मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद ५२१ ते ५४०

दासोपंताची पदे - पद ५२१ ते ५४०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


५२१
गुरुचरणीं हारपलें, तें म्यां वियोगें देखिलें. ॥१॥धृ॥
प्रेम श्रीपादकमळांचें, तेणें आनंदें मन हें नावे. ॥छ॥
दिगंबरा ! तुझी भेटि यया उपरी आतां खोटी. ॥२॥

५२२
निर्गुणी दुर्लभ गुण, तरि भजैयीन सगूण. ॥१॥धृ॥
देवा ! न करीं रे ! विक्षेपू. स्ववृत्ती परवृत्ती लोपु. ॥छ॥
दिगंबरा ! तजहीहूंन तव प्रेमीं मधुपण. ॥२॥

५२३
भेटि जालियां जन्मूचि नाहीं. आतां भजन तें ययेचि देहीं. ॥१॥धृ॥
कट्टा दुर्लभ जाणें जीणें. नाम कैसें जतन करणें ? ॥छ॥
दिगंबरा ! तुझी भेटी भक्तियोगातें वो ! खरी. ॥२॥

५२४
क्षीरसागरीं पडली मासी. विषयोचि मरण तियेसि. ॥१॥धृ॥
कट्टा ऐसें मज पैं जालें. भेटी भेटणें बुडालें. ॥छ॥
दिगंबरा ! तैसी भेटी. आह्मी न करूं तीची गोठि. ॥२॥

५२५
दीपु देखोनि तेजाला पतंगु झेपी ज्वाळा. ॥१॥धृ॥
तैसें खरतर दर्शन तूझें. काहीं नुरवीचि मीपण माझें. ॥छ॥
दिगंबरा ! प्रेमामृतें आह्मां उठवीं भजनपंथें. ॥२॥

५२६
कर्म - योगाची काहाणी मातें न रुचे अंतःकरणीं. ॥१॥धृ॥
मीं वो ! रंगली आनंदे, अवधूतें परमानंदें. ॥छ॥
दिगंबरेंवीण माये ! काही क्रियाचि आंगीं न साहे. ॥२॥

५२७
योगवार्तेचें श्रवण तेथें न रिघे माझें मन. ॥१॥धृ॥
मति गुंतली दत्तेंसीं. मीं जाइन तयाचि सरिसी, ॥छ॥
वो ! दिगंबरेंवीण काहीं मने धरिजे, ऐसें नाहीं. ॥२॥

५२८
तीर्थयात्रेचें महिमान करी श्रवण, तरि मज आण. ॥१॥धृ॥
नाम - घोषें गर्जन करितां प्रतिपदीं यात्रा बहुता. ॥छ॥
दिगंबराचें स्मरण तेणें तीर्थांसि पवित्रपण. ॥२॥

५२९
पुराण कथया पुरे. मज नावडे दूसरें. ॥१॥धृ॥
चित्त गुंतलें श्रीदत्तीं. आठवे तो पुडते पुडती. ॥छ॥
दिगंबराचें स्मरण ब्रह्म विद्येसीं समान. ॥२॥

५३०
देवी भरलें त्रीभूवन. तेथें न रिघे माझें मन. ॥१॥धृ॥
मी वो ! वेचली श्रीदत्तीं. अन्य भजन विसरली भ्रांती. ॥छ॥
दिगंबरु, आत्मा, गुरू, परमात्मा, निराकारू. ॥२॥

५३१
साधु - महिमा असो; तैसी मीं न भजे आणिकासि. ॥१॥धृ॥
माझा दत्तु पाहीन नयनी. समर्पैन त्यांचा चरणीं. ॥छ॥
दिगंबरु, आत्मा, गूरू. येरु संघातु; मी काये करूं ? ॥२॥

५३२
यज्ञ, दान, तप, सुव्रत, श्रम - करचि माने समस्त. ॥१॥धृ॥
दत्तनाम ध्या ध्या ध्या रे ! प्रेम अमृतसार दुसरें. ॥छ॥
दिगंबराचें स्मरण न तूके येणेंसीं आन. ॥२॥

५३३
पतिव्रते येकूचि भर्त्ता. केवि अनुसरों या दत्ता ? ॥१॥धृ॥
देॐ न ह्मणें आणिकातें. या जीवा हो का भलतें. ॥छ॥
दिगंबरेंवीण आन न करीं देवस्मरण.

५३४
शिवीं वाइलें सूमन, तें घेता नये परतोन. ॥१॥धृ॥
तैसें मज म्यां दीधलें दत्ता ! कैसें काढुंनी घेइजे आतां ? ॥छ॥
आतां मीं हें माझें नव्हे. कवणाचें स्मरण करावें ?
दिगंबराचें मानस आन स्मरण न घडे तयास. ॥२॥

५३५
गति कुंठली भव - पुर तरतां, वीष - विषय - शरीर - सुख - सरिता. ॥१॥धृ॥
रे ! देइं कास सद्गुरुराया ! देवा अकळ न कळे तुझी माया. ॥छ॥
दिगंबरा ! मी धरीन हातु. येरु न लगे; न कळे परमार्थु. ॥२॥

५३६
मार्गु न कळे भवकूपतमसीं. देवा ! त्रिगुणकरणीं तुज गिवसीं. ॥१॥धृ॥
रे ! देइं हातु श्री - गुरुराया ! मन परति न धरी दत्तात्रेया ! ॥छ॥
दिगंबरा ! तूं समर्थु, योगविषयीं परम पुरुषार्थ. ॥२॥

५३७
मन श्रमलें स्वजन वन भ्रमतां. गति न चले शरीर सुख भजतां. ॥१॥धृ॥
हें निदान पडाताहे वरी. जन स्वजन तें कवण निवारी ? ॥छ॥
दिगंबरा ! तूजवीण छाया. दुःखकर चि सकळ योगिराया ! ॥२॥

५३८
झरझरित सजळ झरे घटिका. निर न धरे, न धरे, क्षणा येका. ॥१॥धृ॥
रे ! लब तृटि पळ पळ वय चळलें. येर अवघेचि वायां गेलें. ॥छ॥
दिगंबरेंवीण बहु दिन जीणें. तें ही सकळ सुक्षिण क्षण क्षणें. ॥२॥

५३९
धन, धनद, सदन, जन, जाया,
नित्य भजतां शरीर गेलें वायां. ॥१॥धृ॥
रे ! अवकाश न दिसे विचारा. तापत्रय मज करितें उबारा. ॥छ॥
दिगंबरा ! तुझें स्मरण निदानी सोडविल; ऐसी धृति अंतःकरणीं. ॥२॥

५४०
क्षितितळ हें सकळ जळमळित. नेघे चातकु जळ भूमिगत. ॥१॥धृ॥
कैसा आळवितो नीर्जनी ? माधवा ! पाव निदानी. ॥छ॥
दिगंबरा ! तैसा मीं तूतें. दीर्घ आळवीं; पावसी कयीं मातें ? ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP