॥ एक उपयुक्त संकलन ॥
प्रस्तुत ओव्या वाचत असताना साधक एका वेगळ्याच अनुभवानं भारला जातो.
॥ एक उपयुक्त संकलन ॥
बोलणे व ऐकणे या इच्छांचा अंत म्हणजे मौन
पाहणे व जाणणे या इच्छांचा अंत म्हणजे एकान्त
शुद्ध 'स्वरूपस्मरणात' बुडून जाणे म्हणजे उपवास
मौन, एकान्त व उपवास याविना कसा होईल ?
आत्मसाक्षात्कार
-----------------------------------------------------
॥ ओढ ॥
लागली लागली ओढ हरिची लागली ॥धृ ॥
जवळ असूनी दिसना । माझे मन करमेना ।
सारे जाणूनही त्यासी । माझी दया का येइना ॥
हाय कदाचित मम पुण्याई आता आटली ।
ओढ हरिची लागली ॥१॥
अखंड नामस्मरण । त्यास नित्य करी वंदन ।
श्री ला आता छंद । बस, हरिची आठवण ॥
हाय कदाचित परीक्षाच ही माझी चालली ।
ओढ हरिची लागली ॥२॥
श्री गोपालकृष्ण महाराज की जय ।
राधे:शाम । राधे:शाम । राधे:शाम ॥
ज्ञानेश्वर माऊली । ज्ञानराज माऊली तुकाराम ।
श्री वीठ्ठल रखुमाई ।
हरि ओं तत सत
N/A
References : N/A
Last Updated : May 14, 2023
TOP