ओवी क्र. ४ ते १०

प्रस्तुत ओव्या वाचत असताना साधक एका वेगळ्याच अनुभवानं भारला जातो.


तुझा आरंभीचा उल्हास । चित्तात उठलेला ध्यास ।
साधनेचा चाललेला प्रयास । पाहे मंदावू ॥४॥
'मी ब्रह्म' ही जप माळ । वा अन्य नामावळ ।
जपूनही चित्तीत गोंधळ । पाहे वाढू ॥५॥
बाळा टाक निराशा । शब्दज्ञानाचा गुंडाळ गाशा ॥
पाडुनी अहंकाराचा फडशा । येई सत्वरी ॥६॥
अव्यवस्था चित्तीची जाण्यास । नेम तू धरिलास ।
परि त्यातचि अडकलास । जाण बाळा ॥७॥
तू केला नेमाचा उच्चार । आणि गवगवा फार ।
अतिगौण हा आचार । जाण बाळा ॥८॥
साध्यासाठी साधन । परि साधनासच दिले साध्यपण ।
हे तो आहे मूढपण । जाण बाळा ॥९॥
तत्व्त: न घेता जाणून । नुसतेच यांत्रिकपण ।
हे तो आहे ढोरपण । जाण बाळा ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : May 14, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP