दासोपंताची पदे - पद १५४१ ते १५६०
दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥
१५४१
अवधुते ! तुं ध्येनु, मीं वो ! वांसरूं ! स्तनपान चि माझा आहारू ! ॥१॥धृ॥
अति कंठु माझा सोषला ! जठराग्नि अंतरीं पेटला ! ॥छ॥
सादु घालितां उत्तरु नें दीसी ! वेळु लागला ! कें गुंपलीसी ? ॥२॥
तृणचारु सांडूंनि मुखिचा, धांव घेइं ! मोहो धरीं आमुचा ! ॥३॥
दिगंबरेचा शब्दु श्रवणी आइकिला; आली जननी ! ॥४॥
१५४२
अवधूते ! तुझें मीं लेंकरूं ! हातु न साहे मज माये ! इतरू ! ॥१॥धृ॥
मातें आंग सोडूंनि न सवे ! बहु काळ तूझी मज सवे ! ॥छ॥
आच्छादैन तुझां उदरीं ! दिगंबरे ! घालीं पालउ मजवरी ! ॥२॥
१५४३
अवधूता ! दयामृतजळधरा ! मीं जलचरु तुझें दातारा ! ॥१॥धृ॥
वियोगें पावैन मरण ! तुझें उदर तें माझें जीवन. ॥छ॥
दिगंबरा ! तूं धरि कां अंतरें ! काळु तपिया तपतूसे बाहेरी. ॥२॥
१५४४
दुडु दुडु दुडु धांवत येइंन; आंगा मीं वरि आंग घालिन. ॥१॥धृ॥
बाळक मीं पोटिचें; मार्यादा, हें ज्ञान कइंचें ? ॥छ॥
दिगंबरा ! हें सत्य ? कीं लटिक ? साक्षि देइजे; तें नाहीं आणिक. ॥२॥
१५४५
दुडु दुडु दुडु पासीं येइंन; दाटिसी, तरि उगा चि राहिन. ॥१॥धृ॥
पाणियें रे ! भरले लोचन ! काये पाहातासि ? दे आलिंगन ! ॥छ॥
दिगंबरा ! उभडु न संवरे ! तुजमजमध्यें नाहीं दुसरें ! ॥२॥
१५४६
दुडु दुडु दुडु दुडु दुडु येइंन ! जानूंवांचूंनि न करीं आसन ! ॥१॥धृ॥
तुझें महिम्न काहीं न कळे ! मायेबापु हें जीवीं बैसलें. ॥छ॥
मीं इतरु नव्हे, दिगंबरा ! आत्मयां ! विज्ञानसागरा ! ॥२॥
१५४७
दुडु दुडु दुडु पासीं येइंन; दृष्टि मुरडीसी, तरि रुसइन ! ॥१॥धृ॥
संसार कोनटां बैसली. करीं रुदन; तुवां दुराविली. ॥छ॥
आणिकाचेनि न यें सर्वथा गुरु तुजवीण. न करीं श्रीदत्ता ! ॥२॥
ऐसें जाणोंनि आला दिगंबरु ! श्रमु हरिला तेणें समग्रू ! ॥३॥
१५४८
आलियें मीं तूज चि कारणें ! तुवां सांडिलें मजप्रति पाहाणें ! ॥१॥धृ॥
आतां ठाइं चि विरोंनि जाईन ! जीउ यये चि क्षणीं देइंन ! ॥छ॥
दिगंबरु ह्मणे ::- पाहाणें न अंतर सांडीं पाहाते नसीं तू समग्र ! ॥२॥
१५४९
श्रमु जाला ह्मणउंनि आलियें ! तुझें मोन देखोंनि परतलियें ! ॥१॥धृ॥
मज मीपण आंगी न साहे. दत्तें सांडिली बोलाची सोये ! ॥छ॥
दिगंबरु ह्मणे ::- सशब्द दुःखद; भोगी निःशब्द निजानंदपद. ॥२॥
१५५०
क्षेम द्यावया आलियें धावोंनि ! रूप ठेलासि कां आच्छादुंनी ? ॥१॥धृ॥
धिग्य ! माझी भेटि या न साहे ! आतां शरीर सोडीनं अनुपायें ! ॥छ॥
दिगंबरु ह्मणे ::- देह सांडूंनी भेटी येपां माझां येकपणीं ! ॥२॥
१५५१
पाहावया आलियें चरण; माझे हारपले दोन्ही नयन ! ॥१॥धृ॥
आतां, परतोंनि जावया न कळे ! पुढें होतां, पंथु न नीवळे ! ॥छ॥
दिगंबरू ह्मणे ::- विण दृष्टी पाहाणें; ठायीं ठाॐचि जाणोंनि असणें. ॥२॥
१५५२
गुणमहिमा श्रवणी आइकिली; ते वा ! दाखवीं मातें आपुली ! ॥१॥धृ॥
कां करितासि आड गगन ? शून्य्होताहे माझें मीपण. ॥छ॥
दिगंबरु ह्मणे ::- तुं मी न संचरें. जाण महिमान माझें तें खरें ! ॥२॥
१५५३
आलियें करूं गुणसंकीर्तन; कां धरितासि माझें वदन ? ॥१॥धृ॥
मीमाजि आठउ बुडाला ! संसारु वायां वीण गेला ! ॥छ॥
दिगंबरु ह्मणे ::- अनाठवें निविकल्प कीर्त्तन बरवें ! ॥२॥
१५५४
आशा धरूंनि आलियें जवळी ! तुवां मातें दाविली पोकळी ! ॥१॥धृ॥
स्थीत माझे सर्वस्व हारपलें ! देणें घेणें दिसताहे कुंठलें ! ॥छ॥
दिगंबरु ह्मणे ::- सर्व हारवीं ! मग असवें सर्व अनुभवीं ! ॥२॥
१५५५
नळनीदलगत जल चंचल ढलमल करी; परी नव्हे निश्चळ. ॥१॥धृ॥
तैसें प्राण चंचळ शरीरीं जाती, नकळे कवणे अवसरीं ! ॥छ॥
दिगंबरीं स्थीरु राही रे ! मनसा ! क्षिण क्षणक्षणा जातिसे वयसा. ॥२॥
१५५६
ढल ढल ढल मल जळे दीपकू; तयावरि पतंगु पैं येकु ! ॥१॥धृ॥
तैसें मज जालें, दातारा ! तुज सांडूंनि वरि पडे संसारा ! ॥छ॥
मन चंचल चलताहे वीकारी ! स्थीर केवि होये दिगंबरीं ? ॥२॥
१५५७
सर सर सर सरताहे सरिता ! मृगजलपुरु वाहे परि रीता ! ॥१॥धृ॥
तेथें वेधले मृग धांवती ! तैसी जाली देवा ! मज गती ! ॥छ॥
दिगंबरा ! तुतें सांडूंनि करिताहें संसारसोसणी ! ॥२॥
१५५८
जन, जन, जन, धन, धन सोषितां काळु जातसे वायां विण रीता ! ॥१॥धृ॥
क्षनु निश्चळ न राहे ! दशदीशा मनस भ्रमताहे ! ॥छ॥
दिगंबरा ! हें सांगिजे कवणा ? आत्मघातकी मीं जाणु येसणा. ॥२॥
१५५९
धन, धनद, सनद, वन, जन, जाया
नित्य सेवितां मानव्य गेलें वायां ! ॥१॥धृ॥
आतां पावलें मज निदान ! तें मीं अवघें चि जातसें सांडूंन ! ॥छ॥
दिगंबरा ! मीं बहु काळ ठकलों ! पासीं असोनि तुज अंतरलों ! ॥२॥
१५६०
क्षितितलगतसमल जल स्थिल्लर; तेथें आनंदु करीती दर्दुर. ॥१॥धृ॥
संसारु तैसा, रे ! जना ! काये भजतासि विषयवासना ? ॥छ॥
दिगंबरु परानंदसागरु सेविजा कां लीलाविश्वंभरु. ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : November 17, 2016
TOP