मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे| पद ४१ ते ६० महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे पद १ ते २० पद २१ ते ४० पद ४१ ते ६० पद ६१ ते ८० पद ८१ ते १०० पद १०१ ते १२० पद १२१ ते १४० पद १४१ ते १६० पद १६१ ते १८० पद १८१ ते २०० पद २०१ ते २२० पद २२१ ते २४० पद २४१ ते २६० पद २६१ ते २८० पद २८१ ते ३०० पद ३०१ ते ३२० पद ३२१ ते ३४० पद ३४१ ते ३६० पद ३६१ ते ३८० पद ३८१ ते ४०० पद ४०१ ते ४२० पद ४२१ ते ४४० पद ४४१ ते ४६० पद ४६१ ते ४८० पद ४८१ ते ५०० पद ५०१ ते ५२० पद ५२१ ते ५४० पद ५४१ ते ५६० पद ५६१ ते ५८० पद ५८१ ते ६०० पद ६०१ ते ६२० पद ६२१ ते ६४० पद ६४१ ते ६६० पद ६६१ ते ६८० पद ६८१ ते ७०० पद ७०१ ते ७२० पद ७२१ ते ७४० पद ७४१ ते ७६० पद ७६१ ते ७८० पद ७८१ ते ८०० पद ८०१ ते ८२० पद ८२१ ते ८४० पद ८४१ ते ८६० पद ८६१ ते ८८० पद ८८१ ते ९०० पद ९०१ ते ९२० पद ९२१ ते ९४० पद ९४१ ते ९६० पद ९६१ ते ९८० पद ९८१ ते १००० पद १००१ ते १०२० पद १०२१ ते १०४० पद १०४१ ते १०६० पद १०६१ ते १०८० पद १०८१ ते ११०० पद ११०१ ते ११२० पद ११२१ ते ११४० पद ११४१ ते ११६० पद ११६१ ते ११८० पद ११८१ ते १२०० पद १२०१ ते १२२० पद १२२१ ते १२४० पद १२४१ ते १२६० पद १२६१ ते १२८० पद १२८१ ते १३०० पद १३०१ ते १३२० पद १३२१ ते १३४० पद १३४१ ते १३६० पद १३६१ ते १३८० पद १३८१ ते १४०० पद १४०१ ते १४२० पद १४२१ ते १४४० पद १४४१ ते १४६० पद १४६१ ते १४८० पद १४८१ ते १५०० पद १५०१ ते १५२० पद १५२१ ते १५४० पद १५४१ ते १५६० पद १५६१ ते १५८० पद १५८१ ते १६०० पद १६०१ ते १६०५ दासोपंताची पदे - पद ४१ ते ६० दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥ Tags : dasopantmarathiदासोपंतपदमराठी पद ४१ ते ६० Translation - भाषांतर ४१अतुळ स्वरूप रे ! सगुणगुणहिन.न दावति प्रबंधें आरे भक्तिभावें तो दिगंबरु.देवनायकु स्वर्गदानीं उदारु गाइला; गुणभेदासि मारुनिया. ॥छ॥६॥४२शोभे मुकुटु शिरि यारे ! सुरनरवरदिप्पळीया.दलितनेत्रमुखाब्जिं साजती अधर सुरगितनिरुपमवरि.दंतकिरण राजतिया. अखिल दीप्ति भवतम पळिनलें.मुनि वेधले; इतरें न रमती. येकैक देव त्रिदिव सोडूनि;येकैके देव स्वसुख सांडुनि; येकैके देव जीवदान देउनि;सकळ देव सेविति या; आनंदरूप श्रीदत्तुबा रे ! ॥१॥४३कलिमलादहन अवधूतु उद्भौ जना गुणेशु वा ! रे !दीनदयाभरितमेघु, शोभनु, मुनिमनधामु,निजसेवककुळानंदकु, सुरपतिअरिदमनु, सोमु,दिगंबरु देवो धरियला मनीं. यियाईया ॥स्वर॥छ॥जया विवर्त्तु गुणक्रुतुहा आइति हिनु पुराणु वा ! रे ! ॥२॥४४अरे ! उज्वळ - विदृमशोभि - नखगणदीप्ति - विराजितु !कमळदळसमश्रीचरणे ! रे ! रे ! लोकाधिषु ! कैवल्यनिसंशोभितु ! पितवाससींअमरादिगण रातल्लेया ! सगुणसुंदररूपगुणीया ! श्रीगुरुसंगें रे ! परपदा रे ! सुभक्त पावले. पापभोगें ज्ञानसागरींनिमज्जलेया रे ! भेदा मोंडुनि जीविता अर्पूनि अरे ! जीविताअर्पूनियां तो गुरु धरियला मनीं तेहीं.वैरिमुळा दुस्तरा छेदिलें; तो अवधूतु ध्यान ज्ञान सांडूंनियां अतिगौरमूर्त्ति म्यां धरियला. ॥छ॥१॥४५आरेतियाईय्याईय्याईय्याअरेथियाईय्याईय्याईय्यय्ययाईयय्ययाईयय्या अय्याईयेअय्याइयेअय्याइयेअयेईयंवोईयाईवाईय्यय्ययाईईयंवोइय्यईय्या ॥छ॥२॥४६॥ अहीरी नाट ॥गगनीं गहना चमकती ज्वाळा; पावकू उधळला रे !यसणातपसू दारूणु; ब्रह्मगोळु तडतडिला. ॥१॥छ॥नवल ! नवल ! रे ! तापस हो ! अत्रीचें तप ऐसें.महां कल्पांतु मांडला; मूर्द्धा भूटला तपसें. ॥छ॥त्या त्या सकळा प्राशुनि ज्वाळा; पावला त्वरित रे ! दिगंबरु आत्मारामु तया जाला हृदयगतु. ॥२॥४७बहुतां दिवसां हा दिनु ऐसा देखिला नयनी रे !दत्ता ! तुझें स्वरूप अगम्य प्रकट जालें त्रीभूवनी. ॥१॥धृ॥नवल ! नवल ! रे ! तापस हो ! अत्रीचें तप कैसें ?येसणें निधान साधिलें परब्रह्म अनायासे. ॥छ॥देवांचा देॐ देहीं सर्वां योगिया आधारु रे !अवधूतु आत्माराम प्रकटु जाला दिगंबरु. ॥२॥४८किरणीं जळकल्लोळ गमतां मृगें लांचावलीं रे !सेखीं जळचि वाॐते; कैसी ? दुराशा कवळली रे ? ॥१॥धृ॥नवल ! नवल ! रे ! सुजाण हो ! संसारीक हें तैसें.जन हें जनासी नोळखे; वृथा ममतेचें पीसें ! ॥छ॥गुरुवचनावरि सावधु हो ! पां ! साच तेचीं विचारीरे ! जना साच तें.दिगंबरें तूटें भ्रमु; न धरीं मीपण शरीरीं. ॥२॥४९क्षितितळगतजळचंचळ ढळतां सागरीं वीसांवे रे !नाहीं तया पुनरावृत्ति; कार्यकारणीं सामावे. ॥१॥धृ॥नवल ! नवल ! रे ! सुजाण हो ! जिवासि जालें तैसें. अवधूतें येकेंवीण लेया कोठेंचि न दीसे. ॥छ॥नाना योनी भ्रमतां श्रमले साधनें आयासें रे !दिगंबरीं जाले लीन, हे निवाले ब्रह्मरसें. ॥२॥५०मुनिजनजिवना ! पंकजनयना ! पाये मीं पाहीनरे !अवधूता ! येणें देहें येर न ठके साधन. ॥१॥धृ॥नवल ! नवल ! रे ! सुजाण हो ! चरणीचें महिमान.बहुतां जन्माचा सेवटु; सत्य स्फुरे ब्रह्मज्ञान. ॥छ॥निश्चळ नथरे; चंचळ हें मन मानसें वोढाळें रे !दिगंबरा ! तूं मीं आत्मा; आतां न करीं वेगळें. ॥२॥५१तुझें रूप रूपलें हृदयीं; बानु लागला वासनेचा ठाइं. ॥१॥धृ॥आतां काय सांगो ? दातारा ! अवधूता ! करुणासागरा ! ॥छ॥जीवें नुरिजे ऐसें जाहालें; दिगंबरीं मानस निमालें. ॥२॥५२योगिराजीं रातलें हें मन; आतां न करीं मीं परचिंतन. ॥१॥धृ॥काइसा लौकिकु मातें ? मीं येणें पंथें रातलिये. ॥छ॥दिगंबरीं अर्पिलें हें मन; आतां न करीं आणिक स्मरण. ॥२॥५३देवा ! हृदय तुमचें मंदीर; करूं नये इतर बिढार. ॥१॥धृ॥कायिसा लौकिकु आतां ? मी अवधूता रातलियें. ॥छ॥दिगंबरेंचि दीपु लाविला; नांदे हृदयीं आत्मा येकला. ॥२॥५४दोन्हीं नेत्रकमळें वायीलीं; तीं माझीं न ह्मणें आपुलीं. ॥१॥धृ॥आतां कुंठलें येर दर्शन; अवधूता येका वांचून. ॥छ॥दिगंबरीं वाचा दीधली; तेणें नेउंनि स्मरणीं बांधली. ॥२॥५५पाय पाहिन नयनीं; शिर ठेवीन पुडती चरणीं. ॥१॥धृ॥न करीं येरधारा आतां; श्रीअवधूता ! कृपाळुवा ! ॥छ॥दिगंबरा ! अमृतसागरा ! आदिगुरो ! तूं माहेरा बापा ! ॥२॥५६दोन्हीं हात जोडूनि मागैन; नेणें बोलों सेवक अज्ञान. ॥१॥धृ॥पुरे हा संसारु मातें; तूंविण परुतें नलगे. ॥छ॥दिगंबरा ! स्वदीनवत्सला ! भवसागरू तारीं अवलीळा. ॥२॥५७सिद्धराजा ! अमृत जळधरा ! धर्मु न कळे मातें दुसरा. ॥१॥धृ॥येइन तुज संगें संगें तूं पुढें मागें, हेंचि पुरे. ॥छ॥दिगंबरा ! सुरगणवंदीता आदिगुरो ! श्रीअवधूता बापा ! ॥२॥५८संसार सर्पु मीं धरीन; तापत्रय आंगीं साहीन. ॥१॥धृ॥परि संगु तुझा न सोडीं; भेदु विसरैन तुझिये आवडी. ॥छ॥दिगंबरा ! तूं मी होईन; मग दंडु तोही मीं साहीन. ॥२॥५९आदिगुरो ! आत्मया रामा ! मंगळधामा ! अद्वैता ! ॥१॥धृ॥मीं तूझा; तरि कां दीनवाणा जन्ममरणा आधीनू ? ॥छ॥दिगंबरा ! तूं सर्वज्ञु देही; तुजहूंनि नाहीं आणीकू. ॥२॥६०तत्वता तूं तत्व अदेही; तुजहूंनि नाहीं सर्वथा. ॥१॥धृ॥पाये मी दिव करीन; आतां न भजे आणिक साधन. ॥छ॥दिगंबरा ! तूं माझा आत्मा; संसारु आह्मां तो कइंचा ? ॥२॥ N/A References : N/A Last Updated : November 17, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP