या लटपटीत रूढिपक्षाचे मुद्दे
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
वरील कलमावरून अगदी साध्या व सरळ वचनाच्या अर्थाची पुणे मुक्कामी कशी ओढाताण झाली हे स्पष्ट दिसून येते. या ठिकाणी ‘ पुणे ’ शब्दाचे म्हणून काही विशेष महत्त्व नाही. धर्मशास्त्रासंबंधाने कोठेही चर्चा झाली, तरी तेथे यासारखीच ओढाओढी, ताणाताण व झुंज चालते. ‘ नष्टे मृते ’ या वचनावरून झुंज झाली ती केवळ शास्त्राचा सरळ अर्थ सोडून देऊन स्वत:चा रूढिपक्ष कायम ठेविण्याकरिता ! हा पक्ष म्हणजे ( १ ) स्त्रियांना स्वातंत्र्य द्यावयाचे नाही, ( २ ) त्यांजवर कशीही आपत्ती कोसळली तरी त्यांना पुनर्विवाहाची परवानगी द्यावयाची नाही, व ( ३ ) फ़ारफ़ार झाले तर सप्तपदीच्या पूर्वी या आपत्ती आल्या असतील तरच स्त्रीचे लग्न पुन्हा केल्यास चाले, या तीन गोष्टी जुलमाने शाबीत करावयाच्या.
तिसर्या गोष्टीत दिसणार्या परवानगीबद्दल शास्त्रीमंडळाचे आभार मानण्याची कल्पना कोणी मनात आणील, तर तितकी खटपट करावयास नको. कारण ही भासणारी मेहेरबानी पाच आपत्तीपुरतीच आहे, पण शास्त्राच्या दृष्टीने या पाचांहून आणखीही निराळ्या आपत्तींमुळे लग्न मोडण्याचा प्रसंग आला, तरी स्त्रीला राजरोसपणे दुसर्या पुरुषाशी लग्न लाविता येते, व मेहेरबानीची जरूरच पडत नाही !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP