सावर्ण्यचर्चा
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
’ सवर्ण ’ - रुढ अर्थं व परीक्षण : येथपर्यंत वधूवरांच्या परीक्षेविषयी लिहिताना अनेक विषयांचा निरनिराळ्या प्रकार ऊहापोह केला आहे, तथापि तो करिताना पुस्तकारंभी कलम १ ( उपोदघात ) येथे सुचविल्याप्रमाणे वधू आणि वर ही उभयताही सवर्ण असलीच पाहिजेत ही गोष्ट गृहीत केली आहे. आजमितीला ’ सवर्ण ’ शब्दाचा लोकरुढीने काहीएक ठरीव संकुचित अर्थ केला आहे, व या पुस्तकात ज्या प्राचीन ग्रंथकारांची अनेक वचने आधारार्थ घेतली आहेत, ते ग्रंथकार प्रत्यक्ष ग्रंथात तितका संकुचितपणा दाखवित नसले, तरी व्यवहारात तेही तशाच प्रकारच्या संकुचित अर्थाचे अनुसरण करणारेच असावे असे मानण्यास कारणे आहेत. परंतु तात्त्विकदृष्ट्या विचार करु जाता हा अर्थ सर्वथा योग्यच आहे असे मानिता येत नाही. एका अर्थीं पाहता एवढे मोठमोठे स्मृतिकार, वेदभाष्यकार, निबंधकार या बाबतीत भ्रान्तमती झाले असे म्हणणे हे कोणासही परमसाहस वाटेल; परंतु ते साहस आहे की वास्तविक न्यायरुपच आहे, याचा निर्णय थोड्याबहुत अंशाने तरी ज्याचा त्यास करिता यावा या हेतूने पुढील विवेचन करण्यात येत आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP