ओवी क्र. ८१ ते ८५

प्रस्तुत ओव्या वाचत असताना साधक एका वेगळ्याच अनुभवानं भारला जातो.


ऐसे ज्याचे नित्य ध्यान । सहज स्वरूपानुसंधान ।
तेच त्याचे पूर्णत्व भान । जाण सत्‍शिष्या ॥८१॥
डोळे बंद वा उघडे । त्याने ना आता फरक पडे ।
स्वरूपदर्शन चोखडे । होईल बाळा ॥८२॥

टीप :  ७२ ते ८० अभंगातील दुसरी ओळ पठणाचे वेळी उच्चारावी त्यामुळे मनास योग्य आदेश प्राप्त होतो. ध्यान प्रयोग करताना मात्र न उच्चारता स्वस्थच रहावे.

हीच परमसाधना बाळा । हाच ईश्वरविषयी जिव्हाळा ॥
दिनरात सांभाळ बाळा । या गुह्यला ॥८३॥
मज आहे पूर्णविश्वास । ही साधना परमंगल खास ।
परि तुझा हवा भरवस । जाण बाळा ॥८४॥
तुझ्या भरवशावीण । तुझा उद्धार नव्हे जाण ।
तुझ दिधले संपूर्ण । जाण बाळा  ॥८५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 14, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP