घटस्फ़ोट, काडीमोड टाळण्यास कायद्याची मदत
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
स्त्रीस एकाच काळी एकाहून अधिक पती होत नाहीत हे गोष्ट क्षणभर एका बाजूस ठेविली, तरी निदान उभयता वधूवरे जिवंत आहेत अशा वेली असलेल्या एका पतीच्या समागमात शक्य तेवढा आयुष्याचा भाग तरी खात्रीने काढिता येतो, इतक्या बेताची व्यवस्था धर्मशास्त्राने, व्यवहाराने व कायद्याने ठेविली असती, तरी तेवढ्यावरही बिचार्या स्त्रिया आपल्या मनाचे काही तरी समाधान करू शकल्या. परंतु आमच्या समाजाचे, व विशेषत: त्यापैकी आपणास उच्च प्रतीच्या म्हणून समजणार्या जातींची स्थितिच अशी काही चमत्कारिक होऊन गेली आहे की, हिंदुधर्माच्या पद्धतीचे लग्न एक वेळ होऊन नंतर पुढे स्त्रीपुरुषांची नांदणूक एकत्र होण्याची बंद पडली; पुरुषाने स्त्रीचा घटस्फ़ोट केला, किंवा तिला उघडपणे दुसरा पती करून घेण्यास धर्मशास्त्र, व्यवहार व कायदा या तिहींकडून सारखी बंदी होऊन बसली आहे !
वास्तविक विचार करू जाता ही स्थिती अत्यंत शोचनीय आहे; व या बाबतीत काही विशेष तजवीज कायद्याने होऊ शकेल तर ती होणे इष्ट आहे. कनिष्ठ प्रतीच्या जतींत विवाहसंबंधाचा मानही तितपतच आहे; व भिल्ल, कोळी, इत्यादी कित्येक जातींत तर केवळ लग्नाचा अगर दागिन्यांचा खर्च भरून मिळाला म्हणजे पती आपले सबंध स्वामित्व सोडून देण्यास तयार असतो. तेव्हा अशा लोकांविषयी विशेष विचार करने अगत्याचे नाही.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP