मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद १००१ ते १०२०

दासोपंताची पदे - पद १००१ ते १०२०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


१००१
माये तूं; तरि तुझें मन काये धरूं ?
अवधूते ! सांग, काये मीं करूं ? ॥१॥धृ॥
कां मज दूरि धरिसी ? रे ! आत्मयां ! माये तूं बापु होसी. ॥छ॥
मनसें मनसाप्रति अंतर नाहीं.दिगंबरा ! वर्म जाणोनि पाहीं. ॥२॥

१००२
परमसुखसागरा ! साधुविश्रामा !
सिद्धराजा ! तुझा न कळे महिमा ! ॥१॥धृ॥
ब्रह्म तूं निर्विकार, गुणविवर्जित, सुखसार. ॥छ॥
परमदयार्णवा ! भक्तार्तिहरणा ! दिगंबरा ! मीं लागैन चरणा. ॥२॥

१००३
परसिद्धिहरण हा सहज गुण तूझा. तेथ कें स्वभाॐउरैल माझा ? ॥१॥धृ॥
मनस गुंतलें रे ! माझें मींपण हरिलें ! ॥छ॥
दिनकरें ज्योतिषा प्रलोपु होये; चित्त दीगंबरीं तेवि सामाये. ॥२॥

१००४
पूर्ण चैतन्य तूं अरे ! योगिराजा ! राजीवलोचना मी ! काये तुझा ? ॥१॥धृ॥
सांग पां ! झडकरूनीं. रे ! आत्मयां ! उपजलें हें चि मनीं. ॥छ॥
सर्वदेहीं तुं चि सत्य पुराण. सांग, दीगंबरा ! मीं तेथ कवण ? ॥२॥

१००५
तूं चि तेथें; सांग, मीं दुजा कवणु ?
मीं चि मीं; तेथ तूं कें विलक्षणू ? ॥१॥धृ॥
माव ते दूरि करीं. रे ! आत्मयां ! सांग पां ! हें चि तर्‍हीं. ॥छ॥
दिगंबरु ह्मणे, उगला राहीं; कळलयावरि बोलणें कायी ? ॥२॥

१००६
सदन, धन, स्वजन, वनिता, जन्म वेचला नित्य स्मरतां.
विषयसुखदुरितसरिता पुरें जातसे. पाव दत्ता ! ॥१॥धृ॥
यत्नु तो कुंठला रे ! मनु माझा गुण मदें जिंकिला रे  ! ॥छ॥
करणगुण गगनीं गिळती. सेखी तृष्णा ते सहज रीती.
स्मरण करी पुडतोपुडती. दिगंबरा ! कै करिसी परती ? ॥२॥

१००७
आत्मयां ! योगिराजा ! मनोमंदिरीं करीन पूजा.
गुणीं गुपला भाॐ माझा. आतां न स्मरे अर्थ दूजा. ॥१॥धृ॥
मीपणी वाॐ नाहीं. रे ! आत्मया ! स्वस्थिती सर्व होयीं. ॥छ॥
अर्पूनि द्वैत सर्व, धूपीं धूपूंनियां असर्व,
दिगंबर निर्वाण; पूर्व प्रिती पूजिलें परम शिव. ॥२॥

१००८
देवा ! न गणती मेघधारा; परमाणुवीं जेवि धरा;
तुज वर्णितां पूर्णपरा ! पारु नेणवे जी ! अपारा ! ॥१॥धृ॥
मानसें कुंठली रे ! मति हे तुजमाजि लोपली रे ! ॥छ॥
तुझें चरित मीं काये जाणें ? गुणवर्जिताचें करणें !
दिगंबरू हें नाम जाणें. जपु करीन नित्य मनें. ॥२॥

१००९
कृपामंदिरा ! स्वजनजिवना ! गुणगोप्तया ! कमळनयना !
तुझा विषयो परमसगुणा ! भक्त जाणती हृदयकळना ! ॥१॥धृ॥
कां मज बोधितासी ? नित्य असैन तुज चि पासीं. ॥छ॥
चळ चंचळ चलित होये; मन स्वस्थिति स्थीर नोहे.
तुझा चरणीं रमत आहे; दिगंबरातें विरोंनि जाये. ॥२॥

१०१०
स्वप्नधनखनन करितां, काळु वेचला अर्थु भजतां.
मनें आपुली सकळ चिंता दूरि सांडिली बा ! समर्था ! ॥१॥धृ॥
आतां निर्वाण पावलें रे ! दत्ता ! दाखवीं पाउलें रे ! ॥छ॥
मृतजळें गगन भरिलें; मृग लागट तेथ जालें;
दिगंबरा तेवि घडलें ! अर्थाधीन हें मनस केलें ! ॥२॥

१०११
गगन केवि गणिजे ? तुझें रूप अवगमिजे ?
गुणें न उरे जेथ दूजें, मन मावळलें सहजें. ॥१॥धृ॥
वेद ते श्रमले रे ! दत्ता तर्क पांगूळले रे ! ॥छ॥
बुद्धीसि पैसु नाहीं तुझें पाडितां रूप ठायीं.
अहंममतेचां विलयीं दिगंबरा ! तूं तत्वजयी. ॥२॥

१०१२
हृदयाकाश माझें स्थान करीजो योगिराजें.
मनोभाॐ मीं सहज पूजे देवा ! अर्पीन तो घेइजे. ॥१॥धृ॥
न वचें दूरि ! बा ! रे ! तुझे चरण नित्य स्मरें. ॥छ॥
मीमाजि पुण्य देशू; देवा ! करिपां ! तेथ वासू.
मनोधर्मु मीं करी नवसू. दिगंबरा ! तूं परमपुरुषु. ॥२॥

१०१३
लक्षितां चरणकमळें मन भ्रमरु तेथ जालें;
आसक्त पांगूळलें; देवा ! तेथूंनि तें न चले. ॥१॥धृ॥
लंपटें गुंतलों रे ! तेथें मीपणें वेचलों रे !
कारणी कार्य कुंठे मन तव रूपीं येक वाटे.
आणिकें सूख न वटे. दिगंबरा ! हें सहज घटे. ॥२॥

१०१४
भक्तासि भेदु नाहीं. भूतशोधन नित्य देहीं.
वीज, मातृका, न्यास पाहीं. आतां दंडिसी येथ कायी ?॥१॥धृ॥
भय तें चूकलें रे ! दत्ता ! द्वैत विनाशलें रे ! ॥छ॥
ज्ञान तें परम कायी ? येथें भेदीं चि भेदु नाहीं.
हें चि बा नित्य देयीं ! दिगंबरा ! मीं नेणैं काहीं. ॥२॥

१०१५
मी मज लक्ष करितां, तेथें पारूषली अवस्था.
वेदनवेद्यवेत्ता गुणभान कें भेदमुक्ता ! ॥१॥धृ॥
वर्म तें बोधलों रे ! आतां सर्वथा न चळों रे ! ॥छ॥
शून्य अशून्य वाॐ. निज निश्चळ ठायें ठाॐ.
जेथें भक्त ना भिन्न देॐ, निराकारला द्वैत भाॐ. ॥२॥
भेदत्रयातिरिक्त परब्रह्म मीं सदोदित;
खुण जाणती ते विमुक्त; दिगंबराचें पूर्ण मत. ॥३॥

१०१६
संसार श्रमद, विजनपर भवन रे !
विषदृम विषय, खरतर गुण रे ! ॥१॥धृ॥
न रमे मन तुजवांचूंन रे ! ॥छ॥
करणगण विकळ पडती; न येती ठाया रे !
दिगंबरा ! तुमची दुस्तर माया ! ॥२॥

१०१७
संसारुवन माये ! सोडिसी काये ? वो !
मनस माये ! तुजविण न राहे वो ! ॥१॥धृ॥
येइन सवें; धीरु केवि धरवे ? ॥छ॥ वो ! ॥
अज्ञान काये करूं ? नेणें विचारू वो !
दिगंबरे ! माये ! घेइं माझा भारू. ॥२॥

१०१८
क्षणु विश्रांति नाहीं; करणें; कायी ? वो !
श्रम जाला सखिये ! यये स्थूळ देहीं वो ! ॥१॥धृ॥
न सवे मातें येणें जिवें येथें वो ! ॥छ॥
नित्यशा करणगण ! चपळ मन वो !
दिगंबरे तुजसीं नव्हे समाधान वो ! ॥२॥

१०१९
अरे ! रे ! चित्तचोरा ! मनसहरा ! रे !
हृदयीं रीघतासी गुणतस्करा ! रे ! ॥१॥धृ॥
कळलें तूझें; सोडीं मन माझें रे ! ॥छ॥
एकुदां सांपडसी; केउता जासी ? रे !
दिगंबरा ! धरीन मग जीवेंसीं रे ! ॥२॥

१०२०
यातीसि ठाॐ नाहीं ! बहु पुसों कायी ? रे !
घडलें वीपरीत यये स्थूळ देहीं वो ! ॥१॥धृ॥
बोलतां उणें लाजीरवाणें वो ! ॥छ॥
याती चि पालटीली; मोहिली येणें वो !
दिगंबरे ! सखिये ! मज मीं नेणें वो ! ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP