स्त्रीधन इत्यादी विषय
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
स्त्रीचा विवाह कितवाही असो, तिला स्वत:ला म्हणून पतीकडून जे स्त्रीधन मिळाले असेल त्याजवर तिची मालकी राहणे योग्य आहे. विवाहस्थितीत शिरताना ती ज्या गोत्राची होते, त्या गोत्रात ती राहील तोपावेतो तिचा अन्नवस्त्रापुरता खरा हक्क आहे; परंतु त्या गोत्रातून निघून ती निराळ्या जागी गेली म्हणजे तिचा हितसंबंध नव्या ठिकाणी उत्पन्न होतो; यासाठी पूर्वीच्या घरावरील तिचा सर्व प्रकारचा हक्क नाहीसा होतो असेच समजले पाहिजे. पूर्वपतीच्या स्मरणार्थ श्राद्धादिक करावयचे असले तरी ते तिने आपल्या स्त्रीधनातून करावे, त्याचा बोजा नवीन पतीवर ठेवू नये, हे सांगावयास नकोच. अशा प्रकारचे आणखीही कित्येक विषय आहेत; परंतु ते किरकोळ असल्याने त्यांचा निर्देश करणे नको.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP