मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद ४६१ ते ४८०

दासोपंताची पदे - पद ४६१ ते ४८०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


४६१
नलगे तें ज्ञान; आह्मा भजन देयीं.
मन आसक्त जाहालें असे तुझाचि ठायीं.
न वसो अवधूता तूं विण माझां हृदयीं.
मन बहू उतावीळ; आतां भेटसी कयीं ? ॥१॥धृ॥
येइं रे ! येइं रे ! येइं रे ! येकुदां येइं रे ! ॥छ॥
मुक्तीचें कारण दत्ता ! तूंचि तूं जरी.
वायांवीण यें साधनें आह्मा करविसी तरी !
न घालूं मन हें आणिकावरी. दिगंबर परब्रह्मसार भजों अंतरीं. ॥२॥

॥ श्रीराग ॥
४६२
निदान, निर्गुण, केवळ, वो ! निरामय, निरंजन, केवळ वो ! ॥१॥धृ॥
डोळां तें रूप पाहिन वो ! अवधूत हृदयीं मीं कवळिन वो ! ॥छ॥
अप्रमीत, सुखसार, सगुण, वो ! दिगंबर, त्रीपुर - पावन, वो ! ॥२॥

४६३
पुराण, पावन, कारण वो ! भव - तम - दुरीत - दहन वो ! ॥१॥धृ॥
निरामय पद लाहीन वो ! अवधूत परब्रह्म पाहिन वो ! ॥छ॥
अनुपम्य गुण - पार - वर्जित वो ! दिगंबर ब्रह्म सदोदीत वो ! ॥२॥

४६४
प्रमाण - वर्जित प्रसिद्ध वो ! पंकजलोचन प्रसिद्ध वो ! ॥१॥धृ॥
चिरंतन जन - विरहित वो ! निराश्रय, निजरूप, सर्वगत वो ! ॥छ॥
सगुण, निर्गुण, गुणगहन वो ! दिगंबर ब्रह्म सनातन वो ! ॥२॥

४६५
सुरारिमर्दन चिद्धन वो ! गुणीक त्रिदोष - विनाशन वो ! ॥१॥धृ॥
परब्रह्म दृष्टी पाहीन वो ! अवधूत हृदयीं मीं ध्यायीन वो ! ॥छ॥
अगणीत - सुखपार - कारण वो ! दिगंबर दुरीत - निवारण वो ! ॥२॥

४६६
सुराढिवंदित - वंदित वो ! चिदव्यय ब्रह्म निरावृत वो ! ॥१॥धृ॥
निरंजन जनविरहीत वो ! निरामय पूर्ण गुणातीत वो ! ॥छ॥
तनुत्रय धर्महर वरद वो ! दिगंबर स्वरूपसिद्ध अवो ! ॥२॥

४६७
गुणान्वयातीत मुक्त अवो ! परब्रह्मशुद्ध सदोदीत वो ! ॥१॥धृ॥
सनातन - पद सुखरूप वो ! पाहीन नयनी कृष्णस्वरूप वो ! ॥छ॥
अवधूत मुक्तसार गुण - गुप्त वो ! दिगंबर नीत्य नीरावृत्त वो ! ॥२॥

४६८
मनासि मारूंनि काज नसे. दमूंनि करण - गण काज नसे. ॥१॥धृ॥
तुझें चिंतन मज हृदयीं असे. निवइल तेंणें मन ब्रह्मरसें. ॥छ॥
अविहीत युक्तिजाळ सांडियेलें. दिगंबरीं मनस हें ठेवियेलें. ॥२॥

४६९
॥ चालि भिन्न ॥
शुद्ध श्यामळा वासु पीवळा; पीतवर्णु कैसा शोभे टीळा ? वा ! ॥१॥धृ॥
अवो ! माये ! आत्मा सगूण वो ! नीरजलोचनु वो !
माये ! प्राणाचा प्राणु वो ! जीउ जीवीं जीवनु वो !
परब्रह्म अगूण वो ! ॥छ॥
स्वजन तू सूख - भरीतू दिगंबरु यो - ज्ञान - हेतु वो ! ॥२॥

४७०
सुपुष्पमाळा भक्तीं पूजिला; ऐसा दत्तु मज दावा डोळां वो ! ॥१॥धृ॥
अवो ! माये ! सुखा स्वजन वो ! परमात्मा सगूण वो !
नीजानंद तनु वो ! पतीत पावनु वो ! कमळ नयनु वो ! ॥छ॥
वरदहस्तू माया मुक्तु दिगंबरु अक्रीयावंतु वो ! ॥२॥

४७१
पादकमळीं आसक्त जाली. सकळ वृत्ति माझी ठायीं निमाली वो ! ॥१॥धृ॥
अवो ! माये ! काये मीं करूं ? वो ! देह जाहालें भारु वो !
नेघें याचा आधारु वो ! अर्थु न साहे परु वो !
दाखवा कां सद्गुरु  ? वो ! ॥छ॥
परति नाहीं प्रपंचु तोही. दिगंबरु मज भरला देही वो ! ॥२॥

४७२
पतंगु ज्वाळा झेंपीतु आला; नीज कर्में जैसा प्राणें निमाला वो ! ॥१॥धृ॥
अवो ! माये ! तैसें हें मन वो ! वीषयीक अज्ञान वो !
भ्रमभूत सगूण वो ! नव्हे स्ववृत्ती क्षीण वो ! ॥छ॥
योगें सूटल; दुःखें भूतलें; दीगंबरेंवीण आलें, गेलें वो ! ॥२॥

४७३
तूं माझें ध्यान, तूं माझें ज्ञान, जिवनसार, योगु, योगनिधान, रे ! ॥१॥धृ॥
अरेरे ! तूं माझा प्राणु रे ! गुणद्रष्टा आपणु रे !
आत्मा सनातनु रे ! देहभाव - दमनु रे !
अवधूता स्वजनु रे ! ॥छ॥
तूं माझें हीत सर्व - विहीत दिगंबरा सार मायातीत रे ! ॥२॥

४७४
भवनदी जातुसें पूरें. तोडिती गुण जळचरें.
विपरित कामना वारें. माझें मज काहीं न स्मरे. ॥१॥धृ॥
दत्ता रे ! घालि कां उडी ? मजसवें देयीजो बुडी.
तुझी मीं कास न सोडी. पाववीं तूं पैल थडी. ॥छ॥
कामाची न तुटे धार. रोषाचे आघात थोरं.
चाले वो - साण शरीर. दीगंबरा ! दुःख अपार. ॥२॥

४७५
भव - वन निर्जन देवा ! बहू भय होतसे जीवा.
न दीसे येथ विसावां. चहूंकडें घेतसें धांवां. ॥१॥धृ॥
कें पाहों आत्मयां तूतें ? भूललों दर्शन पंथें.
श्रीदत्ता ! जाणवीं मातें. बहू जन चूकती येथें. ॥छ॥
दीशा - चतुष्टय तें शून्य. वरि पोकळ गगन.
पृथ्वीचें रूप कठीण. दिगंबरा ! न कळे खूण. ॥२॥

४७६
तनु, धन, स्वजन, जाया, ययांची वाउगी माया.
माप तवं लागलें वया. अरे ! मना ! भूलसी का - ह्या ? ॥१॥धृ॥
गेलें वो ! हातिचें धन, श्रीगुरूचें संन्निधान;
करितां विषयध्यान, हृदयीं पडलें खान. ॥छ॥
स्वप्नसुख भोगिसी कायी ? वेॐधरीं काहीं चि नाहीं.
दिगंबरु सद्गुरू ध्यायीं. राही जसु आपुलां ठायीं. ॥२॥छ॥

४७७
भवपुरी भरली सात. क्रियाफळ लाहिजे तेथ.
दैवगती आपुलें हीत लाधलें ज्ञान निश्चीत. ॥१॥धृ॥
गेलें वो ! हातिचें गेलें. तस्करीं सर्व हरीलें.
अंतरी चोर लपालें. काम क्रोध संवित्ती मूळें. ॥छ॥
घरोघरीं घरटि बाहेरी, शब्द ज्ञान बरवयापरी.
चोरटें नित्य अंतरीं दिगंबरा कवण धरी ? ॥२॥

४७८
प्रेमहीना काइसी भक्ती ? अभिमानें घातली माती.
दंभू तो सर्वदा चित्तीं. दीनें दीनु आगळी भ्रांती. ॥१॥धृ॥
काइसी स्मरणी माळा ? मणिगण चाळिता चाळा.
अंतरीं क्रोधु भरला. कुकर्में धारा केला. ॥छ॥
प्रलपनीं सिरकली परा. ते वीची अपरा येरा.
मांडु बहू सांडि गव्हारा. प्रेमें भज श्रीदिगंबरा. ॥२॥

४७९
॥ चालि भिन्न ॥
आदिरूप विकार - हीनु, ब्रह्म केवळ चिद्धनु.
परु, निरंजनु, पंकजनयनु. ॥१॥धृ॥
पाहिन नयनी, पाहिन नयनी.
नयनी वो ! प्रीति योगिराया, अव्यया परमात्मयां,
सद्गुण आश्रया, या दत्तात्रया. ॥छ॥
सत्त्य - तत्त्व - प्रकाशभानु, छांदसां प्रति पावनू,
तमस - विनाशनु, दिगंबर सगुणु. ॥२॥

४८०
काम, राग, विकार सांडुनि मानसें परिवर्जुनि,
मीपण सोडुनी, तनुत्रय भेदुंनी, ॥१॥धृ॥
हें मन; ॥०॥ वेधलें वो ! गुणी परानंदा, ब्रह्मरूपा चित्परा,
अभय वरदा मुनिजन हर्षदा, ॥छ॥
आत्मतत्व - विचार - सारा, केवळा, अविनश्वरा,
परम - दिगंबरा, ज्ञान - गुण- सागरा. ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP