पुनर्विवाहास वेदाधार आहेत
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
झालेल्या वादात वेदग्रंथांपैकी म्हणून जे आधार दिले होते, त्यांपैकी एक आधार वर क. १३३ पृ. १६० येथे लिहिण्यात आला आहेच. या आधारावरून पुनर्विवाहाची चाल वेदकाली असावी असे मानण्यास काहीसा अवकाश मिळतो यात संशय नाही. तथापि याहून विशेष स्पष्ट आधार अथर्ववेदात आहे, पण वादाच्या वेळी तो आधार दाखविण्यात आला नव्हता, यामुळे तद्विषयक निर्णय वादीप्रतिवादींच्या दृष्टीने या ठिकाणी पाहात बसने नको. वादात वेदवचनांवर फ़ारसा भर नसून खरा मोठा कटाक्ष म्हटला म्हणजे खास कलियुगाकरिता प्रवृत्त झालेल्या “ नष्टे मृते० ” या वचनावर होता, हे वचनही मागे क. ८३ पृ० १०२ येथे प्रसंगाने येऊन गेले आहे, यासाठी त्याचे पुन: अवतरन न घेता त्यासंबंधाचे सामान्य विवरण येथे केले असता पुरे होईल.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP