पुनर्विवाहेच्छू स्त्रीचे गोत्र कोणते व दानाधिकारी कोण ?
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
वरील कलमांत दर्शविलेल्या लटपटींस साधारणत: आता दिली एवढी उत्तरे पुरेशी आहेत. परंतु याच्याच बरोबर रूढिपक्षाकडून आणखी एक प्रश्न विचारण्यात येतो, तो मात्र खरोखर महत्त्वाचा व अत्यंत विचारणीय आहे यात संशय नाही. कोणतीही स्त्री आपले कुमारीत्व सोडून विवाहस्थिस्तीत शिरते, त्यापूर्वी ती पित्याच्या गोत्राची असते; व सप्तपदी पुरी होऊन ती एकदा परक्या कुळातील पुरुषाची कायमची पत्नी झाली म्हणजे तिचे पूर्वीचे पितृ-गोत्र सुटून ती आपल्या नवीन संबंधाचे म्हणजे पतीचे गोत्र घेते. यानंतर पतीचे मरण अगर अन्य कोणतीही आपत्ती उत्पन्न होऊन ती पुनर्विवाह करू लागली, तर तिचे गोत्र कोणते समजावयाचे ? व तिचे दान कोणी करावयाचे ? असा प्रश्न आहे. याचे उत्तर कोणी काही दिले, तरी बराच काळपर्यंत वादग्रस्त स्थितीत राहण्याचा संभव आहे. तथापि ते देताना ज्या गोष्टीचा विचार अवश्य झालाच पाहिजे त्यांपैकी विशेष महत्त्वाच्या गोष्टी मुद्द्याच्या रूपाने प्रस्तुत स्थळी नमूद करणे अप्रासंगिक होणार नाही.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP