॥ आचारविचार ॥११॥

नीचयोनींत स्वरूपें धरोनी ॥ अनुसरविले भक्त ज्ञानी ॥ अविद्यबंध छेदुनी ॥ प्राप्ति पावविले ॥१२॥

ऐसा देव तूं सर्वकर्ता ॥ परमार्ग प्रतिष्ठिता ॥ गृह्यद्रुह्या प्रकाशिता ॥ कवीश्वरांसी ॥१३॥

प्रकट व्हावया गुप्त गुण ॥ घातलें ज्ञाननेत्रीं कृपांजन ॥ दाविलें कैवल्यनिधान ॥ कृपावशें ॥१४॥

ऐसें तुझेनि सामर्थ्यें ॥ अलंकारिलें जयातें ॥ तेचि स्तविती सिद्धांतमतें ॥ तुजलागोनी ॥१५॥

तूंचि सकळगणांचा ईश ॥ ह्मणोनि नाम साजे गणेश ॥ ज्ञनाकुंशे करिसी नाश ॥ अविद्येचा ॥१६॥

विज्ञानकुसुमांची माळा ॥ अखंड साजे तुझिये गळा ॥ स्वयंप्रकाश वसे जवळां जीवनकमंडलु ॥१७॥

कृपाळुत्व नागबंध ॥ प्रवृत्तिमूषक संन्निध ॥ सिद्धिबुद्धी संबंध ॥ करुणालया ॥१८॥

प्रेमवारुना मोदक करीं ॥ दिव्य दीव्यत्व परिकुसरी ॥ तुझी श्रृंगारगतिपरी ॥ अलक्ष्य सकळां ॥१९॥

झळंवावलोकनदृष्टी ॥ ते शारदा श्यामा गोरटी ॥ जे प्राप्ति करी आदिपीठीं ॥ विरक्तानुरक्तां ॥२०॥

ब्रह्मविद्या परावाणी ॥ वीणापुस्तक पाणी ॥ सारासार परमगुणी ॥ हंसवाहक जियेतें ॥२१॥

ऐसा तूंचि परमपुरुष ॥ आणि तूंचि आदिगणेश ॥ सारवस्तु दाता परेश ॥ ह्मणोनि तुंचि शारदा ॥२२॥

तूं परावर निर्बंधी ॥ त्रयमूर्तीं सच्चिदानंदादी ॥ युक्तविभाग त्रिभेदीं ॥ प्रकाशलासी ॥२३॥

ह्मणोनि प्रबुद्ध परस्परें ॥ स्फूर्तिउन्मेषचेनि भरें ॥ स्तविती आचारविचारें ॥ तुजलागोनी ॥२४॥

तयांचिया संगतीं ॥ मज त्रिपथा जाहली प्रात्पी ॥ ह्मणोनि आकांक्षा चिंत्तीं ॥ जाहली उत्पन्न ॥२५॥

काहीं करावें कवित्व ॥ जेणें पाविजे शुद्धत्व ॥ सफळ होइजे जीवित्व ॥ संसारामाजी ॥२६॥

ह्मणोनि शरण रिघालें तुज ॥ चिंतनीं दृढ आदिबीज ॥ लाहावया कवित्व भोज ॥ करितसें काकुळती ॥२७॥

परि माझी केतुली शक्ती ॥ जे म्यां करावी भजनस्तुते ॥ तरी आतां कैवल्यपती ॥ देई वरदान ॥२८॥

तूं अनाथांचा नाश ॥ आर्तवत्सल पूर्णमनोरथ ॥ भक्तगणागणनाथ ॥ सारवस्तु शारदा ॥२९॥

ऐसें आइकोनि स्तवन ॥ अंतरीं प्रकाशले गजवदन ॥ ह्मणती सिद्धांतबोधें कथन ॥ करी गुप्त प्रकट पैं ॥३०॥

ऐसें लाधलें वरदान ॥ आदि गुरुमुखप्रमाण ॥ मग आरंभिलें कथन ॥ कल्पतरूचें ॥३१॥

मागां अष्टादशपुराणीं ॥ व्यास बोलिले संस्कृतवाणी ॥ आणिक लक्ष भारत मांडणी ॥ इतिहाससंहिता ॥३२॥

तैसेचि वाल्मिक वसिष्टांदिक ॥ अठयायशीसहस्त्र ऋषि सकळिक ॥ ग्रंथ बोलिले पृथक्‌पृथक ॥ नानाविध ॥३३॥

शास्त्रप्रकरणें संहिता ॥ इतिहास आख्यानें प्रबंधकथा ॥ काव्यें व्याकरणें खंडें गाथा ॥ निबंध आगमादिक ॥३४॥

पटलें आणि मंत्र तंत्रें ॥ सिद्धांतभदे मतांतरें ॥ निर्णय वाद कल्पकरणे अपारें ॥ ज्योतिशादिक ॥३५॥

वैदक प्रस्थानें प्रसंग अवसर ॥ अध्यात्म अजप निरुपण निर्धार ॥ कृतविरचित पंजर ॥ धेनु चिंतामणी ॥३६॥

भाष्य भाषा आणि कवित ॥ नानाविध पुस्तकें ग्रंथ ॥ ऐसें विस्तारलें अनेकमत ॥ सृष्टिमाजी ॥३७॥

यांत एक देवताकृत ॥ ऋषिदिगंबर प्रणीत ॥ धीट पाठ प्रसाद पंडित ॥ ऐसा शब्दविस्तार ॥३८॥

अनंतशास्त्रें विद्या बहुता ॥ स्वल्प आयुष्य बहुविघ्नता ॥ ह्मणोनि सुख न लाहिजे पाहतां ॥ सकळसृष्टी ॥३९॥

तरी या सर्वामाजी सार ॥ तें येकत्र व्हावें समग्र ॥ जें ऐकतां खेवीं पसर ॥ हों य जाणपणा ॥४०॥

ह्मणोनि कवि कृष्णयाज्ञवल्की ॥ जयां अखंड वास नासिकीं ॥ त्यांहीं ग्रंथ केला कौतुकीं ॥ शोधोनि मतें ॥४१॥

नाम ठेविलें कथाकल्पतरू ॥ संकलितमार्गें न करी विस्तारू ॥ ओंवीप्रबंधें मनोहरु ॥ महाराष्ट्राभाषा ॥४२॥

तयाचा पुष्पघोंस उल्लांसु ॥ सातां स्तबकां चढविला वासु ॥ पुढें आठवियाचा उद्देशु ॥ धीरला मनीं ॥४३॥

तंव जाहलें देहावसान ॥ नव्हेचि कल्पतरु संपूर्ण ॥ राहिलेंसे कथाकथन ॥ बहुतांपरी ॥४४॥

यास्तव तोचि संपूर्ण करावा ॥ कथासमुह मेळवावा ॥ ह्मणोनि आह्मीं मांडिला आघवा ॥ पुढील ग्रंथ ॥४५॥

परि आधीं खलदुर्जन ॥ नमस्कारूं भयाभेण ॥ नातरी तो करील विघ्न ॥ दॄष्टपणेसीं ॥४६॥

तर्क वितर्क युक्ति आणोनि ॥ ठाकेल बाहू थापटोनी ॥ पापभय न विचारी मनी ॥ दोषात्मक ॥४७॥

तुज नमस्कार करूं रे नष्टा ॥ तुझा मज उपकार येक मोठा ॥ कीं तुझेनि धाकें गोमटा ॥ होईल ग्रंथ ॥४८॥

परि जेथें कथा नायक सर्वेश्वर ॥ तेथे खळ दीनरंकपामार ॥ कीं कुंजरापुढें उन्मत खर ॥ केविं उभा राहे ॥४९॥

जो सभेमाजी बैसोनी ॥ आइकेल खलत्व सांडोनी ॥ तोचि सत्पुरुषज्ञानी ॥ बोलती शास्त्रज्ञ ॥५०॥

ह्मणोनि तया करूनि नमन ॥ मग वंदूं संतश्रोतेजन ॥ त्यांचेनि प्रसादें कथन ॥ होईल हरिप्रिय ॥५१॥

तुमचा आधार थोर आहे ॥ तेथें खळ बापुडा काय ॥ विरुद्ध बोलतां पडेल घाय ॥ तोडिचा तों डीं ॥५२॥

तंव खळ आणिक संत ॥ प्रसन्न जाहले समस्त ॥ ह्मणती पूर्ण करीं रे ग्रंथ ॥ कवीश्वरा तूं ॥५३॥

जो शास्त्रक्रमासि मिळेल ॥ तोचि संदेह पुशील ॥ अयुक्तवादें न करिजेल ॥ मिथ्या तोंडपिटी ॥५४॥

ऐसें प्रसन्नत्व लाहोनी ॥ वक्ता आनंदला मनीं ॥ मग बोलिला सद्दचनीं ॥ श्रोतयांप्रती ॥५५॥

आइका कविकुळान्वयो ॥ वंश गोत्र नाम ठावो ॥ आदिअवसान सद्धावो ॥ संक्षेपोक्ती ॥५६॥

तरी गोदेच्या उत्तरतीरीं ॥ तपती दक्षिणतीरामाझारी ॥ बागुलदेश निरंतरी ॥ नांदत असे ॥५७॥

तेथें जगप्रसिद्ध मनोहर ॥ शोभायमान गिरिवर ॥ शैल आणि मयुर सुंदर ॥ पर्वत दोनी ॥५८॥

तये मयुरद्रिपाठारीं ॥ वाटिका नामें वसे नगरी ॥ तेथें राज्य करी सपरिवारीं ॥ नारायणश्याहा ॥५९॥

सोमवंशीं राठोडरावो ॥ वासिष्ठगोत्रीं महाबाहो ॥ प्रजापाळक सद्भावो ॥ क्षात्रधर्मीं तत्परू ॥६०॥

तया नारायणाची कुलांगना ॥ गंगा नामें पवित्र जाणा ॥ पतिव्रता सद्वासना ॥ धर्मपरायण ॥६१॥

आणि जाणिजे प्रथम कुमरु ॥ प्रतापश्याह राजेंद्रु ॥ द्सरा बंधु पवित्र ॥ हरिबा नामें ॥६२॥

तो प्रतापश्याह तपिन्नला ॥ अरिवर्ग आपुला मर्दिला ॥ जाणों प्रद्युम्र अवतरला ॥ नरवररुपें ॥६३॥

शौर्येदार्यें गंभीर ॥ अष्टभोगीं पुरंदर ॥ नीतिमागें प्रतापेंद्र ॥ राज्यभार चालवी ॥६४॥

तयाची कुळधर्मकांता ॥ ह्मांबाइ नामें पतिव्रता ॥ राणियांमाजी परिवारमाता ॥ पटवर्धिनी ॥६५॥

आहिल्या द्रौपदी मंदोदरी ॥ सीता तारांची साजे परि ॥ तिया कवळिल्या संसारीं ॥ हे निर्दोष सर्वाथीं ॥६६॥

इयेचे उदरीं सुंदर ॥ दोघे जन्मले दिव्य कुमर ॥ राजा बहिरामश्याह मनोहर ॥ दुसरा जयदेव नामें ॥६७॥

ते मज पाहतां रत्‍नें दोनी ॥ परि हे उपमा दिसे हीनी ॥ रत्‍नें तोलिती ताजवां घालोनी ॥ मग तीं मोलावती ॥६८॥

यांचिये तुलनें तोलिता ॥ न दिसे त्रैलोक्यीं धांडोळितां ॥ ह्मणोनि अमोल रत्‍नें तत्वतां ॥ चिंतामणीपरिस ॥६९॥

तो जयदेवराया हरिभक्त ॥ शौर्यदार्थें आलंकृत ॥ बहिरामश्याह नीतिमंत ॥ महाराजा ॥७०॥

दोघे अष्टगुणीं आथिलेती ॥ परि येथ श्रोते आक्षेपिती ॥ कीं मूळीं त्रुगुणनिष्पत्ती ॥ केली परमेश्वरें ॥७१॥

तरी अष्टगुण ते कैंचे ॥ हें ऐकतां न वाटे साचें ॥ ह्मणोनि उत्तर देऊं ययाचें ॥ न्यायबुद्धीअनुसार ॥७२॥

अष्टौगुण महेश्वरीं असती ॥ ऐसें बोलती शास्त्रें स्मृती ॥ तया अनंताची गुणगणती ॥ कवण करूंशके ॥७३॥

ते आपुले अष्टगुण कॄपावंतें ॥ दीधलें दोघांही बंधूतें ॥ प्रजापरिवार पाळणार्थें ॥ जैसें रामलक्ष्मण ॥७४॥

सत्वें तरी युधिष्ठीर ॥ पराक्रमें कीं अर्जुनवीर ॥ बळें तरी वृकोदर ॥ कर्ण औदार्यत्वें ॥७५॥

धरणीचें असे धैर्यत्व ॥ समुद्राचे अगाधत्व ॥ मेरुमंदारांचे अचलत्व ॥ दीधलें परमश्वरें ॥७६॥

आणिक अपार गुणगण ॥ सौंदर्यत्त्वें तरी मदन ॥ अष्टभोगी जगज्जीवन ॥ विचरे मृर्तिमंत ॥७७॥

रागरा गांगीं विवेक ॥ कळाकुशळत्व अनेक ॥ चित्र चित्रामंदादिक ॥ आथिले गंधर्व ॥७८॥

आचारत्व ब्रह्मयाचें आणि सधनत्व कुबेराचें ॥ प्रजापतप्तत्त्व सूर्याचें ॥ हिमांशूचें शीतळत्व ॥७९॥

सत्तेनें आथिला इंदु ॥ अकल्पितदाता कल्पतरू ॥ शरणागतां अभयंकरु ॥ जैसा उमाकांत ॥८०॥

दुसरें वाचेसि अविकलत्व ॥ शंकाराचें निर्लोभत्व ॥ राज्यभोगीं संपूर्णत्व ॥ जैसे सुरपतीचें ॥८१॥

प्रकाशकत्वें भास्करू ॥ प्रज्वलनीं कीं वैश्वानरु ॥ ऐसिया गुणांचा समुच्चाकारू ॥ दिसे बंधूवर्गीं ॥८२॥

कीं जे राजविष्णुअंश ॥ तेथें सकळगुणांचा प्रकाश ॥ जया देखतांचि उल्लास ॥ सकळराजयां ॥८३॥

तो बहिरामश्याह नृपवरु ॥ आर्तजनांसि अभयंकरु ॥ क्षात्रधर्मी तत्परु ॥ अखंडित ॥८४॥

नित्य भुजी शस्त्रें तुळित ॥ प्रतापें मिशिया चाळित ॥ ज्याचा न समाये पुरुशार्थ ॥ भूमंडाळीं ॥८५॥

राज्यीं बैसतांचि तत्क्षणीं ॥ अरिवर्ग लोळविले धरणीं ॥ भय मानिताति मनीं ॥ वैरीपूर्ण ॥८६॥

जेणें पूर्वजांची पिढी ॥ दुणाविली अंगप्रौढीं ॥ स्वर्गलोकीं उभाविली गुढी ॥ अंगणामाजी ॥८७॥

असो हेंकराया गुणधर्णना ॥ मज कैसें पूर्ण ज्ञान ॥ हें म्यां केलें लेंकुरपण ॥ त्री न कोपावें सज्जनीं ॥८८॥

तो नारायण प्रतिपाळक ॥ मस्तकीं ठेवोनि अभय हस्तक ॥ चरणाजवळीं रक्षिला सेवक ॥ महादेव नावें ॥८९॥

पितया स्वर्गवास ॥ जाल्यानंतरें ॥ प्रतापश्याह नृपवरें ॥ प्रतिपाळिलें अभयंकरें ॥ राज्यकारणार्थीं ॥९०॥

तयाउपरी शौर्यवंतें ॥ बहिरामश्याह नृपनाथें ॥ अभय देवोनि माघवातें ॥ रक्षिलें जवळी ॥९१॥

आतां खैरकार सोमवंशीं ॥ शिवराम नावें गुणधर्मराशीं ॥ तयापासोनि चाहिजीकुशी ॥ जाहला जन्म ॥९२॥

नाव ठेविलें महादेव आत्मजीं ॥ अखड वास मोहरी माजी ॥ प्रौढबुद्धी राज्यकाजीं ॥ हरिभक्तितप्तरा ॥९३॥

तयासि काव्यधर्मी अपेक्षा ॥ मनीं उपजली परियेसा ॥ ह्मणोनि सुनीळा परमपुरुषा ॥ ध्याइलें अंतरीं ॥९४॥

तंव तो जाहला प्रसन्न ॥ दीधलें काव्यधर्मस्फूर्तिज्ञान ॥ ह्मणोनि आरंभिलें कथन ॥ कल्पतरूचें ॥९५॥

गुरुकृपा तें जीवन ॥ भुमिका तरी शुद्ध मन ॥ तेथें कवित्व बीज जाण ॥ विरुढलेसें ॥९६॥

सागों मूळाचा प्रकारु ॥ बुद्धिप्रवर्तक विस्तारु ॥ मग कथेचा कल्पतरु ॥ विस्तारला कैसा ॥९७॥

गगनापरिस गहनता ॥ दिव्यपणें विप्तन्नता ॥ अष्टमस्तबक विशालता ॥ पुष्परस तारे ॥९८॥

अमरत्वफळ चंद्र पाझरे ॥ तृप्त करी कर्णचकोरें ॥ मुद्राभेद करील पुरे ॥ जाणिवेंसी ॥९९॥

त्वचा अक्षमाला पवनु ॥ ऐसा हा कल्पद्रुम पूर्णु ॥ निववी श्रोतयांची तनु ॥ क्रिडतां येथ ॥१००॥

दुसरें साहित्य परियेसा ॥ कल्पतरु ॥ उपजला कैसा ॥ अष्टमस्तबकीं अष्टदिशां विस्तारलासे ॥१॥

कवीश्वर ते धरणी जाण ॥ बीजनिक्षेप ईश्वरज्ञान ॥ गुरुकृपा तें मूळीं जीवन ॥ पूर्वाधिकारु ॥२॥

फूटला उत्साहाचा अंकुरु ॥ विरुढला कथाकल्पतरु ॥ त्याचा प्रतिपाळू बनकरु ॥ वनमाळी तो ॥३॥

बुद्धित्वचा या वृक्षासी ॥ अष्ट सात्विकडाहळे परियेसीं ॥ प्रसंगफांटे अष्टदिशीं ॥ वोंवियां पर्णपल्लव ॥४॥

अक्षरें तीं सुमनभार ॥ स्तबक बोलिजे समूहाकार ॥ नवरस आमोद परिकर ॥ अर्थ सुगंध परिमळू ॥५॥

प्रीतिभाव पराग देखा ॥ भ्रमरश्रोते श्रवणें आइका ॥ मोक्षप्रेमफळें वृक्षा ॥ आलीं नवविधभक्तीचीं ॥६॥

ऐसा कल्पतरु विस्तारला ॥ समुळ फळभारीं दाटला ॥ तो मागांचि सासिन्नला ॥ सातांही स्तबकीं ॥७॥

असो आठवा स्तबक आतां ॥ सांगेन उर्वरित कथा ॥ नवरसीं संयक्तता ॥ रागनामरूपें ॥८॥

रागेंविणा वक्तृत्व गायन ॥ जांणों तें स्मशानींचें रुदन ॥ नातरी स्वरलापकरण ॥ रासभाचें ॥९॥

ह्मणोनि राग रस आणि कथा ॥ तिन्ही मिश्रओघ त्रिपथा ॥ ऐकोनि होतसे शुद्धता ॥निवे अंतर्बाह्य ॥११०॥

जिये कथे जो युक्त रसु । तेथ तोचि रागप्रकाशु ॥ करितां होय संतोषु ॥ सभा डोले आनंदें ॥११॥

तरी श्रुंगाररसीं अवधारीं ॥ श्रीराग कल्याण जयतश्री ॥ पूर्वी सारंग गौडी सुंदरी ॥ नटनारायण ॥१२॥

हास्यरसीं वसंत मारुणी ॥ काफी रामकली हुसेनी ॥ वक्तृत्व कीजे आलापोनी ॥ दाटे आनंदाब्धिभरितें ॥१३॥

करुणी पंचम आसावरी ॥ तोडी वैराटिका रामकरी ॥ मारु जैतश्री धनाश्री ॥ गौडी आणि केदारा ॥१४॥

रौद्ररसीं भैरव जाण ॥ नाठ सोरठी शंकराभरण ॥ मालव आणि गौडीप्रमाण ॥ आलापिजे ॥१५॥

वीररसीं मेघराग मारु ॥ सिघोडा आसावरी मल्लरु ॥ केदार वैराटिका बिलावरु ॥ रससमुद्र दाटेल ॥१६॥

भयानकी अवधारीं ॥ भैरव सुहामाल श्री ॥ मारु वैराटी आसावरी ॥ मधुमाधवी पैं ॥१७॥

बीभत्सरसीं अवधारा ॥ नट नारायण केदारा ॥ विभास मारुणी मल्लारा ॥ आळवीजे ॥१८॥

अद्भुतरसीं श्रीरस ॥ गौडी कानडा सारंग ॥ हिंदोळ काफी नवरंग ॥ आलंकृत ॥१९॥

शांतरसीं नटनारायण ॥ सांवेरी बिलावर धनाश्री जाण ॥ ऐसें नवरसीं रागप्रमाण ॥ आळविजे कवीश्वरीं ॥१२०॥

यया रसरागांच्या ठायीं ॥ जयां चातुर्यता ज्ञान नाहीं ॥ ते कथा श्रवणें न निवती कांहीं ॥ पशुवत प्राणिये ॥२१॥

आतां असोत हीं उत्तरें ॥ भरला रसु नावरे ॥ माजी अष्टमस्तबक फुलभारें ॥ दाटलासे ॥२२॥

जनमेजय वैशंपायन संवाद ॥ तो सांगिजेल कथाप्रबंध ॥ जो ऐकतां होय आनंद ॥ श्रोतयांसी ॥२३॥

जे भुक्तिमुक्ति प्रदायिनी ॥ अंतर्बाह्य संजीविनी ॥ ते कथा ऐकिजे संतजनीं ॥ दत्तचित्तें ॥२४॥

प्रथमारंभी अलंकारु ॥ कृष्णयाज्ञवल्की नामोच्चारु ॥ विशेषिला तो विचारु ॥ अवधारिजे ॥२५॥

मागील भलतैसा कवीश्वरु ॥ परि तो प्रस्तुतकवीचा गुरु ॥ तरी मूळीं कर्ता कल्पतरु ॥ कृष्णयाज्ञवल्की ॥२६॥

वर्णा विप्रगुरु असे बोलिला ॥ ह्मणोनि अर्थ प्रतिष्ठिला ॥ म्ग अग्रग्रंथ मेळविला ॥ कल्पतरुंमाजी ॥२७॥

तरी हा याज्ञवल्की नामें ॥ ग्रंथ विशेषला अनुक्रमें ॥ श्रोती अवधान द्यावें प्रेमें ॥ ह्मणे मधुकरकवी ॥२८॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ अष्टमस्तबक मनोहरु ॥ मंगलाचरणरु कविप्रकारु ॥ प्रथमोध्यायीं कथियेला ॥१२९॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP