ओवी क्र. ५१ ते ५५

प्रस्तुत ओव्या वाचत असताना साधक एका वेगळ्याच अनुभवानं भारला जातो.


काहीच न नसता चिदाकाशी । तूच अचानक 'ब्रह्मा' होशी ।
नाना वस्तू कल्पिशी । सुखासाठी ॥५१॥
निर्मिलेले राखीशी । त्यासाठी विष्णू होशी ।
अहर्निशी भोगशी । सुखासाठी ॥५२॥
अचानक तू कंटाळशी । रुद्र होऊन सर्व निर्दाळशी ।
चिदाकाश रिक्त करशी । सुखासाठी ॥५३॥
ऐसे हे सर्वांनी कल्पिलेले । प्रत्यक्षात जडरूप झाले ।
म्हणून हे विश्व घडले । अजूनही चालूच ॥५४॥
सत्य, त्रेता, द्वापार युग । वा सांप्रतचे कलियुग ।
जसे विचार तसे जग । जाण सत्‍शिष्या ॥५५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 14, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP