ओवी क्र. ६८ ते ७१
प्रस्तुत ओव्या वाचत असताना साधक एका वेगळ्याच अनुभवानं भारला जातो.
हरि जरी निराकार । नाम घेऊन करणे साकार ।
उच्चारोनी क्षणोक्षण । तदाकार हो ॥६८॥
हरि जरी निर्गुण । सुखी, शांत, समाधानी हे गुण ।
उच्चारोनी क्षणोक्षण । तदाकार हो ॥६९॥
हे सोपे होण्यासाठी । सांगतो एक युक्ति ।
तिचा अवलंब करण्यासी हो तत्पर ॥७०॥
या पुढील ओव्या म्हण संथ लयीत । त्यात असावे आंतरसंगीत ।
मुखावर असावे स्मित । वाट पाहता ॥७१॥
N/A
References : N/A
Last Updated : May 14, 2023
TOP