मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्रीसंत सेना न्हावी चरित्र २

श्रीसंत सेना न्हावी चरित्र २

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


॥ दिंडी ॥
तुझ्या थापा मजपुढें चालती ना जाणतो मी सदनांत आहे सेना ॥
तयाला तूं बाहेर काढ वेगें । नहि आया तो घरमें हम् घुसेंगे ॥२१॥

॥ पद ॥ ( हो प्रगट झणीं० )
आहे जमादार मागरूर हलत की हो नाहीं ।
घेतल्या तुम्हांवांचून करूं मग कांहीं ॥
जा उठा पूजा पुरी करा वेळ बरी नाहीं ।
येईल शहाला राग, आणा मनीं कांहीं ॥
भूपति विष्णुचा अंश सुज्ञ म्हणतात ।
केल्यास अवज्ञा त्याचि होईल कीं घात ॥
गणुदास म्हणे याप्री सुंदरा सांगे ।
मानिना मुळीं तें सेना पूजनीं रंगे ॥२२॥
सेना म्हणाला,

॥ पद ॥ ( लावणीची )
विष्णु पुजेचा आधीं लोकांनीं बनवावा लागतो ।
म्हणून तो जगिं माना पावतो ॥
तशिच नृपाची गोष्ट असे गे नाहीं फ़रक सुंदरी ।
आकारा रयत आणी त्या खरी ॥
( चाल ) नर्मदेमध्यें कां बाण कमी असती ।
त्यांतून लागले जे लोकंच्या हातीं ।
होऊन राहिले तेच समज पशुपती ॥
अवंतराचा पाड मुळीं ना अवघे लोकां हातीं ।
जनाहुन श्रेष्ठ नव्हे भूपती ॥२३॥

॥ पद ॥ ( सुंदर मुख तुंदिल तनु )
पायमल्लि रयतेची करून सर्वदा । भोगिल जो भूप स्वयें सौख्यसंपदा ।
तो न भूप कृष्णसर्प समज सुंदरी । रहावें अशापून बुधें सर्वदा दुरी ॥
हरिपूजनावीण मज न श्रेष्ठ चाकरी । आठवूं दे शांतमनें विमल हरिपदा ॥२४॥

॥ ओवी ॥
हितशत्रू सेनाचा । एक वारिक होता साचा ।
कपटी दुष्ट स्वभावाचा । परोत्कर्षें जलत जो ॥२५॥

॥ पद ॥ (  प्रथमतांच विपरितसें रूप दाविलें )
काहो जमादार उगिच वाट पाहतां ॥ व्याघ्र तुम्हि कोल्ह्याच्या द्वारीं बैसतां ॥
आहे सेना सदनीं त्या धक्के मारणें ॥ इभ्रतीस आपुलिया आणुं नका उणें ॥
श्वानाला काय गजें देव मानणें ॥ जोड्याचें बक्षिस द्या धरुनिया हातां ॥२६॥

॥ ओवी ॥ ( चलारे, गणराया वंदा० )
आहे बसला देवापुढें । पाणी ओतित दगडावरी ।
जा घरांत वेगें शिरा । त्याचि घरवाली ना बरी ॥२७॥
जमादार घरांत घुसत आहे असें पाहून, सेनाची बायको म्हणाली,

॥ पद ॥ ( लावणीची )
तूं मुसलमान जातिचा । सदनिं ना यावें । अरे पथीं उभें रहावें  वचन मानावें । रांजण द्वारिं पाण्याचा ज्रा दूर व्हावें ॥
( चाल ) नाहीं घरामध्यें घरघनी । आहे म्हणु कथिलें तुज कुणी ॥ तुं ऐक माझी विनवणी ॥
परतुनि जावें । अरे, श्रम नच घ्यावें । मुळिं न ऐकावें । सांगणें कुणाचें । हेंच दान मज द्यावें ॥२८॥

॥ गज्जल ॥
सुनेंगे न हम् । कबू तेरी बात । लगाती है क्यौं । दरोजेकू हात
कहां बैठा छुपके । बो सेना पागल ॥ कहदे नहिंतो साली लगायेंगा लात । बतावुंगा हात ॥२९॥

॥ पद ॥ ( चलारे, गणराया वंदा० )
चाकरी जावो राहो वा ती ।
परी न आपुली त्यजिन कधीं मी ।
कुलाचार नीति ॥ध्रु०॥
( चाल ) देईल खावया आम्हां रमेचा पती ।
तो समर्थ तदिय किती द्वारांमध्यें लोळती ।
जा जाय निघुन मेल्या । आतां तूं । जाय निघुन मेल्या ॥
ही पहा घालिते कडे कवाडा । कर शिमगा पंथीं ॥३०॥

॥ आर्या ॥
जैसें चिडतां माकड, सरसावुन येत तरुस चावाया ।
तैसा पठाण लाथा, क्रोधें दारास लागला द्याया ॥३१॥

॥ साकी ॥
हुजुर आता नहि ओ सेना छुपके बैठा घरमें ।
बंदेगान् अल्लीकूं अंधा कुछ न समजता दिल्मे ॥
मगरूर घरवाली । उस्से जाद्या है साली ॥३२॥
हें ऐकून बादशहा फ़ारच रागावला, व त्यानें हुकूम केला कीं :-

॥ पद ॥ ( मालकंस, झंपा )
जावो जलावोजी खाना उसीका । नही मानताजब हुकुम ओ हुजुरका ॥
बाहर मिलातो कत्तल कर दिया जाय, येही हमारा हुकुम हो रहा है ॥२३॥

॥ श्लोक ॥
आले शिपाई घर पेटवाया । धाटे मुखांसी दृढ बांधुनिया ॥
आधींच ते दुष्ट खट्याळ भारी । त्यांतून झाला नृप साह्यकारी ॥३४॥

॥ दिंडी ॥
कांहीं केल्या तें सदन मुळिं न पेटे । मौज पाहण्या पथिं रयतसमुह लोटे ॥
लोक म्हणती हा हुकूम बरा नाहीं । वाळकाच्या चोरीस फ़ांशी काई ३५॥

॥ पद ॥
कोणी कोणी असें म्हणाले,
बादशहा हुकुम तुझा नाहीं हा बरा । न्यायसूर्य ग्रासण्यास केतु दुसरा ॥
काय तुझें सेनानें घोडें मारिलें । म्हणून असे त्याचे तूं हाल मांडिलें ॥
हें न तुझ्या कीर्तीला शोभतें भलें ॥ जा जा कुणि भूपतीस विनवणी  करा ॥३६॥

॥ आर्या ॥
कोणी म्हणाले,
केली अवज्ञा त्यानें बादशहाच्या खचित हुकुमाची ॥
त्यायोगें ही यावर पडली येऊन कुर्‍हाड काळाची ॥३७॥

॥ पद ॥ ( मम, तारा. )
कांहीं कांहीं लोक म्हणाले,
नृपतिनें बरे हें केलें ॥ मगरुरी त्याचि जिरविली ॥
वारिक हा हलकट बेटा । हुकुमाची अवज्ञा केली ॥
भूपास देव मानावें । गुणदोष तदिय ना पहावें ॥
तो देईल तितुकें खावें ॥ करूं नये ढंग केव्हांही ॥
भूपती प्राण रयतेचा ॥ गणुदास म्हणें सुखदाई ॥३८॥

॥ श्लोक ॥
कोणी असेंहि वदले बुध लोक तेथ ।
आतांन राहुन मुळीं उपयोग येथ ॥
हें लागले खचित कुंपण ऊंस खाया ।
उद्युक्त संदुक नगाप्रती वा गिळाया ॥३९॥

॥ पद ॥ ( आलिस तूं फ़ार बरें झालें० )
कांहींजण म्हणाले,
घरासह सेना ये ठायां ॥ जरी जळाला तरि तें होईल स्मारक दावाया वा हा इतिहासचि गाया ॥ होईल गरिबा भूप कसा वधी लहरिंत येउनिया ॥ किंवा विषयचि सांगाया ॥ नृपसत्ता कशी स्वैर बनोनीं करिते अन्याया ॥
( चाल ) ऐशा जाचक सत्तेशीं ॥
सेना जरि तूं बळि पडशी ॥
तरि बा कीर्तीरूपें उरशी ॥
मागें नि:संशय जगिं या । दासगणू म्हणे, म्हणुनि न होईल मरण तुझें वांयां ॥४०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 18, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP