ओवी क्र. ४१ ते ५०

प्रस्तुत ओव्या वाचत असताना साधक एका वेगळ्याच अनुभवानं भारला जातो.


अक्षरे बघता कागद ना दिसे । परि तो तेथेचि असे ।
कागद पाहता सगळीकडे । अक्षरे विरती ॥४१॥
तैसेच हे विश्व । आधार त्याचा देव ।
परि अभिन्न विश्व-देव । जाण बाळा ॥४२॥
जाणण्या हे मर्म । बाळा टाक गर्व ।
अतिविश्वासाने सर्व । ऐक बाळा ॥ ४३॥
एक गोचर, एक अगोचर । एक चंचल एक निश्चल ।
कैसे हे कळेल बर? । श्रद्धेवीण ॥४४॥
विश्व देव एकचि तत्व । एक स्पंदित एक स्थिर ।
तत्वस्पंदनशक्तिचेच सर्व । विवीधता दर्शन ॥४५॥
ते बहु भासते । तेव्हा काहीच नसते ।
परि सर्व काही तेच ते । जाण बाळा ॥४६॥
सोने झाले दागिने । सोनेपणा न आले उणे ।
मग देवाचे विश्वरूप नटणे । उणे कैसे ? ॥४७॥
दिसते भासते ते ते । विभक्तपणे अनुभवा येते ।
तत्वस्पंदन संख्याबळे । भेद सारे ॥४८॥
ते तत्व तुचि जाण । त्यास हर वा हरि म्हण ।
वा पाळ निखळ मौन । आनंदाने ॥४९॥
स्पंदित होणे वा ना होणे । जग वा जगदीश होणे ।
हे तुचि ठरविणे । सत्‍शिष्या ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : May 14, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP