मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|ऐतिहासिक पर्यालोचन|
कारणास्तव वर्णव्यवस्थेत फेरबदल

कारणास्तव वर्णव्यवस्थेत फेरबदल

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


केव्हा केव्हा असेही होईल की, एखाद्या मनुष्याचे चरित्र लहनपणी एका प्रकारचे आढळून आले, तरी पण पुढे तो वयात आल्यावर त्याच्या चरित्रात फरक पडू लागेल. जगात अनेक प्रकारच्या स्थिती - अनेक  प्रकारची कारणे यदृच्छेने उत्पन्न होतात, व त्याचा परिणाम मनुष्याच्या मनावर फार दिवस टिकणार  अथवा केव्हा केव्हा कायमचाही होऊन जातो. उदाहरणार्थ, समजा, एखादा मनुष्य लहानपणापासून आनंदी आहे, परुंतु त्याची अत्य़ंत प्रिय मातापितरे, किंवा पत्नी, किंवा अपत्य, यांच्यावर अकल्पित मृत्यूचा घाला पडला. तर अशा प्रसंगी त्या मनुष्याच्या मनाची स्थिती काय बरे होईल ? अशा प्रसंगी तो पूर्ववत आनंदीच राहील काय ? कदाचित काही काळपर्येत दु:ख सोसून तो पुढे ते दु:ख विसरेल, व पुन: पूर्ववत कमीजास्त प्रमाणाने संसारात आनंद मानू लागेल.
परंतु जगात नेहमी असाच प्रकार व्हावयाचा म्हणून तरी कोठे नेम आहे ? न जाणो, आलेला दु:खाचा प्रसंग त्या मनुष्यांस अत्यंत दु:सह वाटून तो विरक्त होईल व संसारातून कायमचा उठूनही जाईल. लहानपणी ज्याची शरीरप्रकृती चांगली आहे, तो मनुष्य प्रसंगविशेषाच्या सपाट्यात अकाली वृध्द होईल. किंवा मरुनही जाईल. केव्हा केव्हा लहानपणी दु:खप्रसंगाचा अनुभव घेतलेला मनुष्य उत्तरकाळी आश्रयविशेषाच्या साहाय्याने चांगला सुखी होईल. कोणी मनुष्य महत्वाकांक्षेच्या भरी पडून आपला पूर्वीचा वर्तनक्रम अजीबात सोडून नव्याच मार्गाला लागेल, व अनेक साहसे करुन तो आपला इष्ट हेतू तडीसही नेईल. हेतू एकवार तडीस गेल्यावर कदाचित तो आपल्या पूर्वक्रमावर येईल, अगर कदाचित नव्या परिस्थितीलाच श्रेयस्कर मानून तो पुढे तिचाच अवलंब करुन तदनुसार आपले वर्तन राखील. असो, सांगावयाचे मिळून इतकेच की, अशी उदाहरणे जगात शेकडोशे घडून येतात. तेव्हा अशा ठिकाणी मुळच्या चरित्रावरुन कोणाचा अमुक एक विशेष वर्ण मानिला असला, तरी त्याचाच उतरकालीन चरित्रावरुन पुढे त्याचा निराळा वर्ण मानण्याचीही पाळी येईल.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP