॥ श्रीगणेशाय नमः ॥
पराशरासि सकळ मुनिवर ॥ ह्मणती सांगा पुढील चरित्र ॥ काय करिता जाहला नृपवर ॥ जन्मेजयो ॥१॥
मग पराशरू बोलिले ॥ रायें यज्ञाचें विचारिलें ॥ आणि ब्राह्मण बोलाविले ॥ अथर्वणवेदी ॥२॥
तयां षोडशोपचारें ॥ पूजोनि वहिलें ॥ व्यासवाक्य निवेदिलें ॥ तंव ते ह्मणती आह्मां मानलें ॥ करूं सर्पहवन ॥३॥
आह्मी आपुलें मंत्रबळें ॥ आकर्षोनि नव नागकुळें ॥ होमोनि करूं येकेचि वेळे ॥ शांत राया ॥४॥
असो मुहूर्त निर्धारिला सत्वरीं ॥ श्रावणशुद्ध पंचमी रविवारीं ॥ पश्चिमदिशे सर्वोपचारीं ॥ चालिला रावो ॥५॥
परिक्षिती जाळिला होता जेथें ॥ विस्तार्ण मंडप घातला तेथें ॥ निर्मिलें कुंडवेदिकांतें ॥ पर्वतशिखरीं ॥६॥
समिधा तिळ आज्य मेळविलें ॥ भोवतें भूमिशोधन केलें ॥ नवग्रहांसी स्थापिलें ॥ मांडिला पूर्णकलश ॥७॥
रायासि बांधिलें कंकण ॥ केलें अग्नींचें आवाहन ॥ ऋत्विज ह्मणतां मंत्र पूर्ण ॥ आकर्षिले दिक्पाळ ॥८॥
तंव साकारमूर्ती वन्ही ॥ प्रकट जाहला कुंडांतुनी ॥ रायासि ह्मणे आशिर्वचनीं ॥ तुझें कार्य सिद्धीस जावो ॥९॥
मग कुंडीं अदृश्य जाहला ॥ भव्यज्वाळी कडाडला ॥ आचार्यं मंत्र सिद्ध भला ॥ आथर्वणिक ॥१०॥
रक्त मांस आज्य नर ॥ गात्रें धडें शिरें समग्र ॥ होमिताती मंत्रीं अघोर ॥ स्वाहाकारीं ॥११॥
ऐसा होम करितां तेथें ॥ पातलीं कोट्यानकोटी भुतें ॥ तंव मंत्रें त्राहाटोनि तयांतें निवारिलें विप्रीं ॥१२॥
सुट्ला यज्ञधूम प्रचंड ॥ तेणें व्यापिलें ब्रह्मांड ॥ इंद्रादिकां जाहला उद्दंड ॥ खळबळाटु ॥१३॥
स्वर्गी बृहस्पति ह्मणे देवां ॥ कीं नारद भूमंडळीं पाठवावा ॥ समुळ वृतात आणवावा ॥ मग रचिले उपावो ॥१४॥
इंद्रे पाठविला ब्रह्मकुमर ॥ येरु चालिला वेगवत्तर ॥ येवोनि देखता जाहला थोर ॥ नवलाव देखा ॥१५॥
मग जन्मेजया समोर ॥ उभा ठेला ब्रह्मकुमर ॥ तंव साष्टांग नमस्कार ॥ केला समस्त ब्राह्मणीं ॥१६॥
राये सन्मानुनि पूजिला ॥ ह्मणे जन्म सफळ जाहला ॥ मग नारदें रायासि पुसिला ॥ यज्ञवृत्तांत ॥१७॥
राव ह्मणे पितयाचें उसनें ॥ मजसी अगत्य असे जेणें ॥ तरी सर्प आकर्षेनि होमणें ॥ तक्षकादिक ॥१८॥
नारद ह्मणे सुपुत्र भला ॥ बरवा अभिमान तुवां धरिला ॥ मग आज्ञा निघाला ॥ वेगक्तर ॥१९॥
ह्मणे आधीं सांगोनि तक्षका ॥ तयासि वांचवावें देखा ॥ म्ग जावोनि सुरलोका ॥ सांगावे इंद्राप्रती ॥२०॥
ह्मणोनि सिंदुरगिरिपर्वतीं ॥ नारद गेला शीघ्रगती ॥ ते कथा ऐकावी पुढती ॥ सिंदुराद्रीची ॥२१॥
पूर्वी समुद्रमंथनीं ॥ चौदा रत्नें घेतलीं काढोनी ॥ देवदैत्यीं घेतां वांटोनि ॥ उरलें अमृत ॥२२॥
मग जो मेरुतळवटीं थोर ॥ सिदुरगिरि नामें डोंगर ॥ तेथें देवीं करोनि विचार ॥ अमृत ठेविलें ॥२३॥
नव कुंडें भरोनि चांग ॥ रक्षण ठेविले नवकुळ नाग ॥ यत्नें रक्षिती शुभांग ॥ सर्प तेथें ॥२४॥
शुभवेळे ठेविलें अमृता ॥ ह्मणोनि सुवेळाद्रि नाम पर्वता ॥ तें कुंडारव्या सांगेन आतां ॥ अवधारिजो ॥२५॥
पहिले अग्निकुंड केवळ ॥ दुसरें सिंह नामें प्रबळ ॥ तिसरें कुंड हलाहल ॥ चौथें शस्त्रकुंड ॥२६॥
नीरकुंड आणि विषार ॥ रोगकुंड मूर्छना थोर ॥ अमृतकुंड परिकर ॥ नववें पैं ॥२७॥
दैत्य उन्मत्त कपटीए दारुण ॥ करितील अमृतासि विघ्न ॥ ह्मणोनि केला हा सर्पयत्न ॥ महादेवें ॥२८॥
असो नागनाथ काकार्टेक ॥ अमृतकुंड प्रतिपाळक ॥ तेथें गेला असे तक्षक ॥ तियेचि संधी ॥।२९॥
तंव नारदमुनी झडकरी ॥ गेला तयेचि गिरिवरी ॥ तो नमस्कारितां विषारी ॥ येरु बोलता जाहला ॥३०॥
ह्मणे अजूनि कां गा निवांत ॥ जन्मे जन सत्र करित ॥ कीं नागकुळांचा निःपात ॥ व्हावयालागीं ॥३१॥
तरी शरण जारे सुपती ॥ जंव आकर्षिलें नाही मंत्रशक्तीं ॥ तंव सर्प येवोनि काकुळती ॥ ह्मणती न्यावें स्वामिया ॥३२॥
मग सर्पसहित मुनींद्र ॥ जावोनि अमरवतीये शीघ्र ॥ अवघा सांगितला विचार ॥ नागयागाचा ॥३३॥
इंद्रें सर्पीं अभय दिलें ॥ नारदासि सन्मानिलें ॥ तंव येरीकडे काय वर्तलें ॥ तें अवधारिजे ॥३४॥
तक्षक आकर्षणींचा मंत्र ॥ आचार्यें केला उच्चार ॥ परि न येचि विषार ॥ सर्पांसहित ॥३५॥
ऐसें देखोनि राव बोले ॥ कां जी न येती सर्पकुळें ॥ येरे ज्ञानदृष्टीं पाहिलें ॥ तंव ते गेले इंद्रलोका ॥३६॥
मग तें रायासि सांगीतलें ॥ तंव रायाचें मन चिंतावलें ॥ परि आचार्य रायासि बोलिले ॥ कीं न करीं चिंता ॥३७॥
सर्प पावले इंद्रपुर ॥ तरी देवासंह वज्रधर ॥ आणीन आकर्षोनि शीघ्र ॥ होमकुंडीं ॥३८॥
मग आहुती घेवोनि हातीं ॥ कुंडीं घातली मंत्रशक्तीं ॥ तंव सर्पासहित सुरपती ॥ उडाला आसनींचा ॥३९॥
पडला दुरी योजना एक ॥ देवांसर्पांसहित देखा ॥ गजबजाटु जाला सुरलोका ॥ ह्मणती कैसें कीजे ॥४०॥
मनीं चिंतीती सुरवर ॥ कैसा करावा प्रतिकार ॥ इकडे आहुती टाकिती विप्र ॥ अघोरमंत्रें ॥४१॥
सभेसि भयें बैसला इंद्र ॥ तंव आरंभिला आहुतीमंत्र ॥ तो कंठी झोंबला जेविं विषार ॥ इंद्राचिये ॥४२॥
सकळ सभा कांपिन्नली ॥ खांब ढळले धोकरीं ॥ समग्रां चिंता प्रवर्तली ॥ देवगणांसी ॥४३॥
तंव बृहस्पती देवगुरु ॥ तेणें चिंतीला अचळमंत्रु ॥ ह्मणोनि सुरांचा ठावो स्थिरु ॥ जाहला देखा ॥४४॥
मग गुरूसि इंद्र विनवी ॥ यासी काहीं बुद्धी सांगावी ॥ कीं शरणागतें लागती राखावीं ॥ आपणेयां ॥४५॥
सुरगुरू ह्मणे इंद्रातें ॥ तुवां विप्रवेषें जावोनि तेथें ॥ याचकत्वें मागावें रायातें ॥ जीव दान ॥४६॥
इंद्रे विप्रवेश धरिला ॥ नारदासहित चालिला ॥ सभास्थानी प्रवेशला ॥ जन्मेजयाचे ॥४७॥
तंव रायें साष्टांग प्रणाम केलें ॥ असनीं बैसा जी ह्माणितलें ॥ कीं विप्ररूपें आलेति भले ॥ दैवत माझें ॥४८॥
परि ते ह्मणती रायासी ॥ बैसणें नाहीं गा आह्मांसी ॥ काहीं मागणें असे तुजसी ॥ तें अगत्य द्यावें ॥४९॥
रावो ह्मणे तथास्तु ॥ तुमचा पुरवीन मनोरथु ॥ तंव इंद्रे वोडंवितां हातु ॥ येरें भाष दीधली ॥५०॥
इंद्रे पल्लव सरसाविला ॥ आणि तक्षकु हाकारिला ॥ ह्मणे मज हा देई वहिला ॥ नृपश्रेष्ठा ॥५१॥
हें ऐकोनि राव बोले ॥ ऐसें काय जी मागीतलें ॥ आह्मीं इतुकें आरंभिलें ॥ यासीच साधावया ॥५२॥
परि इंद्र ह्मणे रायासी ॥ आन न विचारीं आतां मानसीं ॥ हा नदेतां तरी तुह्मांसी ॥ शापीन मी ॥५३॥
रावो ह्मणे जी सुरपती ॥ येणें मारिला पिता परिक्षिती ॥ आणि ह हत्यारी दुर्मती ॥ काय मागतसां ॥५४॥
तंव आचार्यही ह्मणती राया ॥ आतां न धरीं हो थाया ॥ तक्षक इंद्रासि देवोनियां ॥ पामकीजे ॥५५॥
मग रायें तक्षक दीधला ॥ इंद्रनारदां संतोष जाहला ॥ येणेंपरी वाचविला ॥ इंद्रे विखार ॥५६॥
इंद्रें वांचविलें तक्षक ॥ परि येक कुळ जाळिलें देखा ॥ आठ उरलीं तीं गेलीं ऐका ॥ सिंदुराद्रीसी ॥५७॥
पूर्वीं छत्तीसकुळें सर्प होते ॥ त्यांत सत्तावीस भक्षिली वैनंतें ॥ हें गरुडपुराणीं असे निरुतें ॥ तृतीय स्तबकीं ॥५८॥
मग जी नव कुळें शेष होतीं ॥ त्यांतुनि येक जाळिलें भूपती ॥ आठ उरलीं तीं शीघ्रगती ॥ गेलीं स्वस्थानासी ॥५९॥
असो राव चिंताग्रस्त ह्मणे ॥ कीं कार्य नासिलें ब्राह्मणें ॥ मग होम विध्वंसिला तेणें ॥ क्रोधें करोनी ॥६०॥
इंद्रे ब्राह्मणवेष धरिला ॥ ह्मणोनि याग सासिन्नला ॥ आमुचा वैरी वांचविला ॥ भाषे कोंडवोनी ॥६१॥
जरी ब्राह्मणवेषें न येता ॥ तरी संहारितों समस्तां ॥ मजसी ब्राह्मणचि सर्वथा ॥ जाहला वैरी ॥६२॥
ऐसा मनीं विषादला ॥ क्रोध ब्राह्मणांवरी धरिला ॥ मग तें स्थान सोडोनि गेला ॥ स्वमंदिरासी ॥६३॥
नगरीं काठिकार फिरविले ॥ ह्मणे द्दिजकुळ असे जेतुलें ॥ दंडे मारोनि काढा तेतुलें ॥ देशाबाहेरी ॥६४॥
निर्बाह्मणी नगर केलें ॥ अनाचार प्रवर्तले ॥ अधर्म होवों लागले ॥ राहिलें क्रियाकर्म ॥६५॥
धर्मनष्ट जाहले लोक ॥ कलीनें व्यापिलें सकळिक ॥ मग ते मात गेली देख ॥ व्यासाश्रमीं ॥६६॥
द्वैपायन जीवीं दुखविला ॥ ह्मणे सोमवंश आतां बुडाला ॥ मूर्खपणें रायें मांडिला ॥ अधर्म सकळ ॥६७॥
अहो ऋषिवाक्य आणि पूर्वार्जित ॥ केविं पां होईल असत्य ॥ तरी कैसें तक्षकानिमित्त ॥ आरंभिलें वोखटें ॥६८॥
मग अजेय आणि शाकल दोनी ॥ आपुलें शिष्य द्विजगुणी ॥ तयां पाठविता जाहला मुनी ॥ रायाजवळी ॥६९॥
ह्मणे जावोनि रायाप्रती ॥ बरवी सांगावी बुद्धिमती ॥ त्यासी कथा सांगावी भारती ॥ तत्पूर्वजांची ॥७०॥
जेणें तो दुष्टबुद्धी सांडोनी ॥ ब्राह्मणां पूजील नित्यांनीं ॥ ऐसें करावें निरुपणीं ॥ तुह्मीं उभयतां ॥७१॥
मग ते ऋषी निघाले शीघ्र ॥ टाकिला पिपीलिका गिरिवर ॥ परि जावों नेदी काठिकार ॥ नगरामाजी ॥७२॥
काहीं निरुपिलें तयासी ॥ तेणें सुबुद्धी आली मानसीं ॥ मग प्रवेशले दोघे ॠषी ॥ नगरामाजी ॥७३॥
पुढें द्वारपाळ ह्मणे विप्रांसी ॥ भीतरीं जावोंनेदीं तुह्मासी ॥ येरू ह्मणती जावोनि रायासी ॥ करावें श्रुत ॥७४॥
तें द्वारपाळें जाणविलें ॥ कीं द्वारीं द्विज दोनी आले ॥ रायें भीतरी बोलविलें ॥ मग गले सभेआंत ॥७५॥
तयांसि क्रोधें केलें नमन ॥ परि बैसों नेदीच आसना ॥ ऋषींनीं आशीर्वाद देऊन ॥ पुसिले रायासी ॥७६॥
कांपां कठिण अंतःकरण ॥ कासया दुराविले ब्राह्मण ॥ तुजसी करवितों पुराणश्रवण ॥ जेणें सत्वगुण प्रकटे ॥७७॥
राव ह्मणे पुराणां कवण काज ॥ ऋषि ह्मणती तें तरणबीज ॥ येरू ह्मणे तें नलगे मज ॥ तुह्मीं जावें येथूनी ॥७८॥
परि मुनि ह्मणती आवेशें ॥ आह्मी भारत आणिलें असे ॥ कीतीं वर्णावया विशेषें ॥ तुझिये पूर्वजांची ॥७९॥
तंव पुरे करा राव बोले ॥ तें एकदा असे ऐकिलें ॥ कुल तरी आमुचें लाजविलें ॥ कीं एक स्त्री पांचांजणा ॥८०॥
वृथा असे ते व्यासोक्ती ॥ वेदशास्त्र पुराणास्थिती ॥ ब्राह्मण वृथाचि जल्पती ॥ अहितकारक ॥८१॥
तंव कोपोनि ऋषि बोलिले ॥ अरे त्वां व्यासोक्त खंडिलें ॥ तरी कुष्ट होवोनि अंगीं वहिलें ॥ पडसील पतनीं ॥८२॥
ऐसें ऐकोनि शापदान ॥ रावो कोपला दारूण ॥ ह्मणे यारे सेवकजन ॥ करा घात ययांचा ॥८३॥
तंव घेघे ह्मणोनि धाविन्नले ॥ देखोनि ऋषी अदृश्य जाहले ॥ ते व्यासाश्रमा वेगें गेले ॥ रायें मानिलें आश्वर्य ॥८४॥
मग वर्तला जो वृत्तांत ॥ तो ऋषीश्वरी केला श्रुत ॥ तंव व्यास होवोनि कोपीक्रांत ॥ गेले पिपीलिकाद्रीसी ॥८५॥
जो तेजें सूर्यासमान ॥ गंभी रपणे उदंधी पूर्ण ॥ तो उभा ठेला जाऊन ॥ रायासन्मुख ॥८६॥
रायें भीतभीत नमिलें ॥ मग सोपचारें पूजिलें ॥ तंव मुनी क्रोधें बोलिले ॥ कीं ऐकें पारिक्षिता ॥८७॥
तुवां खंडिलें आमुचें कृत ॥ परि मी तुझें चिंतितों हित ॥ कीं तूं न व्हावासि पतित ॥ सोमवंशींचा ॥८८॥
तरि माझें शिकविलें ऐक ॥ येथें सौदागर येईल येक ॥ त्यासवें अश्र्व असती देख ॥ सहस्त्रचारी ॥८९॥
तो उतरेल नगरातळी ॥ कोणी सांगेल तुजजवळी ॥ परि त्वां न जावे नेत्रकमळीं ॥ पाहावया ॥९०॥
न जावें राया परिं तूं जासी ॥ परि न भेटावें तयासी ॥ ऐसाही भेटसील तरी परियेसी ॥ तो भेटी देईल काहीं वस्तु ॥९१॥
ते न घ्यावी तुवां स्वकरीं ॥ ऐसाही घेसील राया जरी ॥ तरी चौसहस्त्रां अश्र्वांमाझारी ॥ न रिघावें पैं ॥९२॥
ऐसाही जरी रिघसी कोडें ॥ तरी त्यांत अष्टोत्तरशत घोडे ॥ ते न पाहावेनिवाडें ॥ जन्मेजया गा ॥९३॥
ऐसही पाहसील अष्टोत्तरशत ॥ परि येक न पाहावा निभ्रांत ॥ श्यामवर्ण दिसती सत्य ॥ कर्ण जयाचे ॥९४॥
तूं तरी नायकसी शिकविलें ॥ तो घोडा न घ्यावा मोलें ॥ परि तूं घेवोनियां वहिलें ॥ आणिसील राजभुवना ॥९५॥
ऐसाही आणिसील घरीं ॥ तरी न बैसावेम तयावरीं ॥ यद्यापि बैससील वहिलें ॥ आणीसील राधीसे ॥९६॥
ऐसही पारधीसि जासी ॥ तरी न वघावें पशुपक्ष्यांसी ॥ऐसाही जरी तूं वधिसी ॥ परी एक न करींगा ॥९७॥
पुढां मृग देखसी स्वभावें ॥ तयापाठीं न लागावें ॥ लागसील तरी न वधावें ॥ मृगालागीं ॥९८॥
वधिसी तरी न चिरीं पोट ॥ चिरितां कन्या निघेल बरवंट ॥ ते तरी तुवां न वरावी प्रकट ॥ सांगत असें ॥९९॥
ऐसाही वरिसी कुमारी ॥ तरे तियेचें ह्मणितलें न करीं ॥ यापरि बोलोनियां झडकरी ॥ व्यास गुप्त जाहलें ॥१००॥
तेणें जन्मेजयो चिंतावला ॥ पुढें वृत्तांत कैसा जाहला ॥ दूर्तें समाचार सांगतिला ॥ हस्तनापुरींचा ॥१॥
जीजी चित्रकूटींचा नृपवर ॥ अमित तयाचा दळभार ॥ सूर्यवंशीं महाथोर ॥ तेणें नगर घेतलें ॥२॥
प्रधानातें पराभविलें ॥ नासिक कर्ण छेदिलें ॥ ऐकतां मन चिंतावलें ॥ जन्मेजयाचें ॥३॥
पाठोपाठीं आला प्रधान ॥ बीभत्स नकटा होउन ॥ कीं थोर जाहला खेदक्षीण ॥ ह्मणोनि आक्रंदत ॥४॥
तया पुरो हितें संबोखिलें ॥ तंव जन्मेजयानें पुसिलें ॥ कीं राज्य कैसें दवडिलें ॥ मग येरें कथिलें सर्व वृत्त ॥५॥
ह्मणे मज पैं नाहीं दळभार ॥ तयाचा अमित असे भार ॥ यास्तव घाडी घालोनि शीघ्र ॥ घेतलें राज्य शत्रूनें ॥६॥
रावो पुसे तयाचें दळ किती ॥ येरु ह्मणे सातपद्में पंदाती ॥ आणी नवलक्ष भद्रजाती ॥ वारु छपन्नकोटी ॥७॥
पन्नासकोटी रहंबर ॥ तेणे मज गांजिले थोर ॥ ऐसें ऐकोनि अक्षर ॥ कोपला जन्मेजयो ॥८॥
निशाणा घावो देवविला ॥ सैन्यभार सन्नद्ध जाहला ॥ पायभारु असे मीनला ॥ षोडशपद्मे ॥९॥
नव्याण्णवकोटी कुंजर ॥ च्यारीपद्में रहंवर ॥ आठपद्में असिंवार ॥ चालिले देखा ॥११०॥
नगराबाह्मप्रदेशीं ॥ घावो दीधला निशाणासी ॥ नगरीं खलबळाटु जनांसी ॥ वर्तला तेव्हा ॥११॥
तो देवदंडकनृपवर ॥ घावो ऐकोनि उठिला शीघ्र ॥ रथी आरुढतां दळभार ॥ मीनला देखा ॥१२॥
रणकांहक वाजिन्नले ॥ नगराबाहेर वीर आले ॥ ते जन्मेजयें देखिले ॥ मग संसारले उभयभार ॥१३॥
प्रधाननापिकें विडा उचलिला ॥ रथारूढ होवोनि चालिला ॥ त्यासवें दळभार निघाला ॥ सातकोटी ॥१४॥
देवदंडका पाचरिलें ॥ ह्मणे रे मातें विटंबिलें ॥ तें उसणें आतां घेइन वहिलें ॥ सावरीं यावा माझिया ॥१५॥
तंव हर्षण नामें महावीर ॥ चालिला दळभारेंसी समोर ॥ रण गाजवीं सारोनि शर ॥ पाचारिलें नापिका ॥१६॥
दोहींदळा आदळा जाहला ॥ तेणें भूगोअ कांपिन्नला ॥ धडधडाटु प्रवर्तला ॥ शस्त्रजाळीं ॥१७॥
जरी सांगों संग्रामप्रकारु ॥ तरी विस्तारेल कल्पतरु ॥ केवीं उपसवेल सागरु ॥ चुळेंवरी ॥१८॥
परि अगस्तीचिया परि ॥ समुद्र मावे चूळभीतरी ॥ तैसी हे संकलितमात्रीं ॥ सांगिजते कथा ॥१९॥
असो दोनीदिळें आटली ॥ मग हर्षणें गदा हाणिली ॥ ते बैसतांचि भोंवळी आली ॥ प्रधानासी ॥१२०॥
ह्मणोनि तेणें सांडिला रथ ॥ तंव हर्षण आला धांवत ॥ मग संग्राम जाहला अद्भुत ॥ मल्लविद्या ॥२१॥
नापिकाचे मुष्टिघातीं ॥ हर्षण पडिला असे क्षितीं ॥ येरें उचलोनि वाहिला रथीं ॥ नेला रायाजवळी ॥२२॥
इकडे जाहला हाहाःकार ॥ देवदंडक कोपला थोर ॥ मग पेलिला रहंवर ॥ परवीरांवरी ॥२३॥
देव चिंताग्रस्त अंतराळीं ॥ ह्मणती दोनी द्ळें महाबळी ॥ कैसें वर्तेल आतां भुतळीं ॥ ते चोजवेना ॥२४॥
पातकीं जडला जन्मेजय ॥ ह्मणनि नकळे होईल काय ॥ हे भविष्योतरी कथा आहे ॥ ह्मणे पराशरु ॥२५॥
असो दोनीदळें उठावलीं ॥ महामारीं प्रर्वतलीं ॥ शस्त्रास्त्रें असंख्य सुटलीं ॥ जाहला खळखळाटु ॥२६॥
रथ रथांवरी उठावले ॥ गज गजांवरी लोटले ॥ असिवारीं असिवार हाणीले ॥ पायदीं पायद ॥२७॥
यया झुय़ाचा विस्तार ॥ भारतीं वर्णिलासे थोर ॥ तेथींचा करोनि सारोद्धार ॥ किंचितमात्र कथियेलें ॥२८॥
एक मेलें एक मोडले ॥ उभयदळ भंगासि गेलें ॥ मग देवदंडेका पाचारिलें ॥ जन्मेजयें ॥२९॥
थोर जाहली शरसुटी ॥ बाण न मावती अभ्रपटी ॥ धाकें कांपिन्नली सृष्टी ॥ दोघां नेहटीं झुंजतां ॥१३०॥
एक राजा सूर्यवंशींचा ॥ दुसरा नृप सोमवंशींचा ॥ संग्राम जाहला उभयांचा ॥ अकथ्य देवां ॥३१॥
देवदंडके पन्नगास्त्र घातळें ॥ येरें गरुडास्त्र प्रेरिलें ॥ तेणें पर्वतास्त्र योजिलें ॥ येरें मोकलिलें वज्रास्त्र ॥३२॥
मग सूयवंशीचेनि रायें ॥ इंद्रास्त्र मोकलिलें लाहें ॥ तें घेवोनि गेलें पाहें ॥ वज्रास्त्रासी ॥३३॥
पाहोनि राव सबळवीर ॥ देवदंडकें केलाविचार ॥ मग घालोनि मोहनास्त्रशर ॥ जन्मेजय रथीं मूर्च्छाविला ॥३४॥
समरीं शत्रु करील घात ॥ ह्मणोनि सारथियें मुराडिला रथ ॥ घेवोनि गेला गगनांत ॥ सैना निःपात ॥ केला येरें ॥३५॥
मूर्च्छा हरली रायाची ॥ पाहे तंव शांती जाहली सैन्याची ॥ मग पळोनि गेला अदृष्टची ॥ पिपीसोकपर्वतीं ॥३६॥
देवदंडक विजय जाहला ॥ जाऊनि भंद्री बैसला ॥ इकडे भार होता जो मोडला ॥ तो मीनला जन्मेजया ॥३७॥
यानंतरें व्यासवर्जित ॥ जन्मेजया घडलें दुरितं ॥ तं ऐकावें सावचित्त ॥ ह्मणे मधुकरकवी ॥३८॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ अष्टमस्तबक मनोहरु ॥ जन्मेजयराज्यभ्रष्टताप्रकारु ॥ चतुर्थोध्यायीं कथियेला ॥१३९॥
॥ शुभंभवतु ॥