मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद १५०१ ते १५२०

दासोपंताची पदे - पद १५०१ ते १५२०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


१५०१
कां गा ! लाविली अर्थकल्पना ? गत, मृत, बहू गुण वेदना ! ॥१॥धृ॥
सेखीं मज जाणें येकट; अर्थु साधितां परम दुर्घट. ॥छ॥
दिगंबरा ! हे सृष्टी चि कां केली ? गुणधर्में प्राणियें गोचिली ! ॥२॥

१५०२
माव करूंनि प्रगुप्त जालासी; तें चि अज्ञान बळवंत जनासी. ॥१॥धृ॥
ऐसें कां बा ! श्रीदत्त ! कइं प्रकटसी ज्ञानसविता ? ॥छ॥
दिगंबरा ! तुझें अज्ञान, तें चि संसारबंधासि कारण. ॥२॥

१५०३
आह्मा आमुचेनि कर्मबंधन; सुटिका ते नाहीं तुजवीण. ॥१॥धृ॥
ऐसें कैसें हें तुझें करणें ? देइजे कव्हाणप्रति गार्‍हाणें ? ॥छ॥
दिगंबरा ! हे माव न करीं. होतें पाहिलें, तैसें चि तें करीं. ॥२॥

१५०४
सर्वकर्ता तुज वीण कवणू ? अपराधी करितासि हा जनु. ॥१॥धृ॥
आतां सांगणें काये कवणा ? अकर्ता ह्मणवीसी आपणा. ॥छ॥
दिगंबरा ! तूं सर्वचाळकु, ऐसा योगी जाणती विवेकू. ॥२॥

१५०५
अविद्या कवणे निर्मिली ? माया रूपासि कवणे आणिली ? ॥१॥धृ॥
आतां काये तुजसीं बोलणे ? मनीं जाणोंनि उगलें चि असणें. ॥छ॥
दिगंबरा ! आह्मी कवण ? ऐसेंपाहे सत्य विचारूं. ॥२॥

१५०६
तूं चि निमित्य समवायी कारण;
भिन्न विश्व हें कैंचें तुजवीण ? ॥१॥धृ॥
लटिकें कित्तीं करिसी साचार ? अवधूता ! जाणती चतुर. ॥छ॥
दिगंबरा ! तूं स्वरूपसन्मात्र; तद्वैत चि कैसें तदीतर ? ॥२॥

१५०७
अंधाकरिची काठी सूटली; मग ते नव्हे तया आपुली. ॥१॥धृ॥
तैसें मज जालें गा ! देवा ! अंतरलासेइ; भेटसी केधवां ? ॥छ॥
दिगंबरें वीण गति न दिसे. अंधकारु पडला दीवसें. ॥२॥

१५०८
लोभियाचें देवा ! धन जैसें जाये, तें चि लागे त्या पीसें; ॥१॥धृ॥
तैसें मज जालें रे ! स्वजना ! तुजवांचूंनि कमळनयना ! ॥छ॥
दिगंबराचें पीसें लागलें; नूतरे तें येराचें बोलणें. ॥२॥

१५०९
भेटि देइं, रे ! सखया ! स्वजना !
मायेबापा ! पुरवीं वासना ! ॥१॥धृ॥
अवकाशु न दिसे श्रीदत्ता ! वयवेगु आटली सरिता. ॥छ॥
दिगंबरा ! मीं तुझें किंकर; तुझें मज बहु पडलें अंतर. ॥२॥

१५१०
आजि विषाचा मेघु बोलला !
मज आतां चि प्रलयो पावला ! ॥१॥धृ॥
अवधूतु गेला सांडूंनी; काये करूं ? सांगइं साजणी ! ॥छ॥
दिगंबरेवीण मज न सहए ! प्राणपंचक सांडिन हे माये ! ॥२॥

१५११
जीउ प्राणु तूं रे ! सखया ! तुज सोडूंनि न सवे आत्मयां ! ॥१॥धृ॥
अवधूता ! जासील केउता ? पाहे परतोंनि माझी अवस्था ! ॥छ॥
दिगंबरा ! न करीं कठीण; निर्वाण पडताहे येउंन. ॥२॥

१५१२
सादु घाली, तो जाये विनिर्फळु !
प्राणु माझा पडताहे विकळू ! ॥१॥धृ॥
प्रतिसादु देइं अवधूता ! कयी नयनीं पाहिन अवधूता ! ॥छ॥
दिगंबरा ! हृदय नेणसी; दुःखसागरु भरलाहे मानसीं ! ॥२॥

१५१३
क्षितितळ पाहातां कठीण; वरि शन्य, निरालंब, गगन. ॥१॥धृ॥
आतां वाट पाहों केउती ? कोण ह्मणैल मातें आरुती ? ॥छ॥
दिगंबरा ! तूं मज येकला ! परु नाहीं संसारीं आपुला ! ॥२॥

१५१४
वियोगाचे खरतर सायक साहों न शकें; देवा ! मीं रंक. ॥१॥धृ॥
आतां काय मेलें चि मारिसी ? संसारीं वियोगें हाणसी ? ॥छ॥
दिगंबरा ! निदान जाहालें. रूप दाखवीं मातें आपुलें. ॥२॥

१५१५
मागु पाहातां देखैन पाउलें; न्हायीन मीं तेणें मृगजलें. ॥१॥धृ॥
तर्‍हि विश्रांति नेणें न दीसे, भेटिवांचूंनि दत्ता ! परियेसें. ॥छ॥
लल्लाट हाणैन भूतळीं ! प्राणु ठेवीन त्या पादकमळीं ! ॥२॥
दिगंबरा ! सत्य वचन आतां न पाहिजो तें निर्वाण. ॥३॥

१५१६
कवणाची आश करणें ? कवणाचा पुत्र ह्मणवणें ? ॥१॥धृ॥
तुज ऐसिया असतां संसारीं, मायेबापा ! जालों दरिद्री. ॥छ॥
दिगंबरा ! कैसें तुज न कळे ? निजांगा उणेपण आलें. ॥२॥

१५१७
मातें कवणु जाणें इतरू ? तूं सभाग्य दत्ता ! ईश्वरू ? ॥१॥धृ॥
आतां लाज कवणा जाहाली ? चुकवावी कवणे आपुली ? ॥छ॥
दिगंबरा ! घडलें अनुचित; आतां कीजो यावरि उचित. ॥२॥

१५१८
जेथें जाये, तुझा तुझा ची ! वास न पाहे देवा ! आणिकाची ! ॥१॥धृ॥
आतां करिसील, तें करीं उचित; मिं तवं बापा ! सोडीं स्वमत. ॥छ॥
यमु दंडील तें हीं साहीन. तेथें तुझा चि पुत्र ह्मणवीन. ॥२॥
दिगंबरा ! तूं सर्वज्ञ जाणता; आतां होतास कां बळें नेणता ? ॥३॥

१५१९
पाशबद्धासि जो नरु सोडवी, तया धर्मिष्ठ ह्मणती अघवीं. ॥१॥धृ॥
तया वधितां, पुरुषार्थु कवणु ? दिगंबरा ! नव्हसी कां जाणू ? ॥छ॥
संसारें मीं दृष बांधला, गुणकर्मीं असतां गुंपला, ॥२॥
अवधूता ! वियोगें हाणसी; पुरुषार्थु कां ऐसा साधिसी ? ॥३॥
दिगंबरा ! टाके तें करीं; मीं वेचलों तुझां व्यापारीं. ॥४॥

१५२०
कित्ती शब्द हें बोलणें प्रखर ? तुतें न मनें माझें उत्तर. ॥१॥धृ॥
आतां तुज उचित, तें करीं ! प्राणु देयीन मीं यया चि परी. ॥छ॥
दिगंबरा ! तूं तवं जाणता; माझी कां पां नेणसी हे वेथा ? ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP