ओवी क्र. ७२ ते ८०

प्रस्तुत ओव्या वाचत असताना साधक एका वेगळ्याच अनुभवानं भारला जातो.


N/Aहरि स्थिर आहे, सुखमय आहे । मी हरिमय होत आहे ।
ऐसे म्हणोनी स्वस्थ रहावे । अनुभवासाठी ॥७२॥
हरि तुप्त आहे, समाधानी आहे । मी हरिमय होत आहे ।
ऐसे म्हणोनी स्वस्थ रहावे । अनुभवासाठी ॥७३॥
हरि नित्य आहे, सत्य आहे, । मी हरिमय होत आहे ।
ऐसे म्हणोनी स्वस्थ रहावे । अनुभवासाठी ॥७४॥
हरि निराकार आहे, निर्विकार आहे, । मी हरिमय होत आहे ।
*ऐसे म्हणोनी स्वस्थ रहावे । अनुभवासाठी ॥७५॥
हरि निरामय आहे, चिन्मय आहे । मी हरिमय होत आहे ।
ऐसे म्हणोनी स्वस्थ रहावे । अनुभवासाठी ॥७६॥
हरि ज्ञानमय आहे, प्रेममय आहे । मी हरिमय होत आहे ।
ऐसे म्हणोनी स्वस्थ रहावे । अनुभवासाठी ॥७७॥
हरि पूर्ण जागृत, शक्तिमान आहे । मी हरिमय होत आहे ।
ऐसे म्हणोनी स्वस्थ रहावे । अनुभवासाठी ॥७८॥
हरि आनंदमय आहे, परमतत्व आहे । मी हरिमय होत आहे ।
ऐसे म्हणोनी स्वस्थ रहावे । अनुभवासाठी ॥७९॥
हरि द्रष्टा आहे, साक्षी आहे । मी हरिमय होत आहे ।
*ऐसे म्हणोनी स्वस्थ रहावे । अनुभवासाठी ॥८०॥

N/A

References : N/A
Last Updated : May 14, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP