ओवी क्र. ६१ ते ६७

प्रस्तुत ओव्या वाचत असताना साधक एका वेगळ्याच अनुभवानं भारला जातो.


परि तू अनुग्रह घेऊनही । साधकपणातच रममाण राहशी ।
गुरुकडे जात राहशी । तेच तेच ऐकण्यासाठी ॥६१॥
याने क्षीण होती साधनाप्राण । येते नुसते छादिष्टपण ।
आणि कदाचित दांभिकपण । जाण सत्‍शिष्या ॥६२॥
भान, अजूनही स्थूलदेहात । कधी करेल चारदेह पार ?
कैसा होशील मायातीत? सत्‍शिष्या ॥६३॥
गुरुदर्शन झाले महणशी । परि त्यास न बघताच येशी ।
या गुह्यगोष्टीला ना जाणशी । अजूनही बाळा ॥६४॥
म्हणून थांबवावी धावपळ । ठायीच बसावे निश्चळ ।
आठवावे स्वरूप निर्मळ । प्रेमपूर्वक ॥६५॥
हेच गुरुस अपेक्षित जाण । अनुग्रह दिल्याचे समाधान ।
याकडे दुर्लक्षण । हिताचे नाही ॥६६॥
आता जे झाले ते जाऊ दे । तुजवर ईशकृपा होऊ दे ।
आत्मदर्शनप्रसादे । धन्य हो बाळा ॥६७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 14, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP