मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद १२४१ ते १२६०

दासोपंताची पदे - पद १२४१ ते १२६०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


१२४१
भिन्न.
बहुतां कष्टी, कित्ती जन्माचा अंती, नानातपयोगे दृष्टी देखियेलें !
कैसें पुडती तुवां वियोगें धेले ?
काये अश्रुणी पाहासी अंतु ? सकळ राहिलें. ॥१॥धृ॥
अरे ! मंगळा ! येईं भेटी श्यामळा !
योगिमुनीदेवसेवितपादकमळा ! ॥छ॥
श्रीदिंगबरा ! संसारातीता ! परा ! गणेश्वरा ! गुरो ! योगिराया !
अरे झडकरी मातें करीं दया !
देवा ! मज माझेनि हीतातें न करवे रेया ! ॥२॥

१२४२
॥ भैरव देशी. ॥
जलजलोचना, दुःखशमना, तापशमना, आणा वेगीं सगुणा
माझा सदना ! मजविषयीं न ये कां वो करुणा ?
निशिदिनु वो ! गमेना ! लोटना ! ॥१॥धृ॥
अवो ! सये ! केव्हां आणिसी ? भेटविसी ?
तुझी दासी होईन प्राणवेसी; मीं वो ! पाये झाडीन मुक्तकेसीं.
जरि हा वो न दाविसीं आह्मासी राहुं मीं कैसी ? ॥छ॥
आतां तया न सोडीं करुणाकरा, दोहीं बाहीं कवळीं अत्रिकुमरा.
न यें न यें सखिये ! भवपुरा. दृढ धरिं या दिगंबरा शंकरा ! ॥२॥

१२४२
कांबोद मल्हार.
पैलु कागु बोले काये ? माझा नयनु स्पंदतु आहे.
दत्तु अझुणी कां न ये ? मन वेधलें; परति न लाहे !
वियोगु आंगी न साहे ! त्रिविधतापु बाधिताहे !
जा ! वो ! वेगु करा ! माये !
याचे दाखवा येकु वेळा पाये ! ॥१॥धृ॥
आतां न धरवे धीरू; लागला भवविखारु;
दूजा नेणें उपचारु; येकु समर्थु श्रीआदिगुरु. ॥छ॥
देवो गुरु, बापु, माये, दत्तु आत्मा माझा सैये !
तयाची वाट मीं पाहें; सवें जाइन; पुडती नये !
आनंदु आजि वाटताहे ! भाव पालटले गे ! बाइये !
दिगंबरीं भेटि होये ! ऐसें चिन्ह भासताहे ! ॥२॥

१२४४
॥ भिन्न ॥ चाली ॥
स्वपर ही पाहातां विजन माने गे ! माये !
स्मरतुसें जो गुरु तारकु बोधकु नंदकु आहे. ॥१॥धृ॥
सुखा हेतु कैसा ? - जैसा जळवंतु घन; न मेधु.
अतिगुणें कामीतु हा आशाव्याप्तु आनंदकरु. ॥छ॥
अतिशयें तृशिता चातका पावे गे माये ! मानतुसे हें,
हा देॐ श्रीदत्तु दिगंबरु तोषकु, छेदकु मोहा. ॥२॥

१२४५
सखिये ! वो ! पाहे तुं, धांवतु येतु दीसे !
शोभतुसे हा; प्रिति लावितु, भेटतु, आहे. ॥१॥धृ॥
मोहा नेतु, नाशा जैसा हिमंकरु सूखपूर्णु
अनंतरू नाशि तमा आत्मा दत्तु आदिगुरु. ॥छ॥
शरीरेंसीं पाहातां काहीं न भसे, माये !
भासतुसे हा पारवर्जितु श्रीदेॐ दिगंबरू आजि ! ॥२॥

१२४६
वरदु हा ईश्वरु प्रकटु पाहा ! दीसे;
शोभतुसे; हा बंधा छेदितु, हरीतु, तारीतु आहे. ॥१॥धृ॥
तो हा भेदु हरी; - जैसा दिनंकरू तमोहरु,
तैसा मोहा नाशीतु हा आत्मा दत्तु आदिगुरु. ॥छ॥
यया मनीं स्मरतां, मायिक जें कीं हें असे ग्रासतसे.
हा देॐ दिगंबरु शंकरु सद्गुरू हा ! ॥२॥

१२४७
॥ मल्हार ॥        ॥ नामावलि ॥
जळजनयना ! कोटीचंद्रसुशीतळ ! जळरूप ! जय ! नमो ! नमो !
जनशंकर ! जनमोहनिवारण ! जननमरणहर नमो ! नमो ! ॥१॥धृ॥
योगेश्वर ! ते नमो ! नमो ! लीलाकर ! ते नमो ! नमो ! ॥छ॥
अगुणत्रिगुणकृतकर्मनिवारण ! सगुणस्वगुणयुक्त ! नमो ! नमो !
जय ! दिगंबर ! ज्ञानप्रभाकर ! वरदस्वरूप ! ते नमो ! नमो ! ॥२॥

१२४८
अवधूतरूप, निरामय, निर्गुण, निज गुणगण मती केवि भजों ?
भवद, भयांतक, भेदविनाशक, तमोभ्रमश्रमहर कें न भजों ? ॥१॥धृ॥
कमळनयनरूप केवि भजें ? सगुण त्रीगुणमुक्त केवि भजों ? ॥छ॥
सुहृदय, दयामृतवर्षद, जळजळद, ज्ञानप्रभाकर कें न भजों ?
दिगंबर, परब्रह्म, निरंजन, साधनपर मति केवि भजों ? ॥२॥

१२४९
भवहर, भयहर, पार्षवंदित, कमळनयनरूप पाहिन वो !
परमपदद, करुणामृतसागर, गोचर नयनी मीं पाहिन वो ! ॥१॥धृ॥
देवाचें मुख पाहिन वो ! दत्त विमळरूप पाहिन वो ! ॥छ॥
पीतकनकधर, चंदनचर्चित, पीतांबरधर पाहीन वो !
योगहृदयचर, योगविदांवर, योगद दिगंबर पाहीन वो ! ॥२॥

१२५०
बहु दिन जाले ! चरण दृष्टी पाहिन ! जाइन ते मग न यें न यें !
कमळनयनरूप लाहिन केवळ; मग मीं वो ! तेथूंनि न यें ! नयें ! ॥१॥धृ॥
या देहाप्रति न यें ! न यें ! आली तरि, तेणें विण नयें नयें ! ॥छ॥
श्रमलें मनस; चरणाप्रति येइंन; मग तूजपासूंन नयें ! नयें !
दिगंबररूपहृदयीं निरोधिन; परि तुजवांचूंनि नयें नयें ! ॥२॥

१२५१
गुणगणमुक्त, वियुक्त, गुणांतक, व्यापक, पद अविकारी,
मुनिजनमान्समोहनिवारण, सकळ दुरितदुःख हारी ! ॥१॥धृ॥
श्याम शरीर गुणा नये नये ! जाणतां जाणिवेप्रति नये नये ! ॥छ॥
सुर, नर, सिद्ध, निरंतर सेवित; भेदत्रयज भान चोरी;
सहज, सदोदित, शुद्ध, गुणातित, दिगंबर भ्रमें जन चारी. ॥२॥

१२५२
चालि भिन्न.
योगेंद्राप्रति योगसार सन्यासी गुणवर्जितु वा.
अतिविमळाद्वय नित्य निरंजन नरसुरवरगण चिंतित वा.
परमगुणार्णव नित्यानंदद सेवकजनपरिपालकु वा.
दिगंबर तूं शिवरूपधर जय ! जय ! जय ! जय ! गुणवर्जिता ! ॥१॥

१२५३
ब्रह्मनिष्ठां परिपूर्णपार, ब्रह्म निरंजन तूं दत्ता !
गुणगणवर्जित तूं सच्चिन्मय, परमगुरो ! तूं हर्षपरा !
परमदयार्णव, विद्यामंदिर, विषयविकळजनसंत्राता;
दिगंबररूप तव परमाद्भुत जयजगनगपति अवधूता ! ॥१॥

१२५४
नित्यानंद, निधानसार, तुं निरवैवात्रीवरदा !
गुणगणवर्जित, ब्रह्म सनातन, स्वजनजिवनधन विषयपरा !
नित्य, निरंजन, सर्वाश्रयपद, सकळ गुरो ! श्रीदत्ता !
दीगंबरा तव रूपानंदद, जय नरसुरगण वंदिता ! ॥१॥

१२५५
॥ सारंगु ॥
नाहीं सैये ! सगुणा त्या वो ! आमुची कल्पना !
हें निश्चित ! हां सैये ! भेटि होये ऐसे करिपां ॥१॥धृ॥
जावो साजणी ! विकल हें माझें भारी
शरीर संसारदुःखें त्वरया ! ॥छ॥
मनि तो वो ! नोहे सैये ! निष्ठुरु; जाणें हें परी
काये चूकि जाहाली ? नेणें ! दिगंबरु देॐ
अह्मांविषयीं भारी कृपाळु; संप्रति हें ऐसें जाहालें. ॥२॥

१२५६
भिन्न
संगें संगें संगें संगें येइंन दत्ता ! रे !
विनवीं निरंतर :- येइं येइं येइं येइं रे ! ॥१॥धृ॥
पाहें पाहें पाहें पाहें पाहें तुजविण पालिता
सखया ! रे ! नाहीं नाहीं नाहीं नाहीं नाहीं बा ! रे ! ॥छ॥
धांवें धांवें धांवें धांवें धांवतु येइं रे ! देव दिगंबरा !
वेगें वेगें वेगें वेगें वेगें ये रे ! ॥२॥

१२५७
प्रीती बहु सगुणीं दत्तीं जाहाली मीळणी.
हें मनस हां सैये ! न नीवडे आतां येथूनी ! ॥१॥धृ॥
आजि सुदीनु समळ हें माझें दूरी हृदय परमानंदें भरलें. ॥छ॥
बहुदीनु सोये याची पाहातां श्रमली भारी !
कोण क्रिया फळली ? नेणें. दिगंबरु देॐ याचा न सोडीं आतां पालव
संसारिक हें नाहीं जाहालें. ॥२॥

१२५८
( भिन्न )
सवे लाउनि कैसें दूरि धेलें ? केलें कठिण माये !
संगु मागे संगु मागे संगु मागे मन माझें. ॥१॥धृ॥
सुरपती मन्मातें नेणे सोये नेणे सोये नेणे सोये;
भूलि जाली; करूं काये ? ॥छ॥
देवा ! येइं रे ! तुझी वाट पाहें. वय गेलें हें माझें.
दिगंबरा ! दिगंबरा ! दीन रंक मीं तुझें ! ॥२॥

१२५९
॥ सारंग भिन्न ॥
कमळनयना ! तुझा भजनीं विक्षेण
मातें करीं अतिशयें जाणपां ! ॥१॥धृ॥
वरदा ! करीं भ्रमु हा दूरी;  ॥छ॥
निरसेमज ऐसें न दिसे काहीं साधन देवा ! दिगंबरा ! तुजवीण ! ॥२॥

१२६०
सकळविषयीं नेणु न पाहें हीताहित काहीं;
तुजवरि असे निश्चित ॥१॥धृ॥
चरणीं तुझा हा मनु माझा. विसरतु मनीं तुझा न पडे,
ऐसें विनवीं. देवा ! दिगंबरा ! हें चि जीवीं. ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP